Amol Buchade

Amol Buchade

Share

23/01/2026

हिन्दुहृदयसम्राट शतशःनमन 🙏🏻

Photos from Amol Buchade's post 17/08/2025

आज भरे मुळशी या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आमदार श्री शंकर मांडेकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे साहेब तहसीलदार श्री विजयकुमार चौबे तसेच तालुका क्रीडा अधिकारी व मुळशी तालुक्यातील सर्व कुस्ती पदाधिकारी व कुस्ती शौकीन उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली भविष्यामध्ये कुस्ती संकुल बांधल्यानंतरही ती चालवण्याची मोठी जबाबदारी मुळशीकरांवर आहे व ती महत्त्वाचे आहे असे सांगून त्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठीच्या अडचणी मुळशी तालुक्यातील पदाधिकारी कुस्ती शौकीन व शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडल्या . तसेच या संकुलासाठी भरघोस काम करणारे शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचे आभार मानले भविष्यामध्ये नक्कीच मुळशी तालुक्याचा क्रीडा क्षेत्राचा आलेख वाढेल ही अपेक्षा व्यक्त केली.

Photos from Amol Buchade's post 15/08/2025

७९ वा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, दुर्गप्रेमी प्राध्यापक व इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशनचे संचालक माननीय मिलिंद शिरसागर सर यांच्या हस्ते आकांक्षा इंटरनॅशनल स्कूल येथे ध्वजारोहण पार पडले.
या वेळी तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी प्रथमच अमोल बुचडे कुस्ती अकादमी आणि आकांक्षा इंटरनॅशनल स्कूल यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. किसन बुचडे, रामदास बुचडे, कपिल बुचडे, शाळेचे प्राचार्य, इतर शिक्षकवर्ग व पालकवर्ग उपस्थित होते.
मिलिंद शिरसागर सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. लहान विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
तसेच, अमोल बुचडे कुस्ती अकादमीचा आशियाई रौप्य पदक विजेता पैलवान दिनेश मालपोटे आणि अमोल बुचडे व्हॉलीबॉल क्लबचा आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडू कुमार आलोक तोडकर या दोघांचा सत्कार समारंभ देखील पार पडला.
#स्वातंत्र्य_दिन

12/08/2025

केंद्रीय क्रीडा मंत्री माननीय मनसुख मांडवी यांनी क्रीडा धोरण विधेयक पास केले, याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. बऱ्याच दिवसांनंतर क्रीडा क्षेत्रावर एखादी महत्त्वाची कायदे-निर्मिती प्रक्रिया पार पडली, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.

गेल्या काही काळापासून अनेक क्रीडा संघटना आणि खेळाडूंवर कोणतेही प्रभावी नियंत्रण नव्हते. या धोरणामुळे क्रीडा प्रशासनात शासनाची जबाबदारी आणि पारदर्शकता येईल. तसेच, राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना होणार असून, भ्रष्टाचारमुक्त संघटनांची हमी हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. खेळाडूंच्या हक्कांचे संरक्षण आणि भारतीय क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करून ते जागतिक पातळीवर नेण्याचे सर्व नियोजन या धोरणात करण्यात आले आहे.

माननीय क्रीडा मंत्र्यांनी वेदांमध्ये खेळाचे महत्त्व सांगून, आपल्या खेळ संस्कृतीची प्राचीन परंपरा अधोरेखित केली. सध्या खेळामध्ये डोपिंग हा गंभीर विषय बनला असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा उभारण्याची तरतूदही या विधेयकात नमूद आहे. निःसंशयपणे, या विधेयकामुळे येत्या काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

थोडे खेदाची बाब म्हणजे, हे विधेयक पास होताना विरोधी पक्ष उपस्थित नव्हते. हा मुद्दा राजकीय हेतूने मांडण्याचा माझा उद्देश नाही, पण विरोधक उपस्थित असते, तर या विधेयकावर अधिक सखोल चर्चा होऊ शकली असती. तसेच, काही राहिलेल्या उणिवा दूर करण्यास मदत झाली असती. माननीय मंत्र्यांनी विधेयक तयार करताना विविध तज्ञांचा सल्ला घेतल्याचे सांगितले, तरी सदनात विरोधकांचा सहभाग राहिला असता, तर ते सर्वसमावेशक स्वरूपात पारित झाले असते.

सरकारने हे विधेयक पारित केले, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि खास करून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांचे आणि अपेक्षा करतो की या विधेयकाची अंमलबजावणी योग्य वेळी होईल. कारण खेळाडूंचे वय पुढे सरकत असते आणि त्यांना त्या योग्य वयातच सुविधा मिळाल्या, तरच ते सर्वोत्तम कामगिरी करू शकतात.
🇮🇳

Photos from Amol Buchade's post 08/07/2025

काल बिस्किक किरगीस्तान या ठिकाणी पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये अमोल बुचडे कुस्ती अकादमीचा मल्ल व मयूर कलाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुरस्कृत पैलवान दिनेश उर्फ बाबू मालपोटे याने 57 किलो फ्रीस्टाइल गटामध्ये रौप्य पदक मिळवले. दिनेश मालपोटे हा मुळशी मधील कातरखडक या गावचा असून लहानपणापासून तो कुस्ती अकादमीचा व मयूर कलाटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेचा मानधनधारक खेळाडू आहे. या संस्थेने आतापर्यंत बरेच खेळाडूंस सहकार्य केले असून दिनेश हा देखील या संस्थेची देण आहे असे म्हणावे लागेल दिनेशच्या या कर्तबदारीची पंचक्रोशीत व सबंध महाराष्ट्रात चर्चा आहे .
अशाप्रकारे अमोल बुचडे स्पोर्ट फाउंडेशन मधील हे कुस्ती मधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरे मेडल असून चालू वर्षी भारतीय व्हॉलीबॉल टीम मधील कुमार अलोक तोडकर यांनी देखील भारतीय संघाचा सदस्य होऊन कावा कप व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कास्यपदकाची कमाई केली स्पोर्ट्स फाऊंडेशनची स्थापना केल्यानंतर आज पर्यंत बरेच खेळाडू राष्ट्रीय वर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहे येत्या काही वर्षात आम्ही नक्कीच ऑलम्पिक पदकापर्यंत मजल मारू आशी आशा आहे दिनेश व त्याचे पालक यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

24/06/2025

खरंच जनतेच्या मनातलं बैलगाडा क्षेत्रातील हिंदकेसरीच मैदान पेडगाव
परवाच पेडगावच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान पाहण्याचा योग आला. बरेच दिवस लहान-मोठी मैदानं मी पाहिली होती, पण पुसेगाव-पेडगावचं हे मैदान मला पाहता आलं नव्हतं. जाणीवपूर्वक वेळ काढून मी पेडगाव मुक्कामी पोहोचलो. पोहोचल्यावर जवळपास दोन किलोमीटर लांबच गाडी लावावी लागली. तिथून दिसणारा जनसागर पाहून मी माझ्या कुस्तीच्या दिवसांत गेलो. मैदानात लढणाऱ्याला गर्दीची भीती नसते, उलट त्या उत्साहाने अंगातच ऊर्जेची लहर उठते. अशाच ऊर्जेने भरून मी मैदानापर्यंत पोहोचलो.

शर्यतीच्या दहा लेन आणि समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय पाहून मला कुस्तीच्या कुंडलच्या मैदानाची आठवण झाली. त्या वेळीसारखीच बसण्याची व्यवस्था इथेही होती. परंतु इथली व्यवस्था व मैदान यांचं मोल वेगळंच होतं. जवळपास 700 मीटर लांबीची शर्यत लेन होती. सुरुवातीला मी डोंगराच्या पायथ्याशी उभा राहून शर्यत पाहिली. तिथून पाहण्याचा आनंदच वेगळा होता.

शर्यतीच्या अंतिम रेषेवर गाड्या पोहोचल्यावर त्या प्रेक्षकांच्या दिशेने परत यायच्या. प्रेक्षकांना त्या गाड्या जवळून पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता. त्यामुळे अनेक प्रेक्षक अंगावर गाडी येईल याची तमा न बाळगता गर्दीत उभे होते. तुम्ही पाहत असालच, की शर्यत सुरू झाल्यापासून गाडीचा वेग वाढतच जातो, आणि शेवटी तो थेट प्रेक्षकांच्या दिशेने जातो. तरीही दिवसभर प्रेक्षक तिथे ठाण मांडून होते. थोडासा पाऊस झाला तरी कोणीही हलत नव्हतं. प्रत्येक प्रेक्षकाच्या डोक्यावर रुमाल असायचा, आणि त्याच्या तोंडावर नंदीप्रेम स्पष्ट दिसायचं.

मी त्या प्रेक्षकांमध्ये बसल्यावर काही कुस्तीपटू मुलांनी मला ओळखलं. काही प्रेक्षक माझ्याकडे अशा नजरेने बघत होते, जणू काही मी कुठेतरी पाहिलेला आहे. माझ्यासोबत मालगावचे सुनील कदम आणि विट्याचे पैलवान अभिजीत पाटील होते. त्यांनी संयोजन समितीकडे सांगून मला व्हीआयपी स्टेजवर बसण्याची विनंती केली. त्यामुळे मला पूर्ण दिवसभर शर्यतीचा आनंद घेता आला.

आयुष्यातला हा पहिलाच दिवस होता, जेव्हा मी दिवसभर फक्त बैलगाडा शर्यती पाहत होतो, आणि तरीही मन भरत नव्हतं. त्या ठिकाणी शेतकरी वर्गच नव्हे, तर तरुण मुलं आणि महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या तोंडून आमच्या सुसकरांच्या मोईलचा“बकासुर”,मुंबईच्या राहुलभाईचा “मथुर”, “हरण्या”, “चिमण्या”, “रुद्र”, “सर्जा”,आमच्या मांगडे तात्यांचा “सुंदर”अशी नंदींची नावं ऐकायला येत होती. त्या ही महिला आपल्या घरचा नंदी शर्यतीसाठी तयार करीत होत्या, म्हणून त्या सुद्धा नंदीप्रेमाने मैदानात आलेल्या होत्या. आसेच जनतेच्या मनातले हीरो “चांडाळ चौकडीच्या करामती”या यु ट्युब वरील सुप्रसिद्ध मालिकेतील बाळासाहेब, रामभाऊ हे देखील शर्यत पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

शर्यतीच्या माध्यमातून दिवसभराचा सुंदर अनुभव मला मिळाला. जवळपास 1000 बैलगाड्यांची नोंद होती. तीन वाजेपर्यंत सर्व गाड्या पळाल्या. त्यानंतर शंभर गाड्यांची सेमी फायनल आणि त्यानंतर अंतिम फेरी झाली. मोरे सरकार यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं होतं.

जवळपास 70 वर्षांचा इतिहास असलेलं पेडगावचं मैदान यावेळी 1000 गाडी मालकांच्या उपस्थितीने गजबजलेलं होतं. 2000 नंदींनीशर्यतीत भाग घेतला होता . हे दोन आकडे पुरेसे आहेत एक दिवसाचं अर्थकारण समजून घ्यायला आपल्याला .या ठिकाणी शेंगदाणे विकणाऱ्यापासून थाळी देणाऱ्या हॉटेलपर्यंत प्रत्येकासाठी काम होतं. बैलाच्या वैरणीपासून ते शेण उचलणाऱ्यांपर्यंत सर्वांच्या श्रमांना इथे स्थान होतं. हे सर्व लोक आपलं काम आनंदाने करत होते.

आपला नंदी जिंकल्याचा आनंदाश्रू आणि हरल्याची हुरहुर अशा दोन्ही भावना मी गाडा मालकांच्या चेहऱ्यावर पाहिल्या. नंदीने भाग घेतला म्हणून नाचणारे मालकही दिसले. युट्युबसाठी काम करणारे अनेक लोक तिथं होते, त्यांचाही रुबाब आणि महत्त्व पाहायला मिळालं. समालोचकांच्या आवाजातली जादू आणि त्यांची बुद्धिमत्ता देखील जाणवली.

