Bhaashaa Foundation

Bhaashaa Foundation

Share

24/05/2025

"मी गुजराती असले, तरी मला मराठी भाषा खूप आवडते."

"ह्या पुस्तकाचं कव्हर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी हे पुस्तक घेतलं.”

”आम्हाला मराठी भाषा ऑलिंपियाड परीक्षा खूप आवडते. ती परीक्षा घेणाऱ्या ‘भाषा फाउंडेशन’ चा स्टॉल इथे बघून फार मज्जा वाटली.”

“ पुस्तक लिहिणाऱ्सा लेखिकेची सही पुस्तकावर घ्यायला किती भारी वाटतं!”

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५ या कार्यक्रमातील 'भाषा' पुस्तक स्टॉल ला भेट दिलेले पालक असो की मुलं, या उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे "कोण म्हणतं मुलं वाचत नाही?" या प्रश्नाला दिलेलं उत्तरच.

“भाषा फाउंडेशन”च्या स्टॉल ला भेट देऊन बालवाचकांच्या आवडत्या लेखिका स्वाती राजे यांच्याशी संवाद साधा!

“भाषा फाउंडेशन”
स्टॉल नं. ७०

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५
२२ ते २५ मे २०२५

गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट पुणे

Photos from Bhaashaa Foundation's post 27/02/2025

मराठी 'भाषा' ऑलिंपियाड दशकपूर्ती कौतुक सोहळा.

इयत्ता ३ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी 'भाषा' ऑलिंपियाड परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

भाषा फाउंडेशन आयोजित मराठी 'भाषा' ऑलिम्पियाड चे हे १० वे वर्ष आहे. त्यास महाराष्ट्र व गोव्यातील १०,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 'भाषा’ चे विश्वस्त जयदीप राजे, रणजित नाईकनवरे तसेच ‘भाषा’ चे सल्लागार व रिअर ॲडमिरल ( निवृत्त)आशिष कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदक वितरण करण्यात आले.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


C-9, Renuka Complex, Jangli Maharaj Road, Deccan Gymkhana
Pune
411004