Maharashtra Energy Development Agency
of Maharashtra implementing New & Renewable Energy initiatives The oil shock of late 1970s prompted energy planners world over to look for alternative sources of energy. Proper utilization of renewable energy such as solar, biomass, wind etc., once again started capturing the imagination of mankind. It was realized that sustainable development of the country called for growth of energy sector with
06/07/2026
तुमचं वीज बिल हे फक्त एक आकडा नसतो. तो तुमच्या प्रत्येक सवयीचा हिशोब असतो. AC १८°C वर चालू ठेवणं. अर्ध्या कपड्यांसाठी वॉशिंग मशीन वापरणं. चार्जर वापरून झाल्यानंतरही प्लगमध्येच ठेवणं. अशा प्रत्येक छोट्या सवयीची नोंद तुमचं वीज मीटर ठेवत असतं आणि महिन्याच्या शेवटी त्याचा परिणाम वीज बिलातून दिसून येतो. महाऊर्जाच्या '६ सवयींच्या होम ऑडिट' द्वारे स्वतःच्या ऊर्जा वापराचा आढावा घ्या. प्रत्येक सवयीसाठी स्वतःला गुण द्या आणि ६० पैकी तुमचा स्कोअर जाणून घ्या. कारण तुम्ही आज जेवढी बचत करू शकता आणि प्रत्यक्षात जेवढी करत आहात, त्या दोन्हीतील फरकही मोजता येतो. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा!
शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतींच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल. महाऊर्जा आणि EESL यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कमी-कार्बन इमारत संक्रमण व ऊर्जा कार्यक्षमता क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात वास्तुविशारद, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, ऊर्जा लेखापरीक्षक, सल्लागार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेत ऊर्जा कार्यक्षम व शाश्वत बांधकामाविषयी विचारांची देवाणघेवाण केली. ज्ञान, सहकार्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून अधिक हरित आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न.
Building the future starts with building better. In collaboration with EESL, MEDA organized the ALCBT Capacity Building Training Programme on Low-Carbon Buildings Transition and Energy Efficiency, bringing together architects, builders, energy auditors, consultants, and industry experts to exchange knowledge on sustainable building practices and energy-efficient design. Together, we are enabling the transition towards a greener, more resilient built environment.
01/07/2026
आज, दि. २७ जून २०२६ रोजी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांनी ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL) यांच्या सहकार्याने महाऊर्जा मुख्यालय, पुणे येथे कमी-कार्बन इमारत संक्रमण व ऊर्जा कार्यक्षमता विषयक क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (ALCBT) यशस्वीपणे आयोजित केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात वास्तुविशारद, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, ऊर्जा लेखापरीक्षक, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. ऊर्जा कार्यक्षम इमारतींची रचना, शाश्वत शीतकरण तंत्रज्ञान, हरित सार्वजनिक खरेदी, ऊर्जा सेवा कंपनी (ESCO) व्यवसाय प्रारूपे तसेच उदयोन्मुख कार्बन बाजारपेठ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच "कमी-कार्बन इमारतींच्या भविष्याची दिशा" या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये शाश्वत, ऊर्जा कार्यक्षम आणि हवामान बदलास अनुकूल इमारतींच्या उभारणीसंदर्भात तज्ज्ञांनी विचारमंथन केले. ज्ञानाची देवाणघेवाण, तांत्रिक सहकार्य आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सहभागातून ऊर्जा कार्यक्षम, कमी-कार्बन आणि शाश्वत बांधकाम क्षेत्राच्या दिशेने सामूहिक बांधिलकी अधिक दृढ करण्यास या कार्यक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Today, 27th June 2026, the Maharashtra Energy Development Agency, in collaboration with EESL, successfully organized the ALCBT Capacity Building Training Programme on Low-Carbon Buildings Transition and Energy Efficiency at MEDA Headquarters, Pune. The programme brought together architects, builders, energy auditors, consultants, and industry experts to explore practical approaches to energy-efficient building d esign, sustainable cooling technologies, green public procurement, ESCO business models, and emerging carbon markets. The event also featured an engaging panel discussion on "Envisioning the Future for Low-Carbon Buildings," encouraging meaningful dialogue on advancing sustainable and climate-resilient infrastructure. Through knowledge sharing and technical collaboration, the programme reaffirmed a shared commitment to accelerating the transition towards sustainable, low-carbon, and energy-efficient buildings.
19/06/2026
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महाऊर्जा मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष ध्यानधारणा व नाडीशास्त्र मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सहजयोग प्रतिष्ठान, पुणे यांच्या श्रीमती माधुरी राशिणकर उपस्थित होत्या. त्यांनी ध्यानधारणा, चक्रांविषयी माहिती तसेच नाडीशास्त्राचे महत्त्व यावर मार्गदर्शन करत सहभागीांना अंतर्मनाशी जोडणारा आणि मानसिक संतुलन साधण्याचा अनुभव दिला. योग, ध्यान आणि आत्मजागरूकतेच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्याचा संदेश देणारे हे सत्र सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
On the occasion of International Yoga Day, MahaUrja organized a special meditation and Nadi Shastra guidance session for its officers and employees. The session was led by Chief Guest Smt. Madhuri Rashinkar of Sahajyog Pratishthan, Pune, who shared valuable insights on meditation, chakra awareness, and the significance of Nadi Shastra in achieving inner balance and overall well-being. Promoting the values of yoga, mindfulness, and self-awareness, the session encouraged participants to embrace a holistic approach towards physical, mental, and emotional wellness.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Website
Address
Pune
411007
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 10am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |