Pustak Katta

Pustak Katta

Share

27/08/2024

Times have changed (a bit too much)!

पुरषा फुकट रे तू फुकट, अरे Times have changed.

आमच्या संकुलात दहीहंडी जोरदार सुरू होती. पथकं येऊन सलामी देऊन जात होती. डीजे दणाणत होता. सगळं अगदी साग्रसंगीत सुरू होतं. पण इराला त्याचं सोयर-सुतक नव्हतं. बरं बघ्यांमध्ये कुणीतरी फिरंगी होती, ती मोबाइलमधून व्हिडियो काढत होती. पण साधारण पहिली ते चौथी या वयात जी मुलांना उत्सुकता असते, ती अजिबात नव्हती. कदाचित यापेक्षा जास्त थ्रिल त्यांना मोबाइलवर दिसत असावं.

मला मात्र कॉलनीतले दिवस आठवले. आमच्या चौकात बहुधा चार कोपऱ्यात चार छोट्या हंड्या आणि मध्यभागी तुलनेने मोठी हंडी. ब २४२, २४३ आणि २५३, अशी तीन बिल्डिंगमध्ये आम्ही वर्गणी काढायचो. म्हणजे एकूण २४ घरं. त्यातलं कुणी थोडे जास्त द्यायचे, कुणी कमी, वरून घरून थोडं थोडं कॉन्ट्रि असायचंच. दहीहंडी म्हणजे केवळ दहीहंडी फोडणं नव्हे तर मडकं, दोर, दही, दूध, साखर आणणं. बाजूला लावायला थोडीफार फळं, नारळ वगैरे आणला जायचा. मग मडक्यासाठी शिंकाळं तयार करायचो. तेव्हा आमच्यासाठी ती खास टेक्निक होती. पुढे हंडी बांधल्यावर जाड दोरखंडाला एक पातळ सुतळ बांधून ती समोरच्या सोनमोहराच्या झाडावर लावायची आणि बहुधा आमच्या घरी एक टोक. कारण घर पहिल्या मजल्यावर होतं आणि आमचं मनुष्यबळही दोन-तीन थरांच्या हंडीचंच होतं. आमच्या टीमचं सरासरी वय १०-११ असावं. पण हे सगळं सगळे मिळून करायचो. तुम्हाल जमेल का, असा प्रश्न तेव्हा कुणीही विचारला नाही. असो, तर वर कोण चढणार याची चढाओढ असायची. पण बहुधा उंच मुलं खाली आणि कमी उंचीच्या मुलाला हंडी फोडायचा मान मिळायचा. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती दोन थरांची हंडी फोडली की, समोरच्या कोपऱ्यात जायचो. तिथे आम्ही हात द्यायला. मला अजूनही आठवतंय, एकाने उत्साहात नारळाऐवजी स्वतःचं कपाळ हंडीवर आपटलं होतं. हंडी फुटली नाही, पण त्याच्या कपाळावर मात्र जखम झाली. मग लगेच हळद चेपून लावली आणि पुढच्या चढाईला तयार.

तोपर्यंत दुपारी १२-१ च्या सुमारास मधली मोठी हंडी फोडायची वेळ होई. माझ्या आठवणीत दहीहंडीच्या दिवशी क्वचितच पाऊस आलेला आहे. आज होता, तसा तर अजिबात नाही. खरं तर खांद्यावर पाय ठेवून खांदे सोलवटलेले असायचे. घाम टोचून शरीराला पाणी हवं असायचं पण पाऊस पडेल तर शपथ. तेव्हा तर गोविंदांच्या पाठीवर फुगे वगैरेही मारले जायचे.

यावर उतारा म्हणून गोविंदा रे गोपाळा… यांच्या घरात नाही पाणी घागर… म्हणत आमच्या कोपऱ्याखाली फेर धरायचो. आधी गार पाण्याच्या बादल्या ओतल्या जायच्या. त्यावेळी घरच्या माळ्यावर टाक्या वगैरे बसायची पद्धत नव्हती. तरी सगळे भिजतील एवढं पाणी पडायचं. त्यानंतर अचानक कुणाच्या तरी बादलीतून चक्क गरम पाणी यायचं. त्या स्पर्शाचे तर क्या कहने!

