Weekly pune post

Weekly pune post

Share

22/09/2024

पुणे पोस्ट दिवाळी 2024
अंकात काय वाचाल?
🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱
पुणे पोस्टचा यंदाचा बारावा दिवाळी अंक आहे. या वर्षी प्रथमच अंकात विशेष विभाग निर्माण करून एखाद्या सामाजिक विषयावर चर्चा करण्याचा निर्णय संपादकांनी घेतला आहे. या वर्षी ‘शेतकरी समजून घेताना...’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या नागरी समाज का समजून घेत नाही याविषयी लिहिताहेत शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते संपत मोरे, शेतकऱ्यांना समजून घेतलेले शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन, सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिवा, आणि ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या जाणिवा, अभ्यास आणि कार्यावर लिहिताहेत ऋता बावडेकर, शेतकरी कुटुंबाचे अर्थकारण मांडले आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी. ओला आणि सुका दुष्काळाच्या व्यथा-वेदनांची जाणिव करून देत आहेत हिंमत पाटील, तसेच शेतकरी स्त्रीयांविषयी लिहिताहेत कल्पना दुधाळ, धरणग्रस्तांचे प्रश्न मांडत आहेत कवी आणि पूर्व शासकीय अभियंता शिवाजी चाळक. कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिले आहे पत्रकार संजय परब यांनी. शेतकरी समस्यांचा समग्र उहापोह करणारा पूर्व संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा लेखही वाचनीय आहे. तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वतंत्र भारतातील शेतकरी चळवळ आणि राजकारणाचे आकलन केले आहे प्रसिद्ध पत्रकार हेमंत देसाई यांनी. तसेच इंद्रजीत भालेराव यांनी ‘दो बूंद पानी’ या कृषिप्रधान चित्रपटावर लिहिले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक-कवी ऐश्वर्य पाटेकर यांची शेतकरी आत्महत्येवरील उत्कृष्ट कथा अंकात समाविष्ट आहे. याच विषयाच्या अनुषंगाने प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, केशव सखराम देशमुख आणि दासू वैद्य यांच्या काव्यांजली हा विशेष कवितांचा विभागही अंकात असणार आहे.
इतर विभागात वसंत आबाजी डहाके यांचा प्रसिद्ध चित्रकार जे. स्वामीनाथन यांच्यावरील लेख, मधुकर धर्मापुरीकर यांचा सत्यजीत रे यांच्यावरील ‘दृष्याचे गोष्टीरूप’ आणि नंदू मुलमुले यांचा ‘टर्टल्स कॅन फ्लाय’ या इराणी चित्रपटावरील लेख असे कलात्मक आस्वादावरील लेख अंकात समाविष्ट आहेत. प्रदीप खेतमर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस हे एकमेव द्वेषाचे धनी बनलेत, त्यातील सत्यासत्यतेचा उहापोह केला आहे प्रदीप खेतमर यांनी.
या व्यतिरिक्त पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, नीती मेहेंदळे यांच्या कथा, चंद्रकांत भोंजाळ, संजय बोरूडे यांच्या अनुवादित कथा अंकात आहेत.
उत्कृष्ट मांडणी आणि देखण्या निर्मितीसह हा अंक वाचकांना नक्कीच आनंद देईल.
🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱

01/09/2024
Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune
411002