Sfi Solapur
14/04/2026
*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांना जन्मदिनी *एसएफआय* सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने क्रांतिकारी अभिवादन !
जय भीम! लाल सलाम!
12/09/2024
अलविदा कॉम्रेड सीताराम येचुरी!
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आपले प्रिय साथीदार, एसएफआयचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष आणि माकपचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या सन्मानार्थ आपल्या संघटनेचे ध्वज खाली उतरवत आहे.
कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एक जिवंत नेता म्हणून विद्यार्थी आंदोलनातील एका चांगल्या संघटकाच्या रूपात केली. दिल्लीत ते त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये एसएफआयचे सदस्य बनले आणि त्यानंतर पुढे ते जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठात (जेएनयू) आजवरच्या सर्वात लोकप्रिय आणि ऊर्जावान विद्यार्थी नेत्यांपैकी एक बनले. आणीबाणी विरोधी लढ्यात त्यांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांची एकजूट उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ते सलग तीन वेळेस जेएनयू विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.
कॉम्रेड सीताराम येचुरी यांची १९८४मध्ये डमडम येथे झालेल्या एसएफआयच्या ५व्या अखिल भारतीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९८६च्या विजयवाडा येथे झालेल्या ६व्या अखिल भारतीय अधिवेशनापर्यंत त्यांनी ती जबाबदारी सांभाळली. त्यांनी १९८० ते १९८६ या काळात एसएफआय केंद्रीय कमिटीचे मुखपत्र 'स्टुडंट स्ट्रगल'चे संपादक म्हणूनही कार्य केले. ते आतापर्यंतचे या मुखपत्राचे सर्वाधिक काळ संपादक राहिलेले साथीदार होते. २०१५मध्ये माकपचे महासचिव म्हणून त्यांची निवड झाली आणि आजपर्यंत ते ती जबाबदारी सांभाळत होते. २००५ ते २०१७पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते.
१९७५च्या आणीबाणी विरोधी विद्यार्थी आंदोलनाचे कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी समर्थपणे नेतृत्व केले. त्याच आंदोलनाने तत्कालीन प्रधान मंत्री इंदिरा गांधी यांना कुलपती पदावरून दूर होण्यास भाग पाडले होते. आतापर्यंतच्या विद्यार्थी आंदोलनातली ही विशिष्ट घटनांपैकी एक विशेष घटना आहे. लोकशाही आणि राष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वासाठीच्या संघर्षात ते कायम अग्रेसर राहिले. ते देशातले कष्टकऱ्यांचे नेते बनले आणि कष्टकऱ्यांना समृद्ध जीवन मिळावे, यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. संसदेत खासदार म्हणून आणि बाहेर गरिबांचे नेते म्हणून, त्यांनी श्रमिक वर्गासाठी महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केले. त्यांनी संविधान रक्षणाच्या लढाईत देशाची धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्तीची एकजूट उभारण्यात प्रमुख भूमिका निभावली. त्यांनी भारतात फासिस्ट आणि कट्टरपंथी शक्तींच्या विरोधात झालेल्या अथक संघर्षाचे नेतृत्व केले.
एसएफआय, कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे जीवन आणि विद्यार्थी आंदोलन तथा देशातील श्रमिक जनतेच्या संघर्षातील त्यांच्या योगदानाचे सन्मान करते. त्यांचे योगदान एसएफआय आणि भारताच्या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी तत्वासाठी लढणाऱ्या इतर सर्व लोकांसाठी कायम प्रेरणास्रोत राहील. एसएफआय केंद्रीय कार्यकारिणी कमिटी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते. एसएफआय तर्फे कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम व भावपूर्ण आदरांजली!
आपले,
व्ही. पी. सानू (अध्यक्ष, SFI)
मयुख बिस्वास (महासचिव, SFI)
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)
केंद्रीय कार्यकारिणी कमिटी
दिनांक १२ सप्टेंबर २०२४
वृत्त निवेदन
•••
SFI Aurangabad SFI BEED SFI Pune Official Sfi Solapur SFI Pune city Sfi Bamu Chhatrapati Sambhajinagar SFI Ramtek SFI Ambegaon Taluka SFI - Nanded SFI Nagpur Sfi Palghar Sfi Ambajogai SFI Buldhana
12/09/2024
विद्यार्थी दशेत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घराला घेराव घालणारा जेएनयु सारख्या विद्यापीठाच्या नियमावली निर्मिती मधील महत्त्वाचा चेहरा... त्या विदयार्थी वयात ज्यांच्या बद्दल इंदिरा गांधी यांनी भविष्यातील देशाचे नेतृत्व असे उदगार काढले होते... असे विदयार्थी वयापासून आज शेवटचा श्वासपर्यंत कष्टकरी, कामगार, शेतकरी लोकांसाठी ते लढत राहिलेला आवाज... होय हा देश कृषीप्रधानचं आहे हे कायम सिद्ध करत राहिला... कॉम्रेड सिताराम येचुरी...
Red Salute Comrade Sitaram Yechury...
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Solapur