मग आमच्या हंडीला लावलेल्या फळांचा, नारळाचा प्रसाद तयार करायचो आणि इमाने-इतबारे सगळ्या घरांमध्ये वाटायचो. उरलेला आम्ही गट्टम करायचो. त्यापैकी केळ्यांची हालत जरा जास्त बुळबुळीत असायची. ओलं खोबरं, पेर, केळं, त्यावर थोडी साखर पेरलेली असा तो प्रसाद जबरदस्तच लागायचा. घरी हमखास दही पोहे असायचे. हे सगळं खाऊन पोटोबा तृप्त झाला की, बांद्र्यातल्या इतर थोड्या फार हंड्या पाहायला जायचो. पण आकर्षण असायचं ते गिरगावातल्या हंड्यांचं आणि दादरच्या आयडिअलच्या हंडीचं. पण त्याचं समालोजन टीव्हीवर असायचं.

पण गेल्या काही वर्षांत माझाही उत्साह फारच कमी झाला आहे. सणाला राजकीय स्वरुप आणि शक्तिप्रदर्शन होऊ लागल्यानंतर बक्षीसाच्या रकमेचंही वाटेनासं झालंय आणि थरांच्या संख्येचंही. त्यातच पत्रकारितेत असताना दहीहंडीच्या दिवशी साधारण चार-पाचच्या सुमारास सायन हॉस्पिटलमध्ये चक्कर ठरलेली आणि रात्रीही विविध सरकारी हॉस्पिटलना फोन करून जखमींची संख्या जाणून घ्यायची, हा दरवर्षीचा नित्यक्रम ठरलेला असायचा.

अजूनही कदाचित गावांमध्ये छान हंडी असावी. कारण तिथं घराघरात हंडी असते. काला जमा केला जातो आणि मग तो सगळे मिळून खातात. ही आठवणही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. राजकीय लोण तिथेही पोहोचलं असेल तर कठीण आहे.

पण चितळे मास्तर म्हणतात तसं, Times have changed!

15/08/2024

ही पुस्तकं तुमच्या मुलांना वाचनाची आवड लावू शकतील.

28/05/2024

असा मी असामी - भाग २ (बी साइड) :
धोडोपंत, I tell you, this office of the doctor... हे कुशाभाऊंचं स्पेशल इंग्लिश आहे. ऑफिसचा डॉक्टर म्हणजे ऑफिस ऑफ द डॉक्टर.

सध्या असच स्पेशल मराठी बरेच ठिकाणी वाचायला मिळतं.

