DPACS College

DPACS College

Share

Our infrastructure, teaching staff, facilities and extra-curricular activities are among the best available in Pune.

23/04/2026

Admissions Open for 2026–27!

Your journey towards a bright future starts here
Join Dhole Patil Junior College for Class 11th (HSC Board) and experience education that goes beyond textbooks

From academics to personality development, we shape future-ready individuals

Limited seats. Big dreams.
Enroll now and take the first step towards success!

[admissions open, 11th std, junior college]

Photos from DPACS College's post 22/04/2026

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीत महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी
पुणे: क्रांतिसूर्य, युगप्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती ‘ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी’मध्ये अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देऊन ज्ञानाची कवाडे खुली करणाऱ्या या महामानवाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. सागर ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या सचिव सौ. उमा सागर ढोले पाटील मॅडम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वैचारिक मंथन
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सौ. उमा ढोले पाटील मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाती निर्मूलन, धर्मचिकित्सा आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक भारताची भक्कम पायाभरणी केली. त्यांचे आंतरजातीय विवाहाचे विचार आणि समतेचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे.”
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड सर प्राचार्य डॉ. अभिजीत दंडवते सर आणि एम.बी.ए. विभागाचे प्रमुख श्रीकांत जगताप सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा फुले यांनी मांडलेला ज्ञानाचा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकारणे त्यांना अभिवादन असे विचार यावेळी मांडण्यात आले.
उपस्थिती
या कार्यक्रमाला ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीमधील सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रस्ताविक व समारोप यशवंत तलवारे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यधर्म या गीताने केला

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Near Eon IT Park, Kharadi, Dhole Patil College Road, Wagholi
Pune
412207

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm