Udyog Guruschool - Ecosystem

Udyog Guruschool - Ecosystem

Share

09/08/2022

६) कमी वेळ, कमी मेहनत, जास्त नफा!
"मी ३ महिन्यातच बाळाला जन्म देणार आणि ते ही जुळ्या आणि ते ही वेदने विरहीत, कोणत्याही त्रासाशिवाय."
कधी कोणी ऐकले वा पाहिले आहे का की एखाद्या गर्भवती महिलेने हे विधान केलेले...
हसू आले ना.
मग उद्योग उभारणे हे एखाद्या बाळाला जन्म देण्यासारखेच नाही का?
त्यामुळे व्यवसायात कमी वेळेत वा कमी मेहनतीत जास्तीत जास्त नफा असे काही नसते.
तर निर्धारित वेळेत आणि योग्य मेहनतीत रास्त, शाश्वत नफा हे खरे सूत्र आहे.
कारण ज्या गोष्टीला जितका वेळ लागणार आहे, तितका वेळ लागणारच.
आणि मेहनतीला दुसरा पर्याय नसतोच मुळी.
नाहीतर बिल गेट्स वा तत्सम उद्योजकांना काय वेड लागले आहे का १८-१८ तास काम करायला?

बरेच जण यासाठी व्यवसायात येतात ते करोडपती होण्याचा राजमार्ग समजून.
हे खरे जरी असले तरी याचा अर्थ हा नाही की कमी वेळेत कमी मेहनतीत तुम्ही अंतिम रेषेपर्यंत पोहोचाल जिथे सर्व सुख, ऐश्वर्य तुमची वाट पाहत बसले आहे.
There is no short cut and short time to reach success.
तेव्हा घरबसल्या उद्योग करा, फक्त चारच तास काम करून करोडपती व्हा, असल्या भूलथापांना कृपया बळी पडू नका.
उद्योग करणे हे फुल टाईम वा पार्ट टाईम काम नसून ते लाईफ टाईम काम आहे.
ते हार्ड वर्क वा स्मार्ट वर्कच्या पलीकडचे "हार्ट वर्क" असते.

कारण उद्योगात तुम्ही येता तेव्हा कशाची तरी निर्मिती करत असता, - सिस्टिम्स, प्रोसेसेस, प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस इ. ,
आणि यात पदोपदी धोके असतात.
ज्यातून पुढे जात तुम्हाला तुमचा उद्दयोग वाढवायचा असतो.
मग जर तुम्हाला कठोर परिश्रम करायला आवडत नसेल, ते जमत नसेल तर तुमची पत, तुमची धारच तुम्ही गमावून बसता.
आणि मग एक दिवस कोणीतरी येते आणि तुमची बाजारपेठच हस्तगत करते.
कारण तुम्ही निर्धास्त, बेसावध असता, आपली धार गमावून बसलेले असता.
आणि यातले बरेचसे हे आळसप्रिय प्राणी असतात. (उद्योजक आळशी असू शकतो का? यावर पुढील एखाद्या लेखात उपरोक्त माहिती दिली जाईल)

जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही उद्दयोग करू शकता की नाही तर आधी हे जाणून घ्या की तुम्ही आठवड्याला कमीत कमी ८० तास काम करू शकता का नाही?
आणि जर करू शकत नसाल तर तुम्ही प्रगतीशील उद्योजक बनू शकत नाही.
जर तुम्ही फक्त ९ ते ५ वा १० ते ६ याच वेळेत काम करू शकता तर तुम्ही नोकरीच करावीत.
आणि जे नोकरी करत आहेत आणि व्यवसायात येऊ पाहत आहेत त्यांनी आधी आपल्या नोकरीच्या जागी आठवड्याला ८० तास काम करून पाहावे.
आणि मग बघा काय जादू होते ते!
पहिले तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता वधारते.
आणि तुमच्या C. E. O. वा Directors सोबत ओळख वाढते.
जेव्हा C. E. O. वा Directors तुम्हाला रोज रात्री उशीरापर्यंत काम करताना पाहतात.
त्यांच्या आधी आलेले पाहतात.
त्यांच्याही लक्षात येते की ही व्यक्ती प्रचंड मेहनती आहे.
ही इतरांपेक्षा वेगळी आहे.
कामाप्रती नैतिकता (WORK ETHICS) याच्यात आहे.
काय सांगो की एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबादारी आणि त्यात भागीदारी तुम्हाला मिळो.
तर मग निदान पुढचे १२ ते २४ महिने आठवड्याला ८० तास काम करून पहा आणि बघा बदल्यात काय निर्माण होते - तुमच्या आत आणि व्यवसायात.

ज्यापद्धतीने आपण मागे आपल्या पैशाचा ताळेबंद लिहून काढला, त्याचपद्धतीने आपल्या वेळेचा जमाखर्च लिहून काढा.
पुढचे ३० दिवस check करा की तुमचा वेळ खालील पैकी कुठे गेला आणि काय तो productive होता?

1) Important (गरजेचे आणि महत्वाचे): Do it now
2) Desirable (हवेहवेसे आणि आवडीचे): Decide when to do it and do it at that time only
3) Not important and desirable (नकोसे): Delegate it
4) Time thief (वेळ चोर): Dump it

क्रमशः
उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

याआधीचे 5 शीर आणि यापुढचे 4 शीर समजून घेण्यासाठी ह्या पेजला व्हिजिट करा आणि लाइक करा.

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411041