Shabda

Shabda

Share

Photos from Shabda's post 16/08/2025

संगीत देवबाभळी

एव्हाना परेश रावल यांनी कौतुक केल्यामुळे सगळेच प्रयोग बऱ्यापैकी हाऊसफुल्ल सुरू असलेलं मराठी नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’ एवढीच ती माहिती होती…तसंही ओढून ताणून सुरू असलेल्या कॅामेडी नाटकांनी रसभंग केल्यामुळे वेगळं काहीतरी बघायला मिळावं या अपेक्षेने हे नाटक बघायचं ठरवलं…
नाटकाची ४ वेगवेगळ्या ठिकाणची तिही balcony मधली तिकीट्स मिळाली, नाट्यगृह प्रेक्षकांनी भरलं होतं.

नाटकाची सुरूवातच होते सुरस अभंगाने! हळूहळू नाटक खुलायला लागते. पांडूरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या तुकोबांची पत्नी अवली आणि साक्षात पांडूरंगाची अर्धांगिनी रखुमाई या दोघींची त्या पांडूरंगानेच घडवून आणलेली भेट.
तुकोबांनी संसारावर तुळशीपत्र ठेवल्यामुळे संसाराचा गाडा ओढणारी अवली, सुखसौख्याचा त्याग करून तुकारामांची सावली बनून राहणारी अवली, पदरी आलेल्या हालअपेष्टा सहन करणारी अवली, मुखी देवाचं नाव पण तेही सरळ नाही, देवाशी भांडण करून जाब विचारण्यासाठी आतुर असलेली अवली…
पांडुरंगावर युगानुयुगे रूसून बसलेली रखुमाई, पांडुरंगावर निस्सीम प्रेम असलेली रखुमाई, नवऱ्याला कोणी बोल लावले तर सामान्यांसारखी चिडणारी रखुमाई…

या दोघींचा जगण्याकडे पहायचा दृष्टीकोन, पडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं या सगळ्याचा प्रवास म्हणजे संगीत देवबाभळी!
मिश्किल संवाद, कथा जुन्या काळातली असली तरी प्रवाही कुठेही रटाळ न वाटतां तुम्हाला आपलंस करून घेते लेखक, दिग्दर्शक प्राजक्त याच्या चोख कामाची ही पावती आहे…खणखणीत आवाज, आवाजाचा throw आणि समोर भरगच्च प्रेक्षक असताना कसलंही दडपण न घेता सुरांची धार कमी न होऊ देता ताकदीने अवली ची भूमिका साकारणारी शुभांगी सदावर्ते…सुरेल आवाजात अभंग सादर करत, द्विधा अवस्थेत असलेली रखुमाई उत्तम अभिनयाच्या जोरावर उभी करणारी मानसी जोशी…अभिनय आणि अभंग समोर बसून अनुभवणं ही एक पर्वणी आहे! खुप कौतुक.
आनंद भाटे यांच्या अभंगानी तुकारामांचा आभास निर्माण केला आहे तो शब्दांत मांडता येणार नाही…

मुद्दमून उल्लेख करावासा वाटतो तो प्रकाशयोजना (प्रफुल्ल दीक्षित) आणि संगीताचा (आनंद ओक) इंद्रायणी काठी बसल्याचा भास होतो क्षणभर, संधीप्रकाश, पावसाच्या सरी सगळंच अनुभवल्यासारखं खरंखुरं…काही अभंग नवीन( न ऐकलेले)आहेत पण साजेसे आहेत! नेपथ्यही (प्रदीप मुळ्ये)कथेला नक्कीच वेगळी उंची देतं! एकूणचं केवळ दोघींच्या जीवावर नाटक उभं करणं, जूना काळं जिवंत करणं, त्यातही संगीत नाटकं आजच्या reels च्या दुनियेत ही reality मांडण हे निर्मात्यांनी प्रसाद आणि कविता कांळी यांनी पेललेलं शिवधनुष्य आहे!! सगळ्या टीम ला अनेक शुभेच्छा!!

रसिक प्रेक्षकांनी वेगळा अनुभव घेण्यासाठी आवर्जून पहावं असं उत्तम नाटक ‘संगीत देवबाभळी’!!

समिरा दीक्षित

Photos from Shabda's post 22/06/2025

Visiting Mai Bal Bhavan,Mamurdi on my birthday brings me immense joy. Founded by Mai Deshpande—this home offers love and care to visually impaired and orphaned girls. After her sudden deo, her husband Mr. Ingale Sir has continued her noble mission with the same heartfelt dedication.

Spending time with these incredible girls and celebrating special moments with them is always a blessing. Despite facing daily struggles, limited resources, and lack of funding—even for essentials—these girls continue to rise with determination and hope.

I’m proud to share that the Mai Bal Bhavan football team recently won the runners-up trophy at the national level and is now preparing for the International Blind Football Championship.

I humbly request you to come forward and support them. Your small help can bring a big smile to their faces and brighten their future.

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Yashwantrav Chavan Natygruh
Pune
411038