Maha Social

Maha Social

Share

समाज के हर घटक को उसके अधिकार की है पुष्टी करवानी,
ठान ली हमने ये शपथवानी !!

सामाजिक न्याय की संकल्पना को आगे बढ़ाते हुये, समाज के हर घटक को, उसके अधिकार की जानकारी होना, रोटी, मकान और कपडेके साथ-साथ आजके जमाने का सबसे एहम पहलू है! लोग अपने हक के लीये तभी लढ सकते है, जब उन्हें उनके हक और सरकारसे मिलनेवाली सुविधाओकी पुरी जानकारी हो। तो बस इसी बात पर हम दे रहे है आपका साथ, एक हाथ बढाते आपके ओर,

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर 31/07/2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

https://mahasocial.com/trending/prime-minister-narendra-modi-to-visit-pune-on-august-1/
Narendra Modi
Pune, Maharashtra
Pune Metro Rail Project
BJP, Pune
Devendra Fadnavis
Cmo, Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे करणार लोकार्पणपिंपरी-चिंचवाड येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरा...

Photos from Maha Social's post 16/07/2023

नवनियुक्त मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई येथे आढावा बैठक घेतली

नवनियुक्त महिला व बालविकास मंत्री मा.अदिती तटकरे यांनी आज महिला व बालविकास विभागाची मुंबई येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी मंत्री तटकरे यांनी विभागाचे विविध उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे आणि त्याचा लाभ राज्यातील अधिकाधिक महिला व बालकांना व्हावा, याबाबत सूचना केल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल,राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी शर्मा यावेळी उपस्थित होत्या.

Photos from Maha Social's post 14/07/2023

महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची रात्री बालसुधार केंद्राला अचानक भेट

येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवार ला रात्री अचानक भेट दिली व बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

भेटी दरम्यान मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती आयुक्तांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.

येथे असणाऱ्या २२ विधि संघर्ष ग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात कशा पद्धतीने दिल्या जातात याची चौकशी केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, त्यांची स्वच्छतागृह तपासण्यात आली. ज्या ठिकाणी या मुलांचे जेवण बनवले जाते त्या ठिकाणचीही पाहणी महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधिक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
411002