निकालासाठी दोन्ही बाजूंना कॅमेरे, ड्रोनचा वापर करण्यात आला होता. तक्रारी लगेच मिटवल्या जात होत्या, फोनवरून मान्यवरांचे मत विचारून निर्णय होत होते. ही पारदर्शकता फारच कौतुकास्पद होती. या क्षेत्रात मान-सन्मान जपण्याची एक वेगळीच शिस्त मला पाहायला मिळाली.

सेमी फायनलमध्ये मुळशीचा बकासुर आणि मुंबईचा मथुर यांच्यातली चुरशीची शर्यत मन प्रफुल्लित करून गेली. मात्र बकासुर हरल्याचं दुःखही वाटलं. अंतिम फेरीसाठी संयोजकांनी ज्या पद्धतीने तक्रारी सोडवल्या आणि निर्णायक सामना घेतला, तो खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा होता.

महाराष्ट्राची कुस्ती आणि बैलगाडा शर्यत ही एक मोठी परंपरा आहे. ती शेतकऱ्यांनी जपलेली आहे, आणि ती जपण्याचा अधिकार त्यांचा आहे. खेडोपाड्यांत जाऊन पाहिलं, तर खरी आनंदी माणसं ही इथंच सापडतात. शहरांमध्ये फक्त स्वप्नांच्या मागे धावणारे लोक आहेत, पण खेड्यातील माणसं प्रत्यक्षात ते स्वप्नवत जीवन जगतात.
बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष दिलीप शेवाळे, विनायक शेठ लेंगरे, पैलवान आनंदआप्पा रेठरे आणि संदीपभाई भोपर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही सर्व माणसं शर्यतप्रेमी, बैलगाडा प्रेमी आहेत. ते अतिशय आनंदात ही शर्यत पाहत होते.

पेडगावचं मैदान यशस्वी करणारे सुनील मोरे सरकार यांच्याशीही थोडक्यात ओळख झाली. या ठिकाणी संयोजन समितीने माझा सत्कार केला, त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे. माझे कुस्तीक्षेत्रातील सहकारी व आत्ता बैलगाडा क्षेत्रात मोठे काम करणारे पै. विलास देशमुख यांची मैदानात भेट झाली नाही म्हणुन दुसर्या दिवशी वाई, पांडेवाडी येथे आमचे मित्र चंद्रशेखर शिंदे यांचे घरी निवांत भेट घेतली व बैलगाडा विषयावर मनमोकळ्या तासभर गप्पा केल्या.

फायनलमध्ये एक नंबर करणाऱ्या साहिल प्रतिष्ठान डोरलीकरांचा ‘हरण्या’ आणि शिरसवाडीचा ‘रायफल’ – या दोघांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच संयोजन समितीचंही मनापासून अभिनंदन करतो. बैलावर जीव ओवाळून टाकणारी माणसं,मुक्या जनावराला घरच्या माणसासारख जपणार्या महिला. हेच खर आपल्या महाराष्ट्राच वैभव आहे.

इतकी मोठी, अशक्यप्राय वाटणारी शर्यत तुम्ही काही तासांत यशस्वीपणे पार पाडलीत, याचं माझ्या मनात फार मोठं कौतुक आहे

22/06/2025

नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात आज अमोल बुचडे कुस्ती अकादमी चे मल्ल दर्पन चौधरी ६२ किलो व राहुल सातकर ८५ किलो यां दोधांनी ही रौप्य पदकाची कमाई केली.
दोघांनांही थोडक्यात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. पुढील वर्षी नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान कामगिरी करतील ही खात्री आहे. सर्व कोचेस व मार्गदर्शकांचे ही अभिनंदन.या राष्ट्रीय स्पर्धेत अमोल बुचडे कुस्ती अकादमीस १ सुवर्ण व २ रौप्य पदके प्राप्त झाली 🎉💐

Want your business to be the top-listed Event/venue in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune