BHOR History CLUB

BHOR History CLUB

Share

Photos from BHOR History CLUB's post 27/07/2025

लघुरुद्र २०२५......
श्री सिद्धेश्वर मंदिर सासवड.
२०२५, जुलै २६
मानकरी: श्री.सुमित व सौ प्रियंका क्षीरसागर
वर्ष १६ वे
दुर्ग संवर्धन चे पायोनियर, १९९८ साली स्थापन झालेली शिवाजी ट्रेल दुर्गा संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून २०१० पासून किल्ल्याच्या घेऱ्यात असणाऱ्या पुरातन शिव मंदिरात, पहिल्या श्रावणी रविवारी "लघुरुद्र" आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षी एका नवीन जोडीस पूजा करण्याचा मान दिला जातो, मागील दहा बारा वर्ष लघुरुद्र सांगण्याचे कार्य "लेले आज्जी" व त्यांचा सेवा करणारा ग्रुप आम्हास सहकार्य करत असतात. यंदाच्या वर्षी सगळे नियोजन श्री सुजित नवले यांनी सौ.सुजाता क्षीरसागर यांचा मदतीने पार पाडले, "सुभा ऑफ वॉरियर मराठाच्ये" श्री.भूषण जगताप यांनी नियोजनात सहकार्य केले. यंदाच्या वर्षीचा महाप्रसाद लेले आज्जी यांच्या वतीने करण्यात आला. शिवाजी ट्रेल चे संस्थापक श्री.मिलिंद व सौ सुजाता क्षीरसागर, श्री.सुमित व सौ. प्रियंका क्षीरसागर, श्री. सुजित व सौ.अक्षदा नवले, श्री संजय व सौ.दीप्ती कांबळे, श्री.शुभम व सौ.माधुरी श्री गिरीश जोशी, श्री.दादासाहेब काकडे, श्री.ओंकार दीक्षित व श्री. मुकुंद उत्पाद यांचा सहभाग होता.
यंदाच्या वर्षी सासवड येथील सिद्धेश्वर पौराणिक मंदिर ची निवड करण्यात आली होती. सिद्धेश्वर शिवमंदिर कऱ्हा नदीच्या काठी वसलेले सासवड गावाबाहेर शांत निसर्गाच्या सानिध्यात, शुभ्र निळ्या आकाशाखाली वसलेले आहे सिद्धेश्वर शिवमंदिर. हेमांडपंथी पद्धतीने हे मंदिर. कृष्णदेवरायाच्या काळी हे मंदिर राज्याची सीमा मानले जात असे. मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांच्या काळात झाला.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


908 Shivaji Road Near S. T. Stand Bhor
Pune
412206