19/08/2020

जरा मोठे आहे, पण अद्वितीय आहे. जरूर वाचा.
एक अत्यंत दुर्मिळ असलेला, असा एक ग्रंथ आहे, जो आमच्या सनातन धर्म वाङमयात आहे.
खरं तर याला सात आश्चर्यां मधील प्रथम आश्चर्याचा सन्मान दिला पाहिजे ---
हा आहे दक्षिण भारतातील एक अनमोल असा ग्रंथ
काय हे शक्य होऊ शकतं ??
की... या ग्रंथाचे सरळ वाचन केले तर राम कथा रुपात तो वाचला जातो, आणि त्याच ग्रंथातील लिहिलेल्या शब्दाचे उलट वाचन करीत वाचले तर...
कृष्ण कथा साकार होत जाते.
कांचीपुरम येथील १७ व्या शतकातील कवि वेंकटाध्वरि रचित ग्रंथ "राघवयादवीयम्" हा असाच एकमेव अद्भुत ग्रंथ आहे.
या ग्रंथास 'अनुलोम - विलोम काव्य ' देखील म्हटले जाते. या संपूर्ण ग्रंथात फक्त ३० श्लोक आहेत. या श्लोकांचे सरळ सरळ वाचन करतांना रामकथा साकारली जाते. आणि विपरीत (उलट्या) क्रमाने वाचल्यावर कृष्ण कथा.
अशा प्रकारे हे तर केवळ ३० च श्लोक आहे. परंतु कृष्ण कथा (उलटे म्हणजे विलोम) चे पण ३० श्लोक जोडले तर ते होतात ६० श्लोक.
ग्रंथाच्या नांवा वरुन देखील हेच प्रदर्शित होते. राघव (राम) + यादव (कृष्ण) यांचे चरित्र दर्शविणारी गाथा आहे ~ "राघवयादवीयम।"
उदाहरणार्थ ग्रंथातील पहिला श्लोक असा आहे :
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥
अर्थातः
मी अशा भगवान श्रीरामाचे चरणांना प्रणाम करतो, ज्यांचे ह्रदयी सीतमाईं विराजमान आहे,तसेच ज्यांनी आपली पत्नी सीता करीता सहयाद्री पर्वत पार करीत लंकेस जावून रावणचा वध केला व आपला वनवास पूर्ण करीत अयोध्येस परत आले.
आता याच श्लोकका विलोमम्: अशा प्रकारे आहे
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥
अर्थातः
मी रूक्मिणी तसेच गोपिकांना
पूजनीय भगवान श्रीकृष्णांच्या
चरणांना प्रणाम करीत आहे, जो सदैव माता लक्ष्मी सोबत
विराजमान आहे तसेच ज्यांची शोभा समस्त हिरे-जवाहरातीं शोभेस निस्तेज करते.
" राघवयादवीयम" मधील हे ६० संस्कृत श्लोक अशा प्रकारे आहे:-
राघवयादवीयम् रामस्तोत्राणि
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥
विलोमम्:
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥
साकेताख्या ज्यायामासीद्याविप्रादीप्तार्याधारा ।
पूराजीतादेवाद्याविश्वासाग्र्यासावाशारावा ॥ २॥
विलोमम्:
वाराशावासाग्र्या साश्वाविद्यावादेताजीरापूः ।
राधार्यप्ता दीप्राविद्यासीमायाज्याख्याताकेसा ॥ २॥
कामभारस्स्थलसारश्रीसौधासौघनवापिका ।
सारसारवपीनासरागाकारसुभूरुभूः ॥ ३॥
विलोमम्:
भूरिभूसुरकागारासनापीवरसारसा ।
कापिवानघसौधासौ श्रीरसालस्थभामका ॥ ३॥
रामधामसमानेनमागोरोधनमासताम् ।
नामहामक्षररसं ताराभास्तु न वेद या ॥ ४॥
विलोमम्:
यादवेनस्तुभारातासंररक्षमहामनाः ।
