Mpsc Topper

Mpsc Topper

Share

26/10/2019
03/10/2019

🙏👍🙏👍

Photos from Mpsc Topper's post 10/09/2019

सरकार झोपलंय का ? सोंग आंतय ? #महापरिक्षा_पोर्टल_ घोटाळे #महापरिक्षा_पोर्टल_एक_भस्मासुर

आगामी पोलीस भरती तरी कमीत कमी या भस्मासुराच्या तावडीतून सुटावी, हा या लेख लिहण्यामागील खटाटोप....

हा लेख लिहण्यास खेद तर होतच आहे, पण त्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटत आहे की, सर्व महाराष्ट्र भर विध्यार्थी उपोषण करत आहेत, एवढे घोटाळे निदर्शनास येत आहेत, तरी सरकार जागे का होत नाही ? जागे होत नाही का, जाणून बुजून झोपेचे सोंग आणले आहे ?

एवढे आंदोलन होत आहेत, उपोषण होत आहेत तरी सुद्धा का हे महापोर्टल चालू आहे ? जर तरुण पिढीची अशी हेळसांड होत असेल तर कसा आपला महाराष्ट्र पुढे जाणार ? कॉपी करून विध्यार्थी पास होत असतील तर, हुशार व मेहनती विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेवर विश्वास राहील का ? कॉपी करून पास झालेले विध्यार्थी कसा चालवणार महाराष्ट्र हा सर्वात मोठा प्रश्न आहे ?

महापरिक्षा पोर्टल वर का परीक्षा होऊ नये, त्याचे कारणे सर्वांनाच माहीत आहेत व ते सांगून काही उपयोग पण नाही, कारण त्याची दखल पण घेतली जात नाही. ही वेळ आहे ती फक्त आणि फक्त सर्व तरुण पिढीने एकत्र येण्याची...

[email protected] ही महापरिक्षा पोर्टल ची अधिकृत वेबसाईट आहे. मी लेखक राजेश मेशे एक युक्ती सांगत आहे :- वरील वेबसाईटला सर्व विध्यार्थी मित्रांनी एक Mail पाठवून त्यांचे घोटाळे निदर्शनास आणावेत. विचार करा जर प्रत्येक विध्यार्थी मित्राने एक Mail पाठवला तर 1 लाख Mail त्यांना मिळतील. 1 लाख Mail जर Send झाले तर त्यांचे पोर्टल सर्व्हर Hang ( काम करणे बंद होणे ) होईल. नेहमीच असे सर्व्हर बंद पडत राहीले तर नक्कीच त्यांना लेखी परीक्षा घ्याव्या लागतील....!

विध्यार्थी मित्रांनो कष्ट / श्रम करत रहा, सत्याचा नेहमी जय होतो हे लक्षात ठेवा... आगामी पोलीस भरती साठी खूप मेहनत घ्या... जिंकलात तर प्रशासनात राहून बदल घडवताल, हरलात तर प्रशासना बाहेर राहून प्रशासन बदलताल.

तुम्हाला माहीत नसेल, तरुण पिढीत खूप सामर्थ्य आहे... जर मनात आणले तर सर्व काही बदलण्याची शक्ती त्यांच्यात असते.
विध्यार्थी मित्रांनो ही वेळ आहे ती एकत्र येण्याची व पोलीस भरती परीक्षा या भस्मासुरच्या तावडीतून सोडवण्याची....!

लेखक - राजेश मेशे सर

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune