Vastu Point
28/02/2024
08/07/2023
श्री वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार:-
फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहेत
या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्रीशिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मंदिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया प्रश्न पडले.
देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।
वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वास्तुपुरुषाने करावे असे ठरले ।या सोबतच श्रीमहादेवाने वास्तुपुरुषला नेहमीच तु तथ्थातु असे म्हणत रहाशील असे वरदान दिले.
तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे नविन घर निर्माण करेल त्त्या घराची वास्तुशांति पुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।
वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव ( असुर किंवा राक्षस ) यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या व असुरांचा नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा व असुरांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण ४५ देवता व असुर आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर रेखांकित केलेल्या ४५ देवतांच्या व असुरांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे व असुरांचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति मनुष्यास प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात काही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या व असुरांचा तत्वाची हानि किंवा भर होते व त्याचा आनंद किंवा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिनां होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना मुख्य दरवाजा , किचन , कर्त्या माणसाचं बेडरूम , देवघर , टॉयलेट बाथ ,अंगणातील तुळस , वैगरे वैगरे तसेच घराच्या आतील इंटिरियर , फोटोज , पुतळे ईत्यादी याची काळजी घ्यावी लागते ।
नोट:- यामुळेच कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु, ओपन जागा घेतल्यास त्या जागेचे योग्य रित्या नकाशे काढून ऊर्जा पातळी चेक करून त्यात योग्य ते शास्त्रोक्त बदल केले कि मग वास्तू शांती किंवा पूजा करावी .
मग श्रीवास्तु देव आपले सात पिढ्या काय पिढ्यान पिढ्या पर्यंत रक्षण करतो.
🙏
ज्योती चं मयेकर
वास्तू एक्स्पर्ट -९०२२१९२६६९
17/08/2022
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Miraroad
Thane
401107