Ovee.org
25/04/2026
कधी कधी एक छोटासा आधारही कोणाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो.विशेषतः जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि गरज खरी असते.
सध्या वाढत्या उन्हात पत्र्याच्या शेडमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या आमच्या मुलांची अवस्था पाहून आम्ही या परिस्थिती विषयी आपल्या सामाजिक गटावर मेसेज टाकला. मनात होतं हळूहळू काहीतरी होईल.मेसेज टाकताच समोरून इतक्या तातडीने आणि मनापासून प्रतिसाद येईल, याची कल्पनाही नव्हती.
नेहमीप्रमाणेच, कुठेही काही अडचण आली की आपल्या सर्वांच्या मदतीला धावून येणारे *आमचे लाडके राठी काका* पुन्हा एकदा ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या संवेदनशीलतेतून आणि मनापासूनच्या पुढाकारातून आमच्या तिन्ही सेंटरसाठी महत्त्वाची मदत मिळाली. *मोहनलाल शांताबाई चॅरिटेबल फाउंडेशन, यवतमाळ यांच्या माध्यमातून बालनगरी धनगरवाडी साठी एक मोठा कूलर, इचौरी बालनगरी साठी २ फॅन आणि पिंपळगाव सेंटर साठी एक कूलर* मदत स्वरूपात प्राप्त झाले. ही मदत म्हणजे फक्त साधनांची उपलब्धता नाही, तर या मुलांच्या शिक्षणाला मिळालेला दिलासा, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि या प्रवासात मिळालेली एक नवी ऊर्जा आहे.
गावातील अनेक मुलांनी इतका मोठा कूलर पहिल्यांदाच पाहिला. प्रत्येक जण घरून एक एक लहान हंडा पाणी घेऊन आला, सगळ्यांनी मिळून कूलर भरला, आणि त्या थंड हवेत बसून अभ्यास सुरू झाला. त्या क्षणी “मदत” म्हणजे काय असते, हे खऱ्या अर्थाने जाणवलं.कोणत्याही गाजावाजाशिवाय, निस्वार्थ भावनेतून दिलेला हा आधार आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.
राठी काका,तुमची ही साथ, तुमचं हे प्रेम आणि संवेदनशीलता आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. मनापासून धन्यवाद!आम्ही खूप कृतज्ञ आहोत 🙏
ओवी फाउंडेशन परिवार
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
Plot Number 24, Surabhi Nagar, Near Balaji Mangal Karyalaya, Pimpalgaon Road
Yavatmal
445001