Car Care
13/01/2024
#
information
#सावधान रहा सतर्क रहा
#9860912259
थोड्याशा विलंबाने आज आपण अजून एक एकदम छोटा परंतु अत्यंत महत्त्वाच्या अश्या पार्ट / सेन्सर समजून घेवू त्याचे नाव आहे O2 sensor म्हणजेच ऑक्सिजन सेन्सर
ऑक्सिजन सेन्सर नक्की कसे कार्य करते आणि त्याचे फायदे
ऑक्सिजन सेन्सर हे एक लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे सामान्यत: कारच्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये असते. ते एक्झॉस्ट वायूंमध्ये उपस्थित असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण मोजते आणि ही माहिती इंजिनच्या नियंत्रण मॉड्यूलला पाठवते. हे कसे कार्य करते आणि त्याचे फायदे येथे आहेत:
हे कसे कार्य करते:
- ऑक्सिजन सेन्सर एक्झॉस्ट वायूंमध्ये ऑक्सिजनच्या संपर्कात असताना एक लहान व्होल्टेज निर्माण करतो.
- इंजिन कंट्रोल मॉड्यूल (ECM) हा व्होल्टेज हवा/इंधन प्रमाण निर्धारित करण्यासाठी वाचतो आणि त्यानुसार इंधन इंजेक्शन समायोजित करतो.
- इष्टतम कार्यप्रदर्शन आणि इंधन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी ऑक्सिजन सेन्सर हवा/इंधन गुणोत्तराचे सतत निरीक्षण करतो.
फायदे:
- सुधारित इंधन कार्यक्षमता: ऑक्सिजन सेन्सर इंजिनला अधिक इष्टतम हवा/इंधन गुणोत्तर प्राप्त करण्यासाठी त्याचे इंधन इंजेक्शन समायोजित करण्यास मदत करतो, परिणामी इंधन अर्थव्यवस्था सुधारते.
- कमी उत्सर्जन: हवा/इंधन प्रमाण इष्टतम असल्याची खात्री करून, ऑक्सिजन सेन्सर एक्झॉस्टमधून हानिकारक उत्सर्जन कमी करण्यास मदत करतो.
- सुधारित इंजिन कार्यप्रदर्शन: सदोष ऑक्सिजन सेन्सरमुळे इंजिनच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये कमी झालेली शक्ती, कमी झालेली इंधन कार्यक्षमता आणि वाढलेले उत्सर्जन यांचा समावेश आहे. ऑक्सिजन सेन्सर योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करून, इंजिन अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे कार्य करू शकते.
आता आपण OBD स्कॅनर वर येणारे काही एरर कोड आणि त्याचा अर्थ काय हे बघू
DTC कोड:
- P0130: ऑक्सिजन सेन्सर सर्किट खराब होणे (बँक 1 सेन्सर 1)
- P0131: ऑक्सिजन सेन्सर सर्किट कमी व्होल्टेज (बँक 1 सेन्सर 1)
- P0132: ऑक्सिजन सेन्सर सर्किट हाय व्होल्टेज (बँक 1 सेन्सर 1)
- P0133: ऑक्सिजन सेन्सर सर्किट स्लो रिस्पॉन्स (बँक 1 सेन्सर 1)
- P0134: ऑक्सिजन सेन्सर सर्किट कोणतीही गतिविधी आढळली नाही (बँक 1 सेन्सर 1)
- P0135: ऑक्सिजन सेन्सर हीटर सर्किट खराब होणे (बँक 1 सेन्सर 1)
- P0150: ऑक्सिजन सेन्सर सर्किट खराब होणे (बँक 2 सेन्सर 1)
- P0151: ऑक्सिजन सेन्सर सर्किट कमी व्होल्टेज (बँक 2 सेन्सर 1)
- P0152: ऑक्सिजन सेन्सर सर्किट हाय व्होल्टेज (बँक 2 सेन्सर 1)
- P0153: ऑक्सिजन सेन्सर सर्किट स्लो रिस्पॉन्स (बँक 2 सेन्सर 1)
- P0154: ऑक्सिजन सेन्सर सर्किट कोणतीही गतिविधी आढळली नाही (बँक 2 सेन्सर 1)
- P0155: ऑक्सिजन सेन्सर हीटर सर्किट खराब होणे (बँक 2 सेन्सर 1)
ऑक्सिजन सेन्सर हा कारच्या इंजिन व्यवस्थापन प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे. हे सुनिश्चित करण्यात मदत करते की इंजिन सर्वोच्च कामगिरीवर कार्यरत आहे, तसेच हानिकारक उत्सर्जन कमी करते आणि इंधन कार्यक्षमता सुधारते. ऑक्सिजन सेन्सर योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी आणि इंजिनच्या कार्यक्षमतेतील समस्या टाळण्यासाठी त्याची नियमित देखभाल करणे महत्वाचे आहे. अर्थात हे काम गाडी मालकाचे नाही तर ज्याच्याकडे आपण गाडी सर्व्हिस अथवा कामासाठी देतो त्याचे आहे . गाडी स्कॅन करून त्याचे फक्त चालू error codes न बघता history म्हणजे येवून गेलेले error codes बघून त्याचे देखील चेकिंग करणे हा सर्विसचाच एक भाग आहे आणि तो केलाच पाहिजे
आम्ही स्वतः ह्या सर्व गोष्टी बघतो आणि वर्षभरात आपली गाडी फक्त एकदाच garage ला आली पाहिजे अश्या प्रकारचे काम करून देतो आणि ह्या गोष्टीस आम्ही आमचे कर्तव्य आणि धर्म समजतो
आणि तसेही एखाद्या ग्राहकास नक्की काय पाहिजे असते? उत्तम सेवा , घरपोच सेवा , खात्रीशीर काम आणि योग्य दाम
ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दुचाकी आणि चारचाकी साठी एकाच छताखाली मिळत आहेत.
मग वाट कसली बघताय आजच फोन करा
त्या सोबत संपूर्ण भारतात आपण कुठेही असा आपली गाडी काही त्रास देतीये अथवा कुठे तुम्हाला लावलेले charges jast वाटत असतील न लाजता मला कधीही फोन करा आपली कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत केली जाईल
अद्वैत जोशी
Car care and bike care
9860912259
धन्यवाद 🙏🙏🙏
*टिगोर इलेक्ट्रीक गाडीचे बुकिंग करणे योग्य आहे की अयोग्य.. ही निवड व्यवहार्य आणि योग्य आहे ..*
*----------------------------*
अतिशय चुकीचा निर्णय
कंपनी अपप्रचाराला मार्केटिंग ला भुलू नका, माझा मित्रा कडे नेक्सोन इ व्ही आहे , कंपनी ने ३०० किमी ची रेंज सांगितली आहे पुण्यावरून गाडी घेतली मिरज ला राहतो तिकडे गाडी दाखवायला गेला , गाडी शोरूम मधेच फुल चार्ज करून घेतली .
पुणे ते मिरज अंतर २५० किमी आहे , गाडी १८० किमी वर बंद पडली , battery शून्य टक्के पूर्ण उतरली
शोरूम ला फोन लावला , ते बोलले गाडी २५०-३०० किमी चालेल पण ए सी बंद हवा, म्युझिक सिस्टिम बंद हवी . शिवाय स्पीड ५०-६० चाच हवा , मित्राचा संताप झाला हे आधी सांगितले असते तर गाडी घेतली च नसते , चार चाकी कोणी ५०-६० ने चालवते का , शोरूम म्हणाली हि पेट्रोल/डीझेल गाडी नाही मर्यादा असणारच .
शोरूम म्हणाले कस्टमर केअर ला संपर्क करून टो करून देतो, नवी गाडी टो करून न्यावी लागली घरी आणि मित्र मंडळीत हसे झाले शिवाय १५०० रुपये टो चार्जेस लावले ते वेगळे
बी एम एस म्हणजे battery management सिस्टीम सुमार आहे . क्षणात गाडी ८०% चार्जिंग दाखवत असताना अचानक ३०-४०% दाखवायला सुरवात करते
सर्वात महत्वाचे गाडी कुठेही चार्ज होत नाही , अप प्रचाराला बळी पडू नका ,त्या ला वेगळा सेट अप लागतो जो प्रत्येक ठिकाणी असेलच असे नाही
शिवाय पेट्रोल टीगोर आणि याची तुलना करा किमतीची
पेट्रोल टीगोर ६.८४ पासून सुरवात होते तर इ व्ही १२.७० लाख पासून
समजा तुमची पेट्रोल tigor १८ चा मायलेज देते असे गृहीत धरले आणि पुढील ५ वर्षात सरासरी भाव १२५ रुपये लिअर धरला तरी वर्षाचे १० हजार असे ५ वर्षात ५० हजार किमी चालवली तर २७७८ लिटर पेट्रोल लागेल म्हणजेच पुढील ५ वर्षात तुम्ही ३४७००० हजार रुपयांचे पेट्रोल टाकणार
आता तुम्ही स्वतःच तुलना करा तुम्हाला काय परवडले .