तां समानधरोगोमाननेमासमधामराः ॥ ४॥
यन् गाधेयो योगी रागी वैताने सौम्ये सौख्येसौ ।
तं ख्यातं शीतं स्फीतं भीमानामाश्रीहाता त्रातम् ॥ ५॥
विलोमम्:
तं त्राताहाश्रीमानामाभीतं स्फीत्तं शीतं ख्यातं ।
सौख्ये सौम्येसौ नेता वै गीरागीयो योधेगायन् ॥ ५॥
मारमं सुकुमाराभं रसाजापनृताश्रितं ।
काविरामदलापागोसमावामतरानते ॥ ६॥
विलोमम्:
तेन रातमवामास गोपालादमराविका ।
तं श्रितानृपजासारंभ रामाकुसुमं रमा ॥ ६॥
रामनामा सदा खेदभावे दया-वानतापीनतेजारिपावनते ।
कादिमोदासहातास्वभासारसा-मेसुगोरेणुकागात्रजे भूरुमे ॥ ७॥
विलोमम्:
मेरुभूजेत्रगाकाणुरेगोसुमे-सारसा भास्वताहासदामोदिका ।
तेन वा पारिजातेन पीता नवायादवे भादखेदासमानामरा ॥ ७॥
सारसासमधाताक्षिभूम्नाधामसु सीतया ।
साध्वसाविहरेमेक्षेम्यरमासुरसारहा ॥ ८॥
विलोमम्:
हारसारसुमारम्यक्षेमेरेहविसाध्वसा ।
यातसीसुमधाम्नाभूक्षिताधामससारसा ॥ ८॥
सागसाभरतायेभमाभातामन्युमत्तया ।
सात्रमध्यमयातापेपोतायाधिगतारसा ॥ ९॥
विलोमम्:
सारतागधियातापोपेतायामध्यमत्रसा ।
यात्तमन्युमताभामा भयेतारभसागसा ॥ ९॥
तानवादपकोमाभारामेकाननदाससा ।
यालतावृद्धसेवाकाकैकेयीमहदाहह ॥ १०॥
विलोमम्:
हहदाहमयीकेकैकावासेद्ध्वृतालया ।
सासदाननकामेराभामाकोपदवानता ॥ १०॥
वरमानदसत्यासह्रीतपित्रादरादहो ।
भास्वरस्थिरधीरोपहारोरावनगाम्यसौ ॥ ११॥
विलोमम्:
सौम्यगानवरारोहापरोधीरस्स्थिरस्वभाः ।
होदरादत्रापितह्रीसत्यासदनमारवा ॥ ११॥
यानयानघधीतादा रसायास्तनयादवे ।
सागताहिवियाताह्रीसतापानकिलोनभा ॥ १२॥
विलोमम्:
भानलोकिनपातासह्रीतायाविहितागसा ।
वेदयानस्तयासारदाताधीघनयानया ॥ १२॥
रागिराधुतिगर्वादारदाहोमहसाहह ।
यानगातभरद्वाजमायासीदमगाहिनः ॥ १३॥
विलोमम्:
नोहिगामदसीयामाजद्वारभतगानया ।
हह साहमहोदारदार्वागतिधुरागिरा ॥ १३॥
यातुराजिदभाभारं द्यां वमारुतगन्धगम् ।
सोगमारपदं यक्षतुंगाभोनघयात्रया ॥ १४॥
विलोमम्:
यात्रयाघनभोगातुं क्षयदं परमागसः ।
गन्धगंतरुमावद्यं रंभाभादजिरा तु या ॥ १४॥
दण्डकां प्रदमोराजाल्याहतामयकारिहा ।
ससमानवतानेनोभोग्याभोनतदासन ॥ १५॥
विलोमम्:
नसदातनभोग्याभो नोनेतावनमास सः ।
हारिकायमताहल्याजारामोदप्रकाण्डदम् ॥ १५॥
सोरमारदनज्ञानोवेदेराकण्ठकुंभजम् ।
तं द्रुसारपटोनागानानादोषविराधहा ॥ १६॥
विलोमम्:
हाधराविषदोनानागानाटोपरसाद्रुतम् ।
जम्भकुण्ठकरादेवेनोज्ञानदरमारसः ॥ १६॥
सागमाकरपाताहाकंकेनावनतोहिसः ।
न समानर्दमारामालंकाराजस्वसा रतम् ॥ १७ विलोमम्:
तं रसास्वजराकालंमारामार्दनमासन ।
सहितोनवनाकेकं हातापारकमागसा ॥ १७॥
तां स गोरमदोश्रीदो विग्रामसदरोतत ।
वैरमासपलाहारा विनासा रविवंशके ॥ १८॥
विलोमम्:
केशवं विरसानाविराहालापसमारवैः ।
