RJ Shonali

RJ Shonali

Share

12/06/2026

एका बाजूला सुंदरा तर दुसऱ्या बाजूला देवसेना 🐾
बाहुबली (काळा पांढरा मुलगा मुलगा) त्याचं खाणं झालेलं आहे.

ह्या सगळ्याचे Adoption करायचं आहे,काही जणांचे Deworming झाले आहे काहीचे बाकी या रविवारी उर्वरित जणांचे होणार.. लसीकरण ही करणार आहे. जे दत्तक घेऊ इच्छितात त्यांनी कृपया DM करा. खूप हुशार आणि निरागस आहेत हे प्रेम विकत घेऊ नका. 🐾❤️

06/06/2026

सुंदरा cheating करते?? ही गोड तक्रार आज तिचे लहानगे दोस्त करत होते. आहे आमची गुंडी थोडी बदमाश 😃
आनंद ह्या गोष्टीचा आहे, या छोट्या मित्रांना Community dogs बद्दल जागरूकता निर्माण करून त्याची मैत्री झाली. पाळीव प्राणी आणि कम्युनिटी Dog's यामध्ये काय फरक असतो, त्यांना मिळणारी वागणूक, अन्न आणि सुरक्षा त्यामुळे त्याचं वागणं कसं बदलतं हे नेहमी लहान मुलांना समजावून सांगत असते.. ते त्यांना किती लक्षात राहील ते ठाऊक नाही पण हे कधी ही Community dogs वर दगड उचलण्यासाठी हात लावणार नाही हे नक्की लावलेच तर त्यांना माया करण्यासाठी ही आशा आहे. एक सुरक्षित आयुष्य मिळवूनही माणूस अस्थिर, बैचेन असतो मग रस्त्यावर राहणाऱ्या या मुक्या प्राण्यांची काय मनस्थिती असेल ?

तुमच्या आसपास असणाऱ्या या मुक्या प्राण्यांना एकदा प्रेमाने हाक देऊन बघा. त्यांच्या डोळ्यात असणारी भीती बघा आणि प्रेम आणि खाऊ दिल्यावर विश्वास बघा. कृपया अनोळखी प्राण्यांना लगेच हात लावायला जाऊ नका, त्यांच्याही आयुष्यात विश्वासघात झालेला असतो.🐾

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Vega Centre, Shankar Sheth Road
Pune
411042