Vishruth Health Plus
20/06/2018
11/06/2018
Some of the cases which are handled by VHP Hom.Moshi Pune, Maharashtra
09/06/2018
Kindly take advantage of free health check up and hemoglobin check up at our clinic.Vishruth Health Plus on saturday 9th june 2018.at 6.00-9.00pm...
16/12/2017
आज सकाळी मी व मित्र महेंद्र काही कामासाठी बँकेत निघालो होतो.
त्याच वेळी गणेश मंदिराजवळुन(चिखली- जाधववाठी) जात असताना समोर खुप गर्दी दिसली गाडी थांबवून पळत जाऊन पाहिलं तर एक छोटी मुलगी *कु.सायली लहु वाबळे* हिला एका वॅगनर कार वाल्यांनी जोरदार धडक दिली होती,धडक ऐवढी जोरात होती की *मुलीचा पाय मोडला होता,*
पन तिने घातलेल्या साॅक्स व शुज मुळे आम्हाला समजुन आले नाही फक्त रक्त खुप दिसत होते.
धडक बसुन मुलगी खाली पडुन ओरडत होती, पन एकाही माणसाने तिला उचलले नाही की मदतीचा हात पुढे केला नाही.
एवढा राग आला होता की दुसर्याची मुलं म्हणजे काय कुत्र्याची पिल्ल आहे असच लोकांना वाटत की काय एकाला ही त्या सायलीला मदत करूशी वाटली नाही हे खुप नवल आणि तेवढाच राग ही आला मला.😡
तेवढ्यात माझा मेव्हुणा मयुर व मी त्याठिकाणी पोहचलो व सायली ला त्याच मारूती वॅगनर गाडीमध्ये मि व मयुरने तशीच उचलुन घेऊन *डाॅ धनश्री मालखडे यांच्या विशृत क्लिनिक मध्ये घेऊन गेलो,*(जागृती जागृती महिला प्रतिष्ठानच्या सदस्या) त्यांनी तिचा साॅक्स काढल्यानंतर पायाला नडघी पाशी आलेली सुज व थोडासा पाय बेंड झाला होता त्यावरून मला तरी लगेच जाणवल पाय मोडला आहे व त्यानंतर *डाॅक्टर धनश्री मालखडे* यांनी ही सांगितलं की पाय मोडला आहे.
सायलीला लगेच *डाॅ कांबळे किंवा आस्था हाॅस्पिटल* मध्ये लगेच घेऊन जा.डाॅ धनश्री यांनी तशी एक चिठ्ठी देखील आमच्या सोबत दिली होती.
*डाॅ धनश्री मालखडे यांनी मुलीच्या प्राथमिक उपचाराचे पैसे घेतले नाही,हे खुप विशेष वाटल.*
त्यांनी सांगितले फक्त सायली ला लवकर पुढील उपचारासाठी घेऊन जा.
पुढील उपचराठी सायली ला डाॅ कांबळे यांच्याकडे पाठविण्यात आले पन मला देखील खुप महत्वाचे काम असल्यामुळे मला सोबत जाता येणार नव्हतं म्हणुन मी माझा मेहुणा मयुर अर्जुन जाधव याला त्यांच्या सोबत जाण्यास सांगितले...
*सर्वांनी गाडी सावकाश चालवा,तुमच्या एका चुकी मुळे एखाद्या कुटूंबाच कधीही न भरून निघणारी अशी घटना/चुक आपल्या कडुन घडु शकते.*
*दहा वर्षे आधी हम दो हमारे दो अस होत पन ह्या धकाधकीच्या जीवनात (काळात) "हम दो हमारा एक" अशीच आज कुटुंबपध्दत सुरू आहे.*
*आणि अशा वेळी त्या कुटूंबामधील एकुलत्या एक मुलाला/मुलीला काय झाले तर ते कुटूंब उध्वस्तच होईल ना.*
*म्हणुन आपली मुलं तशीच लोकांची ही मुलच,त्यामुळे प्लिज गाडी सावकाश चालवा.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Vishruth Health Plus
Pune
411115