ततरोदसमग्राविदोश्रीदोमरगोसताम् ॥ १८॥
गोद्युगोमस्वमायोभूदश्रीगखरसेनया ।
सहसाहवधारोविकलोराजदरातिहा ॥ १९॥
विलोमम्:
हातिरादजरालोकविरोधावहसाहस ।
यानसेरखगश्रीद भूयोमास्वमगोद्युगः ॥ १९॥
हतपापचयेहेयो लंकेशोयमसारधीः ।
राजिराविरतेरापोहाहाहंग्रहमारघः ॥ २०॥
विलोमम्:
घोरमाहग्रहंहाहापोरातेरविराजिराः ।
धीरसामयशोकेलं यो हेये च पपात ह ॥ २०॥
ताटकेयलवादेनोहारीहारिगिरासमः ।
हासहायजनासीतानाप्तेनादमनाभुवि ॥ २१॥
विलोमम्:
विभुनामदनाप्तेनातासीनाजयहासहा ।
ससरागिरिहारीहानोदेवालयकेटता ॥ २१॥
भारमाकुदशाकेनाशराधीकुहकेनहा ।
चारुधीवनपालोक्या वैदेहीमहिताहृता ॥ २२॥
विलोमम्:
ताहृताहिमहीदेव्यैक्यालोपानवधीरुचा ।
हानकेहकुधीराशानाकेशादकुमारभाः ॥ २२॥
हारितोयदभोरामावियोगेनघवायुजः ।
तंरुमामहितोपेतामोदोसारज्ञरामयः ॥ २३॥
विलोमम्:
योमराज्ञरसादोमोतापेतोहिममारुतम् ।
जोयुवाघनगेयोविमाराभोदयतोरिहा ॥ २३॥
भानुभानुतभावामासदामोदपरोहतं ।
तंहतामरसाभक्षोतिराताकृतवासविम् ॥ २४॥
विलोमम्:
विंसवातकृतारातिक्षोभासारमताहतं ।
तं हरोपदमोदासमावाभातनुभानुभाः ॥ २४॥
हंसजारुद्धबलजापरोदारसुभाजिनि ।
राजिरावणरक्षोरविघातायरमारयम् ॥ २५॥
विलोमम्:
यं रमारयताघाविरक्षोरणवराजिरा ।
निजभासुरदारोपजालबद्धरुजासहम् ॥ २५॥
सागरातिगमाभातिनाकेशोसुरमासहः ।
तंसमारुतजंगोप्ताभादासाद्यगतोगजम् ॥ २६॥
विलोमम्:
जंगतोगद्यसादाभाप्तागोजंतरुमासतं ।
हस्समारसुशोकेनातिभामागतिरागसा ॥ २६॥
वीरवानरसेनस्य त्राताभादवता हि सः ।
तोयधावरिगोयादस्ययतोनवसेतुना ॥ २७॥
विलोमम्
नातुसेवनतोयस्यदयागोरिवधायतः ।
सहितावदभातात्रास्यनसेरनवारवी ॥ २७॥
हारिसाहसलंकेनासुभेदीमहितोहिसः ।
चारुभूतनुजोरामोरमाराधयदार्तिहा ॥ २८॥
विलोमम्
हार्तिदायधरामारमोराजोनुतभूरुचा ।
सहितोहिमदीभेसुनाकेलंसहसारिहा ॥ २८॥
नालिकेरसुभाकारागारासौसुरसापिका ।
रावणारिक्षमेरापूराभेजे हि ननामुना ॥ २९॥
विलोमम्:
नामुनानहिजेभेरापूरामेक्षरिणावरा ।
कापिसारसुसौरागाराकाभासुरकेलिना ॥ २९॥
साग्र्यतामरसागारामक्षामाघनभारगौः ॥
निजदेपरजित्यास श्रीरामे सुगराजभा ॥ ३०॥
विलोमम्:
भाजरागसुमेराश्रीसत्याजिरपदेजनि ।स
गौरभानघमाक्षामरागासारमताग्र्यसा ॥ ३०॥
॥ इति श्रीवेङ्कटाध्वरि कृतं श्री ।।
कृपया आपण आपला थोडासा अमूल्य वेळ देत वरील श्लोकांचे थोडे लक्षपूर्वक निरीक्षण केल्यास तुमच्या सहजच लक्षात येईल की संपूर्ण जगात शोधाशोध करून ही कुठे ही न आढळणारा, अशा प्रकारचा हा व अद्वितीय ग्रंथ आहे.
जय श्री कृष्ण....
साभार...

Want your business to be the top-listed Shop in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Thane
400604

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm