Pustak Shop

Pustak Shop

Share

30/06/2025

#नवं_पुस्तक

हरिती प्रकाशनचे संघर्षगाथा हे पुस्तक नुकतच वाचकांसाठी उपलब्ध झालेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पूर्व 700 प्रति बुकिंग झालेला आहे. बुकिंग केलेल्या सर्व रसिक वाचकांचे आभार 🙏 पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला पुस्तक मिळेल. लातूर आणि परिसरातील वाचक मंडळी आजही पुस्तक घेऊन जाऊ शकता.

संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास
संपादन: अनिल जायभाये, पंचशील डावकर

अभिप्राय
१)
भारतातील कनिष्ठ जाती आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाकडे शिक्षणाच्या इतिहासकारांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. सबब, भारतीय शिक्षणाचे औपचारिक इतिहासलेखन पक्षपाती आहे. या पुस्तकाने बहुजन मुलींच्या सर्जनशील संघर्षाला शब्दबध्द करून या पक्षपातीपणास प्रश्नांकित केले आहे; तसेच प्रचलित ज्ञानव्यवहारात मूलगामी परिवर्तनाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
- प्रा. दिलीप चव्हाण,
इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, नांदेड

२)
भारतीय समाजातील जात-पितृसत्तेच्या चौकटीत स्त्री-पुरुष संबंध आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या जात-वर्गातील स्त्रियांच्या जीवनप्रवासांचा अभ्यास आवश्यक आहे. स्त्री प्रश्नाचे एकजिनसी आकलन टाळत, त्यातील जात-वर्गीय पदर उलगडण्याच्या दृष्टिकोनातून संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास यासारखे दस्तावेजीकरण महत्त्वाचे ठरते.
- मयुरी सामंत,
स्त्री अभ्यास व समाजशास्त्राच्या अभ्यासक, पुणे

३)
या पुस्तकात ३० मुलींनी प्रांजळ आत्मकथन लिहिले आहेत. त्यांचे जीवनप्रवास वेगळ्या जगाचं दर्शन घडवतात. जाती-धर्माच्या चौकटी मोडत या मुली बिनधास्तपणे व्यक्त झाल्या आहेत, हे या पुस्तकाचे महत्वपूर्ण यश आहे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र व ग्रामीण साहित्य या अनुषंगाने हे पुस्तक मौलिक आहे.
- डॉ. अशोक नारनवरे, लातूर,
फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, लातूर

पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क :- 073855 21336

#पुस्तक #संघर्षगाथा Hariti Prakashan

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune