Mulyavardhan

Mulyavardhan

Share

Our vision is to ensure that all children get an education that will help them become caring, responsible and productive citizens. Our primary strategy is to leverage the entrepreneurial energies and social commitment of our founder, and the expertise of like-minded professionals from several fields, to develop and deliver empowering solutions for schools and their stakeholders.

जुन्या-नव्या गोष्टी | गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात | गोष्ट पहिली – ऐक्य 11/05/2026

चला, गोष्टींच्या जगात हरवूया! 🎞️

शाळेच्या उन्हाळी सुट्टीदरम्यान शांतिलाल मुथ्था फाउंडेशन घेऊन आले आहे... ‘जुन्या-नव्या गोष्टी!’ ✨

आपण लहानपणी ज्या गोष्टी ऐकल्या, त्याच आता नव्या रूपात मुलांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी या गोष्टींना आपला आवाज दिला आहे.

पहिली गोष्ट आहे, ‘ऐक्य’. एकीचे बळ सांगणारी ही गोष्ट मुलांच्या मनावर नक्कीच सकारात्मक परिणाम करेल.

🌿 पालक आणि शिक्षक मित्रांनो, हा व्हिडिओ स्वतः पहा आणि आपल्या इतर ग्रुप्समध्येही नक्की शेअर करा. मुलांना यातून काय शिकायला मिळालं, हे त्यांच्याशी गप्पा मारून नक्की जाणून घ्या!

🎞️ गोष्ट पाहण्यासाठी लिंक: https://youtu.be/gekYGznH9is

जुन्या-नव्या गोष्टी | गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात | गोष्ट पहिली – ऐक्य मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्यासाठी आणि त्यांच्या मनात मूल्यांचे बीज पेरण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन...

27/04/2026

आमची शाळा, मूल्यवर्धित शाळा... 🏫

#मूल्यवर्धन ३.० अंतर्गत जि. प. मराठी प्राथमिक शाळा, पिंप्री काथरगाव, केंद्र वरवट बकाल, ता. संग्रामपूर, जि. #बुलढाणा इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीला आकर्षक रूप दिलं आहे. 🎨

सहशिक्षक कुलदीप बुंदे आणि विद्यार्थ्यांनी वर्गनियम तयार केले आणि तेच नियम रंगांच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी भागावर साकारले! तसेच स्वच्छता, शिस्त, योग, दिवसांची ओळख, भारताचे संविधानाची उद्देशिका भिंतीवर प्रभावीपणे रेखाटले असून ही भिंत सर्वांचे लक्ष खिळवून ठेवत आहे. ✨

24/04/2026

उत्साह, सहभाग आणि मूल्यांची सुंदर संगत 🌼

#गोवा राज्यातील बिचोलीम तालुक्यातील मूळगाव येथील सरकारी पूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाडफे, डिचोलीच्या शिक्षिका निशा वामन कवठणकर यांनी #मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल व्यक्त केलेले विचार प्रेरणादायी आहेत. ✨

काही कारणास्तव मूल्यवर्धनचे औपचारिक प्रशिक्षण घेता आले नसूनही त्या आपल्या वर्गात नियमितपणे #मूल्यवर्धन कार्यक्रमाचे उपक्रम घेतात, तेही पूर्ण उत्साहाने! कारण त्यांना ठाम विश्वास आहे की, हा कार्यक्रम मुलांच्या शिक्षण प्रक्रियेसोबतच त्यांच्या विचारांमध्ये, वर्तनात आणि जीवनदृष्टीतही सकारात्मक बदल घडवतो. आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि योग्य निर्णयक्षमता यांसारखी मूल्यं मुलांमध्ये हळूहळू रुजताना त्या अनुभवत आहेत.

मुलं आणि शिक्षकांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम मुलांच्या भविष्यासाठी मजबूत पाया घालतो आहे. मुलांनी आज शिकलेली ही मूल्यं त्यांना उद्याच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतील. हीच खरी मूल्यवर्धनाची ताकद! 🙌

शिक्षिका निशा कवठणकर यांचे अनुभव नक्की वाचा. 📝

Mulyavardhan 3.0 22/04/2026

मूल्यवर्धन उपक्रम । एक प्रात्यक्षिक...

#मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी एक प्रात्यक्षिक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिक्षकांनी घेतलेले सर्व टप्पे स्पष्टपणे दिसतील. हे प्रभावी प्रात्यक्षिक इतर शिक्षकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

📝 उपक्रम: बरोबर की चूक!
📍 इयत्ता: ३री
👩‍🏫 शिक्षिका: संगिता भास्कर मराठे
🏫 शाळा: जि.प.प्रा. शाळा, वारगाव (बेटावद), ता. शिंदखेडा, जि. #धुळे

शिक्षकांसाठी उपयुक्त, विद्यार्थ्यांसाठी आनंददायी! ✨
व्हिडिओ आवडल्यास इतर शिक्षकांसोबत नक्की शेअर करा. 🌱
https://youtu.be/PHOlF2mPjqg

Mulyavardhan 3.0 1 like, 1 comment. "मूल्यवर्धन उपक्रम । एक प्रात्यक्षिक..."

15/04/2026

जागतिक कला दिनानिमित्त, छोट्या कलाकारांकडून खास भेट! 🎨

महाराष्ट्रभरातील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या #मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यांसाठी पोस्टर्स तयार केली. मूल्यवर्धन विषयक ४,५०० हून अधिक पोस्टर्स विविध जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आली. त्यापैकी काही निवडक पोस्टर्सची ही खास झलक...

साधेपणातली भावना आणि मनाला भिडणारी अभिव्यक्ती, नक्की बघा. ❤️

लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shantilal Muttha Foundation (SMF), Level 8, Muttha Chambers II, Senapati Bapat Road
Pune
411016

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm