Politics Kida

Politics Kida

Share

21/02/2026

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनाबाबत आमदार रोहित पवार Rohit Pawar हे मुद्दे उपस्थित करत आहेत. ते अस्वस्थ असून, त्यांची काळजी वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांनी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘अजित पवार यांंच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना तीव्र असून आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण काही तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.

मात्र, आमदार रोहित पवार यांची काळजी वाटत असल्याने त्यांना राज्य सरकारने सुरक्षा द्यावी.’ ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाहीत. दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य पुढे आले पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जय पवार यांनीही केली आहे.’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

तर आपणास काय वाटतं रोहित पवार यांना राज्य सरकारची सुरक्षा मिळायला हवी का?

29/11/2025

🔥 आजची सर्वात मोठी HOT बातमी! निवडणुकीआधी महायुतीत तणाव, अजित पवारांचा धक्कादायक आरोप
🚨 राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत!

मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका जवळ येत असतानाच, सत्ताधारी महायुती मध्ये तणाव वाढला आहे.

महायुती फुटणार? भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून सुरू असलेले एकमेकांवरील शाब्दिक हल्ले थांबायला तयार नाहीत. नेत्यांकडून होणाऱ्या टीका टिप्पणीमुळे युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

मतदार यादीतील घोटाळा: उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुंबईच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जवळपास ११ लाख मतदार बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधीच जर हे चित्र असेल, तर राजकारण कुठल्या दिशेने जात आहे?

तुमचे मत काय आहे?

#महाराष्ट्राचेराजकारण #महायुती #निवडणूक #आजचीबातमी

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune