Growing Dots

Growing Dots

Share

Photos from Growing Dots's post 01/09/2024

नमस्कार मित्रांनो

बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होतो. आता पुन्हा अॅक्टिव होत आहे.

काल औद्योगीक शिक्षण मंडळाच्या (ASM) जुनियर कॉलेज मधील मुलांची Fresher's Party होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते.

कार्यक्रमाला सोबत ASM ग्रुप चे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे, होप या संस्थेचे संस्थापक डॉ. विजय मोरे, पोलिस इंस्पेक्टर श्री. डोंगरे आणि प्रिन्सिपल मॅडम कविता उपलंचिवर उपस्थित होत्या.

त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..

15/04/2024
18/03/2024

नमस्कार मित्रांनो

दिनांक १४/१५ मार्च रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - अटल इंकूबेशन सेंटर, नीती आयोग - भारत सरकार, Forum for Innovation & Application यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मीरा भाईंदर येथे आयोजित केलेल्या आयडियाबाज 2024 या संमेलनात राज्यभरातील 101 कल्पक, आयडीयाबाज उद्याजकांनी भाग घेतला. शिक्षण, शेती, नागरी विषय आणि उद्योग या चार क्षेत्रात प्रकल्पांचे सादरीकरण झाले. या विषयातील प्रत्येकी दोन उत्कृष्ठ सहभागी प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आला.

त्यात इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (IIK) यांच्या Growing Dots - परख उपक्रमाला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ सहभागी प्रकल्प म्हणून सन्मानित करण्यात आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे कार्यकारी संचालक श्री जयंत जी कुलकर्णी आणि भारतीय किसान संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री चंदन जी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार घेतांना IIK चे संस्थापक निलेश छडवेलकर, सचिन नालापुरे आणि निलीमा प्रशांत कोठावदे.

Atal Innovation Mission NITI Aayog Rambhau Mhalgi Prabodhini Atal Incubation Centre- Rambhau Mhalgi Prabodhini
#कल्पकमित्रांचेराज्यस्तरीयसंमेलन #स्टार्टअप #उद्योजकता #नवकल्पना #महाराष्ट्र

Photos from Growing Dots's post 16/03/2024

नमस्कार मित्रांनो

नुकताच आपली संस्था इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (Growing Dots) आणि जगातील सर्वात मोठी रेडियो टेलिस्कोप GMRT यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन विज्ञान प्रयोग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या प्रदर्शनात भारतातील 13 राज्यामधून 1060 विद्यार्थ्यांनी 699 विज्ञान प्रयोग प्रदर्शित केले. आता पर्यन्त या ऑनलाइन प्रदर्शनाचे 40000 पेक्षा जास्त views झाले आहेत. आपणही आपल्या मुलांना दाखवा. Growing Dots app डाउनलोड करा. लिंक : https://bit.ly/3e2QQyB

या कार्यक्रमाला Dr. Afroz Chishti, Director, Geological Survey of India (GIS), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबत Prof. Ishwara Chandra (Dean, GMRT), Dr. J. K. Solanki (Head A&F, NCRA) आणि Shri. A. B. Jondhale (Administrative Officer, GMRT)उपस्थित होते.

त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


D P Road
Pune
411007