Trek Wake Click

Trek Wake Click

Share

22/01/2022
Photos from Trek Wake Click's post 02/12/2020

खूप दिवसांनी प्रयत्न करतोय लिहायचा. विषय अर्थाच ट्रेकिंग.
गेल्या आठवड्यात मित्रा बरोबर पुरंदरला जायचे ठरवले. नेहमी नीट प्लॅन करणारे आम्ही आता अचानक प्लॅन करायला लागलो. आदल्या दिवशी ठरले. मी, चैतन्य आणि आदिती तिघे जायचे असे ठरले. ट्रेक ला जायचे आणि अंत्यस्थ हेतू कुठे तरी मस्त खादाडी करणे हा होता. पुरंदर करून दुपार प्रयन्त घरी परत.
सकाळी मी लवकर ५.३० ला मी चिंचवडहुन निघालो. चैतन्य आणि आदिती ला DSK विश्वला pick करून आम्ही निघालो. वातावरण खूप मस्त होते. वारा खूप होता . पण नशिबात काही तरी वेगळेच होते. पुरंदर कोविड -१९ मुळे पर्यटकांना बंद. आर्मी वाल्यानी गेट बंद करून ठेवले होते. आता काय. मोठा गहन प्रश्न. लगेच google बघून प्लॅन मध्ये बदल आणि आम्ही निघालो मल्हारगड.
महाराष्ट्रातील सर्व किल्यां मध्ये शेवटी बांधलेला किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. पायट्याला सोनेरी गावामुळे सोनेरीचा किल्ला म्हणून पण ओळखतात.
पेशव्याचे सरदार पानसे ह्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी केली. पानसे हे तोफखान्याचे प्रमुख होते. १७५७-१७६० मध्ये किल्ल्याची बांधणी झाली.
थोरले माधवराव कळल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रं मध्ये सापडतो. सोनोरी गावामध्ये सरदार पानसे ह्यांचा वाडा सुद्धा आहे.
गडावर थेट जण्यासाठी गाडी वाहनांसाठी कच्ची सडक केलेली आहे, पण आम्ही गडाच्या नसर्गिक वाटेनेच गडाकडे निघालो. गड तसा जास्त उंच नव्हता, नजरेच्या टप्प्यातच होता. उजव्या हाताला असणारा बुरूज आम्हाला वर येण्यास खुणावत होता. या बुरुजाच्या डाव्या हाताची तटबंदी साफ कोसळून पडली होती. याच वाटेने आम्ही गड प्रवेश केला. गड चढण्यास अतिशय सोपा आहे. गड तसा छोटा असून त्रिकोणी आकाराचा आहे, पण छोटा असुनही गडाला बालेकिल्ला आहे. तटबंदीला अनेक ठिकाणी जवळजवळ अंतरावर जंग्या निर्माण केलेल्या आहेत. गडाच्या पश्चिम दिशेला एक चोरदरवाजा पाहण्यास मिळतो. गडाचं खरं वैभव म्हणजे हे भव्यदिव्य दरवाजे होय आणि ते सर्व आजही शाबूत आहेत. येथे तटबंदीची उंची १४ ते १५ फूट आहे. संपूर्ण किल्ला पाऊण कि.मी.च्या घे-यात बसवलेला आहे. या गडाचा मुख्य दरवाजा भव्य आहे. हा दरवाजा पश्चिम दिशेस कड्याच्या टोकावर आहे.
बुरुजाच्या समोरच किल्ल्यामध्ये वाड्याचा उद्ध्वस्त चौथरा जोता पाहण्यास मिळतो. शेजारीच गोलाकार आकाराची सुंदर चिरेबंदी विहीर पाहण्यास मिळते. या गडावर अशा दोन विहिरी आहेत. हा गढीजोगा वाडा म्हणजे छोटा भुईकोट किल्लाच आहे. साधारण एका तासात आम्ही परत मुख्य मार्गाला लागलो. जवळच माउली मिसळीवर येथेच ताव मारून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
411033