Naresh Mhaske
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आणि दिघेसाहेबांचा शिष्य...
जय महाराष्ट्र !!!
28/06/2026
घोडबंदर रोड येथे अरेबियन मेन्स स्टुडिओ या आकर्षक आणि भव्य कपड्यांच्या शोरूमचं उद्घाटन माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. फॅशनच्या बदलत्या विश्वात ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आधुनिक डिझाईन, दर्जेदार कपडे आणि उत्कृष्ट कलेक्शनचा सुंदर मिलाफ या शोरूममध्ये आहे. पुरुषांच्या फॅशनला एक नवी ओळख देणारं हे शोरूम निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आहे.
यावेळी शोरूमच्या मालकांना त्यांच्या नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि नव्या संकल्पनेला यश मिळो, व्यवसायाची सतत प्रगती होत राहो आणि अरेबियन मेन्स स्टुडिओ हे नाव फॅशन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
28/06/2026
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या “कॉन्टम कॅनव्हास” या अनोख्या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. ध्यानधारणा करण्यासाठी चित्रकलेचा उपयोग कसा होऊ शकतो, ही अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. चित्रांच्या माध्यमातून मनाला स्थिरता, शांतता आणि एकाग्रता मिळावी, तसेच कलाकृतींकडे पाहताना मन ध्यानाच्या अवस्थेकडे आकर्षित व्हावं, हा या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनामध्ये विविध चित्रं पाहताना मन नकळत शांत होतं.
ठाण्यातील तरुण कलाकारांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या चित्र प्रदर्शनाला ठाण्यातील तसेच ठाण्याबाहेरील अनेक चित्रप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी आयोजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचं मनापासून कौतुक केलं. योगेश शिंदे, प्रांजल शिंदे, अध्यक्ष कियान सुर्वे , क्युरेटर चैताली राजे आणि सुखदा जोशी यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी घेतलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.
27/06/2026
प्रसार माध्यमांचे आभार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615