Meme world

Meme world

Share

01/01/2025

▪️ही अद्भुत गोष्ट आहे इतिहासाच्या पानांमधून हरवलेल्या एका राजघराण्याच्या अंताची; आपल्या पित्याला बिंबिसार राजाला कैदेत ठेऊन त्याचं साम्राज्य हडपून स्वतःच्या अधिपत्याखाली आणणाऱ्या बुद्धकालीन मगधसम्राटाची, अजातशत्रूची ही थरारक कथा!▪️
▪️ह्या काळात एक क्रूर घटना नोंदवली गेली. मगधसम्राट बिंबिसाराचा खून त्याच्या स्वतःच्याच मुलाने केला. दानशूर आणि प्रजाप्रेमी असलेल्या बापाला मुलाने हालहाल करून मारून टाकलं. आणि मगध साम्राज्याच्या सिंहासनाला रक्ताभिषेक घालून स्वतः गादीवर बसला. त्या खुनी मुलाचं नाव अजातशत्रू ! ह्यामुळे अजातशत्रूच्या नावासोबत क्रूरकर्मा हा शब्द चिकटला तो कायमचाच.▪️
▪️पण हे वैचित्र्य इथंच थांबलं नाही. पुढे अजातशत्रूच्या मुलानेही सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा बळी घेतला. हे पिढ्यानपिढ्या चालतच राहिलं. अक्षरशः निर्वंश होईपर्यंत..▪️
▪️ह्या विचित्र क्रौर्यमालिकेची सुरुवात कशी झाली ह्याची ही प्राचीन कहाणी.▪️

कादंबरी - अजातशत्रू
लेखक - सुमेध
प्रकाशक - कॉस्मिक पब्लिकेशन, पुणे
किंमत - 380 रू (सवलत किंमत 340 रू घरपोच)
संपर्क - 090210 77066

12/08/2024

निळावंतीची मूळ पोथी आणि आख्यायिकेचा खऱ्या घटनांशी संबंध सांगणारी अद्भुतकथा.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.

अलीकडच्या काळात, १९९२साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती' या कादंबरीमध्ये.

कादंबरी - महामाया निळावंती
पाने - 372
किंमत -350/- (घरपोच पोस्टल चार्जेस फ्री)
प्रकाशक - Cosmic Publication
घरपोच मागविण्यासाठी संपर्क करा - 090210 77066

25/03/2023

Post the most recent photo you have downloaded.

02/06/2021

Which is your favourite Avenger?

26/04/2021

िंकलस_भावा
भारत देशाशी याचा काही संबंध नाही, ही त्याची मायभूमी नाही,
त्याचा संबंध फक्त क्रिकेट खेळण्यापुरता. ते खेळायचं अन निघून जायचं एवढंच त्याचं काम.
भारतात कोरोना केसेस जास्त वाढतायत म्हणून याचे अनेक सहकारी भारत सोडून गेलेत.

हा वेगळा आहे. इथल्या लोकांचा ऑक्सीजन अभावी होणारा मृत्यू पाहून आतल्याआत हाही कुठंतरी कुरतडत होता. अन हे मृत्यू थांबावे म्हणून याने आज तब्बल 50 हजार डॉलर्स दिलेत. 40 लाखाच्या आसपास.
या 40 लाखात कमीतकमी 400 ऑक्सीजन सिलेंडर येतील ज्यातून कमीत कमी 10 हजार भारतीयांचे जीव वाचतील..!!

पॅट कमिन्स,
तू खूप मोठा आदर्श निर्माण केलायस..! तुझ्यामुळे अजून कित्येक भारतीय आणि बाहेरील खेळाडू पुढे येतील... हा देश कर्मभूमी समजून इथल्या लोकांचा प्राण वाचवायला मदत करतील..!

Super Proud..



सचिन अतकरे.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Pune