Zilla Parishad Solapur

Zilla Parishad Solapur

Share

Photos from Zilla Parishad Solapur's post 21/05/2026

सोलापुरात अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप; विश्वचषक विजेत्या गंगा कदम यांचा श्री कुशल जैन सीईओ यांचे हस्ते विशेष सत्कार
सोलापूर येथील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडिया (CABI) च्या वतीने दिनांक ०५ मे ते २१ मे दरम्यान अंध महिलांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. कुशल जैन उपस्थित होते. या शिबीरासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन 25 अंध मुली सहभागी झाल्या होत्या.
समारोप प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुशल जैन यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलींचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला त्यांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे टी-२० विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु. गंगा संभाजी कदम यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुशल जैन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गंगा कदम यांच्या यशाने उपस्थित सर्वच प्रशिक्षणार्थी मुलींना एक नवी प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री. चंद्रकांत रेबर्सू, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडियाच्या कु. राजश्री रमावत, तसेच श्री. राजू शेळके व प्रशिक्षक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Want your organization to be the top-listed Government Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Zilla Parishad Solapur
Solapur
413003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm