PositiveSaathi.com
India’s First Online Matrimony Portal for HIV Positive People. Among 55 lakh HIV+ve INDIANS, there are thousands of girls and boys who want to get married and live the life more positively. There are many other diseases like cancer and brain tumor which are more dangerous and life–threatening than HIV/AIDS. But a HIV+ve person never tells anybody that he is HIV+ve. The search of a HIV+ve life partner ends before starting because of this reason
10/08/2024
documentary by a singapur media house. our coverage from 31 to 36 min. time
Fixer S4 线人 S4 EP5 | HIV issues in India! 印度有200万性工作者,妇女因贫困或被迫进入行业,城市流动人口和娼妓业被认为是HIV传播源 Urban migrant populations & prostitution industry are known as sources of HIV transmission in India. Many organisations provide education & counselling for s...
Unbelievable information about fasting and bodies natural healing mechanism
10/11/2023
प्रसिद्धी पत्रक
दिनांक 29 ऑक्टोबर रोजी च्या वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त वाहन चालक तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये मोफत जनजागृती करण्याच्या उद्देशाने टीम फिजिओथेरपी सर्विसेस पुणे या संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून तसेच पॉझिटिव्ह सोलस् फाउंडेशन या एनजीओच्या सहकार्याने शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ पुणे), संगम ब्रिज जवळ, येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत स्ट्रोक\लकवा \परालिसिस याचा त्रास झालेले रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक तसेच इतर सर्व सामान्य जनता, खास करून वाहन चालक मालक यांच्याकरिता मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
Brain stroke हा एक गंभीर आजार असून मेंदू मधील एखाद्या भागात रक्तपुरवठा खंडित झाल्याने अथवा उच्च रक्तदाबामुळे मेंदूमधील रक्तवहिनी फुटल्यामुळे यामध्ये मेंदूतील काही भागास इजा पोहोचते व त्यामुळे तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अपंगत्व येवू शकते. पुणे परिवहन कार्यालयातील एक माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री वळीव यांनासुद्धा काही वर्षांपूर्वी बीपी ची गोळी चुकल्याने उच्च रक्तदाब व रक्तवाहिनी फुटल्याने ब्रेन stroke चा त्रास झाला होता. त्यानंतर योग्य उपचार न केल्यामुळे त्यांना या आजारातून बाहेर पडण्याकरिता थोडा वेळ लागत आहे. चुकीच्या दिशेने उपचार घेऊन रुग्णाने बहुमोल वेळ वाया घालवण्याऐवजी योग्य उपचार घेवून पेशंटने लवकरात लवकर या आजारावर मात करावी व या आजारातून लवकर कसे बाहेर पडावे याचे सुयोग्य मार्गदर्शन इतर पेशंटना व्हावे या व्यापक दृष्टीकोनातून त्यांनी स्वतः या शिबिरा करता पुढाकार घेतला आहे. व त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा ते सांगणार आहेत.
भारतामध्ये दरवर्षी 1,85,000 लोकांना stroke चा त्रास होतो. वयाच्या साठ ते 65 वर्षावरील व्यक्तींना stroke होण्याची जास्त शक्यता असते पण आजकालच्या धकधकीच्या व तणावपूर्ण वातावरणामुळे 15 ते 40 वयोगटातील तरुणांना सुद्धा या त्रासाचे प्रमाण उल्लेखनिय रित्या वाढले आहे.
जागतिक आकडेवारीनुसार दर चार पैकी एका व्यक्तीला स्ट्रोक होण्याचा धोका असतो.भारतामध्ये दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला स्ट्रोक होतो व या आजारामुळे प्रत्येक चार मिनिटाला एक मृत्यू होत असतो .
योग्य उपचार (physiotherapy) मिळाल्यास या आजारावर मात करून रुग्ण लवकरात लवकर स्वावलंबी होतो व दर्जेदार आयुष्य जगू शकतो. अन्यथा रुग्णास अंशतः अथवा पूर्णपणे परावलंबित्व येते. त्यामुळे रुग्ण मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जाऊ शकतो व या सर्व गोष्टींचा अप्रत्यक्षरीत्या रुग्णाच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होतो. फिजिओथेरपी मध्ये स्नायूंची ताकद वाढवणे तसेच स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या मेंदूमधील पेशींना प्रशिक्षित करून दैनंदिन कामकाजमधे स्वावलंबी होणे या गोष्टी शिकवण्यावर भर दिला जातो . मसाज तसेच इतर पर्यायी उपचार पद्धती या आपल्या ठिकाणी योग्य असल्या तरी त्यांना प्रचंड मर्यादा आहेत. पेशंटला या गोष्टींची माहिती नसल्याने मसाज तसेच इतर उपचारांमध्ये तो अडकून राहतो व परिणामी त्यास यातून बाहेर पडण्यास जास्ती कालावधी लागू शकतो. असे होऊ नये म्हणून सदर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कृपया आपल्या ओळखीच्या अथवा संबंधित असे कोणी रुग्ण असल्यास त्यांना या मोफत शिबिरात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे असे नम्र आवाहन परिवहन कार्यालय तसेच टीम फिजिओथेरपी यांनी केले आहे.
सदर शिबिरामध्ये डेंटिस्ट श्री राजाराम खिलारी हे उपस्थीतांची मोफत दंत तपासणी करून देणार आहेत याची नोंद घ्यावी.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Pune
411011