इलेक्ट्रिक हे भविष्य नाही , इथेनॉल , हायड्रोजन हे भविष्य आहे
टाटा असो वा एम जी कि हिरो इलेक्ट्रिक ९०% पार्टस चीन वरून येतात
स्वतः तुलना करा मग निर्णय घ्या जर १२-१५ लाख घालून तुम्ही जर मुंबई-नाशिक रिटर्न येऊ शकत नसाल तर असला निर्णय काय शहाणपणाचा आहे का
शिवाय चार्जिंग ला ३० युनिट लागतात कोणताही हॉटेल वाला तुम्हाला चार्ज करू देणार नाही
स्वतः शोरूम आणि त्यांचे चार्जिंग सेंटर चार्ज करून द्यायचे ४५०-५०० रुपये घेतात
चार्जिंग चा खर्च गृहीत न धरता देखील इ व्ही गाडीला तुम्ही पुढील ४-५ वर्ष पेट्रोल चे पैसे फुकट भरले आहेत ते देखील २००-२५० किमी एवड्या कमी अंतरासाठी
कंपनी सांगते एका तासात fast चार्जर ने गाडी चार्ज होते पण हे सांगत नाही दर तिसऱ्या वेळी स्लो चार्जर नेच चार्ज करावी लागते .
शिवाय रिसेल किमंत शून्य
कंपनी ८ वर्षांची waranty देते त्याचा टर्म वाचल्यात का , दर वर्षी १०-१५% रेंज कमी होत जाणार हे तुम्हाला शोरूम किंवा कंपनी कधीच सांगत नाही ,
पहिल्या वर्षी असलेली २५०-३०० ची रेंज ५ वर्षात १००-१५० वर येणार तेव्हा ती गाडी नंतर खेळणे म्हणून द्यावी लागेल मुलांना
nexon चा ए आर ए आय मायलेज ३१२ सांगितला जातो मात्र अनेक लोकांना वास्तवात २१० पेक्षा कमी मायलेज मिळत आहे
पेट्रोल/डीझेल गाडी रस्त्यात बंद पडली तर कोणताही फिटर ती दुरुस्त करू शकतो , तसे इलेक्ट्रिक चे नाही, इलेक्ट्रिक गाड्यांचे आजही शोरूम वेगळे नाहीत, शोरूम मधील फिटर ला इलेक्ट्रिक गाडी दुरुस्त करता येत नाही , यातील अनेक पार्टस वापरा आणि फेकून द्या या प्रकारचे आहेत. रस्त्यात गाडी बंद पडली तर टो करून नेणे या पेक्षा वेगळा पर्याय आज तरी नाही...
#9860912259
Care
Car Our Care
कालच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आणि माझ्या डोळ्यासमोरून मागचे दिड वर्ष फ्लॅशबॅक सारखे येऊन गेले... आणि डोळे नकळतच पाणावले त्या सोबत मनात विचार आला की जर मी करू शकलो तर कोणीही करू शकेलच काही मोठी गोष्ट नाही... तर ही गोष्ट माझ्या स्टार्टअप ची म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या CAR CARE ची
2020 मध्ये कॉविड मुळे झालेल्या नुकसान भरून निघणे तेव्हा अशक्य वाटत होते आणि 2 वेळच्या जेवणाची वाताहत होती आणि अशातच आपल्या पैकी काही ग्रुप वर बदली ड्राइवर म्हणून कोणाला पाहिजे असल्यास यायला तयार आहे अश्या आशयाची एक पोस्ट टाकली होती आणि त्याला पहिल्या दिवशीपासून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यातूनच अजून एक गोष्ट दिसली ती म्हणजे lock डाउन काही अंशी जरी मिटले तरी देखील आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नसल्याने बरेच जण बाहेरील देशात / राज्यात अडकून पडलेत आणि त्यांची पहिली बायको म्हणजे त्यांची गाडी पार्किंग मधेच पडून खराब होत आहे असे दिसले ( पहिली बायको या शब्दास बऱ्याच लोकांचा आक्षेप असू शकतो पण 80/90% पुरुष हे आपल्या गाडी ला पाहिली बायको संबोधतात) अर्थात गाडी ही असे asset आहे की ज्याचा वापर नाही झाला तर जास्त खर्च येऊ शकतो आणि त्याच बेसिस वर आम्ही आगळी वेगळी सर्विस बाजारात चालू केली ती म्हणजे महिन्यातून 3/4 वेळा तुमच्या घरी येऊन गाडी चालवून हवा , पाणी , ऑइल इ बघून परत जागेवर लावणे आणि या गोष्टीस प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे एक वेळ अशी होती की लोकांच्या fortuner , BMW , स्कोडा ,सारख्या महागड्या गाड्यांच्या चाव्या 24 तास माझ्याकडे असायच्या आणि त्यांचे मालक मनात आले तरी गाडी बघायला येऊ शकणार नव्हते परंतु कुठलाही धंदा असुदे विश्वासाहता ही नेहमीच महत्वाची आणि नेमकी मी नेहमी तीच जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो ... ह्या सोबत कविता नामक एका मॅम नी मला SUGGEST केले की अद्वैत एवडी उत्तम गाडी चालवतोस तर गाडी शिकवत का नाही? बस मग काय हळू हळू जम बसत असल्याने नवीन काय आणू असे मनात असतानाच असा प्रस्ताव मिळाला आणि पेट्रोल वर काडी बसली त्या नन्तर पूर्ण पुणे , पिंपरी चिंचवड आणि मुंबई मध्ये देखील माझी सर्विस फेमस झाली अगदी गाडी शिकवाल का म्हणून बेळगाव वरून देखील फोन आले आणि मागील 1 वर्षात टाटा नॅनो पासून BMW 525d पर्यंत प्रत्येक गाडीवर क्लास घेतले आणि आजवर 250+ जणांना गाडी शिकवली ज्यात 150+ ladies होत्या 80+ लोकांचे पहिल्यांदा licence होते ज्यात एक देखील माणूस नापास झाला नाही .
या सोबत गाडी च्या सर्व्हिसिंग साठी भागीदारी मध्ये garage देखील चालू केले आणि त्यात देखील सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला कोणाचा देखील गाडी च्या माहिती साठी फोन आल्यास अगदी तास तास भर देखील न कंटाळून त्यांचे पूर्ण शंका निरसन करणे कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त काम करून देणे आज गाडी जेव्हा genuine सर्विस सेंटर मध्ये जाते तेव्हा माणसाला अक्षरशः लुबाडले जाते गरज नसताना पार्ट बदलणे , छुपे चार्जेस , आणि कुठलीही गोष्ट रिपेअर न करता रिप्लेस हाच एक पर्याय सांगणे असे एक ना अनेक प्रकारे लुबाडले जाते आणि त्या पासून आम्ही ग्राहकांसाठी विथ ऑइल servicing आणि without ऑइल सर्विस असे दोन पर्याय आणले त्यास देखील भरगोस प्रतिसाद मिळाला
या सोबतच मनात अजून शल्य होतेच... त्याचे काय आहे ना मला लहानपणा पासून शाहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे जबरदस्त आकर्षण आहे आणि त्यांची ये दिल मंगे more ही tagline कुठलेही काम करताना सतत आठवते आणि त्याच किड्यातून अजून एक कल्पना जन्माला आली ती म्हणजे 1 स्टॉप सोल्युशन म्हणजेच काय तर आपण नॉर्मली गाडी एका ठिकाणाहून घेता , शिकता दुसरीकडे , सर्व्हिसिंग तिसरीकडे , आणि नन्तर विकायला परत चौथ्या माणसाकडे त्यात इन्शुरन्स साठी देखील वेगवेगळ्या वेबसाईट म्हणजे 5 विविध माणसांकडून 5 विविध सर्विस एकाच गोष्टीसाठी घेता आम्ही नेमके इथेच गोष्टीमध्ये येतो ते कसे म्हणजे नवीन गाडी घेताना ती कोणती घ्यावी कशी असावी याचे तंत्रशुध्द परीक्षण आणि त्या नुसार उत्तमात उत्तम गाडी उत्तमात उत्तम discount मिळून घेऊन देणे , गाडी शिकवणे , सर्विस / रिपेअर करणे , इन्शुरन्स काढणे (दुचाकी चा देखील) आणि वेळ झाली की गाडी विकून देण्यास देखील मदत करणे या सर्वांचा फायदा असा की एकच की कॉन्टॅक्ट असल्याने 10 ठिकाणचा त्रास वाचतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विश्वासू सेवा.......
आता या पेक्षा जास्त काही लिहीत बसलो तर दिवस जाईल पण लेख संपणार नाही पण अंततः मला अपणासर्वांचे आभार मानायचे आहेत.... की आपण विश्वास टाकला म्हणून मी इथवर येऊ शकलो नाहीतर हे शक्य नव्हते... आजवर अनेक ज्ञात अज्ञात लोकांची या सर्वात मला प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष मदत झाली आहे आणि त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.....
एक स्टार्टअप तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो मार्केट मध्ये नसलेली गोष्ट सर्वोत्तम गुणवत्ता , सेवा , किंमत या सर्वांना डोक्यात ठेवून देतो त्या सोबतच आपल्या सारख्या विश्वास टाकणारा ग्राहक देखील महत्वाचा आहेच
(सदर सर्व सर्विस सध्या फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उपलब्ध अधिक माहिती साठी संपर्क करू शकता कधीही अगदी रात्री 12 ला देखील)
धन्यवाद
Advait Joshi
Car Care
9860912259 ( call & whatsapp)
8484092259 ( call)
15/10/2021
15/08/2021
Happy Independence Day!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
715 Budhwar Peth
Pune
411030