SpirituAlchemy
Empowering you to unlock your potential, find balance, and live a life of peace and purpose. 🌿💫 ✨ Welcome to Spiritualchemy by Smita ✨
I’m Smita, a Psycho-Spiritual & EFT Healer, here to guide you on a journey of emotional healing, self-discovery, and spiritual transformation. With my expertise in EFT tapping, chakra healing, meditation, and intuitive guidance, I help women release emotional trau
डे २५: आरशात पाहून स्वतःला एक सुंदर 'स्माईल' द्या!
आपलं स्वाधिष्ठान चक्र (Sacral Chakra) हे आपल्या आत्सन्मानाशी आणि आनंदाशी जोडलेलं असतं. जेव्हा हे चक्र ब्लॉक असतं, तेव्हा आपण स्वतःमध्ये फक्त दोष शोधू लागतो.
आजचा सराव अगदी सोपा आहे—आरशात स्वतःच्या डोळ्यांत डोळे घालून मनापासून हसा आणि म्हणा, "तू खूप सुंदर आहेस आणि मला तुझा अभिमान आहे!" ही छोटीशी कृती तुमच्या चक्राला पॉझिटिव्ह ऊर्जेने भरून टाकेल.
आज आरशासमोर जाऊन स्वतःला भेटल्यावर तुम्हाला कसं वाटलं, हे कमेंटमध्ये 'SMILE' लिहून नक्की शेअर करा!
Day २४: हरवलेला आनंद आणि हसू परत मिळवा!
तुमच्या स्वाधिष्ठान (सॅक्रल) चक्राला जागृत करण्यासाठी आजची ही शक्तिशाली हीलिंग विधाने मनापासून ऐका आणि म्हणा.
रोज सकाळी हा सराव नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा! 🙏
Day 23: मनात साठलेला जुना राग आणि भीती मुक्त करण्याची वेळ! आज प्राचीन हो'ओपोनोपोनो पद्धतीने हील करूया आपलं सॅक्रल चक्र.
पूर्ण व्हिडिओ पाहा, मनापासून सराव करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा! 🙏
वॉटर चार्जिंगने करा 'स्वाधिष्ठान चक्र' ॲक्टिव्हेट! 💧🟠
आजच्या Day 22 मध्ये आपण शिकणार आहोत वॉटर चार्जिंगची सर्वात शक्तिशाली पद्धत! आपल्या स्वाधिष्ठान चक्राला (Sacral Chakra) ॲक्टिव्हेट करण्यासाठी पाण्याचा ग्लास हातात धरून हा व्हिडिओ ऐका.
स्वाधिष्ठान चक्र कुठे असते?
आपल्या नाभीच्या अगदी दोन बोटे खाली या चक्राची जागा असते. जेव्हा आपण 'वम' (VAM) मंत्राचा उच्चार करतो, तेव्हा नेमक्या याच भागात कंपनं (Vibrations) जाणवतात.
या मंत्राच्या कंपनांनी तुमचं पाणी चार्ज करा आणि पिऊन पहा. बदल तुम्हाला थक्क करेल!
👉 प्रयोग आवडल्यास कमेंटमध्ये 'VAM' नक्की लिहा!
मनात विचारांचा गोंधळ सुरू आहे? डोक्यात साचलेला ताण बाहेर काढायचा आहे?
आजच्या Day 21 मध्ये आपण एक अतिशय सोपी आणि शक्तिशाली हीलिंग कृती शिकणार आहोत. १ मिनिटाच्या रीलमध्ये वेळेचे बंधन असल्यामुळे, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कृती समजून घ्या आणि नंतर तुमच्या वेळेनुसार शांतपणे करून पहा.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता, मनातलं ओझं कागदावर उतरू द्या!
कृती पूर्ण झाल्यावर तुमचा अनुभव कमेंटमध्ये 'RELEASE' लिहून नक्की शेअर करा.
टेन्शन आलं की खावंसं वाटतं?
आज आहे Day 20. जेव्हा आपण उदास किंवा अस्वस्थ असतो, तेव्हा मन तात्पुरत्या आनंदासाठी गोड किंवा जнк फूडकडे धाव घेतं. यालाच 'Emotional Eating' म्हणतात. हा भूकेचा नाही, तर स्वाधिष्ठान चक्राच्या (Sacral Chakra) असंतुलनाचा संकेत आहे.
✅ आजची सोपी कृती: तीव्र इच्छा होईल तेव्हा १ ग्लास पाणी प्या, स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा— "मला शरीराची भूक आहे की मनाची?"
मनाची ही भावनिक पोकळी अन्नाने नाही, तर हीलिंगने भरण्यासाठी कमेंटमध्ये 'HEAL' नक्की लिहा!
खोटं हसणं बंद करा!
जगासमोर सतत खंबीर राहण्याचा मुखवटा घालणं थांबवा. दुःख, राग किंवा भीती दाबून ठेवल्याने तुमचं स्वाधिष्ठान चक्र ब्लॉक होतं आणि आयुष्य निरुत्साही बनतं.
रडू आलं तर रडून घ्या, व्यक्त व्हा! भावनांना वाहू द्या, मनात कैद करू नका.
✅ आजचा प्रयोग: स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवून म्हणा— "मला माझ्या भावना व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी स्वतःचा स्वीकार करते."
स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी कमेंटमध्ये 'FLOW ' नक्की लिहा!
#
ज्याने त्रास दिला, त्याला माफ करणं अशक्य वाटतंय?
कालच्या रीलवर अनेकांनी कमेंट केली की, "मॅडम, विसरणं आणि माफ करणं खूप अवघड आहे." मी तुमची ही वेदना पूर्णपणे समजू शकते.
पण एक गोष्ट समजून घ्या— माफ करणं म्हणजे समोरच्याची चूक 'योग्य' मानणं नाही. माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या मनात भाड्याने राहू देणं बंद करणं! जेव्हा तुम्ही राग मनात धरून ठेवता, तेव्हा नुकसान समोरच्याचं नाही, तर तुमच्या स्वाधिष्ठान चक्राचं (Sacral Chakra) होतं.
आज त्या व्यक्तीला बाजूला ठेवा... आज फक्त स्वतःवर दया करा.
✅ आजची सोपी कृती:
स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवा.
म्हणा— "मी त्या व्यक्तीला तिच्या कर्मासह सोडून देतेय. मी माझ्या मनाला या वेदनेतून आज मुक्त करतेय."
स्वतःला ही मुक्ती आणि स्वीकार देण्यासाठी कमेंटमध्ये 'ACCEPT 🟠' नक्की लिहा!
चूक दुसऱ्यांची, मग शिक्षा स्वतःला का?
आज आहे Day 17. भूतकाळात घडलेल्या एखाद्या चुकीसाठी किंवा नात्यात मिळालेल्या नकारासाठी आपण वर्षानुवर्षे स्वतःलाच दोषी धरत राहतो.
हा अपराधीपणा (Guilt) आपल्या स्वाधिष्ठान चक्राला (Sacral Chakra) आतून पोखरतो, ज्यामुळे आयुष्यातला मोकळेपणा आणि आनंद संपून जातो. आज आपण एका सोप्या मानसिक प्रयोगाने (NLP Technique) हे ओझं खाली उतरवणार आहोत.
✅ आजची सोपी कृती (व्हिडिओ नक्की पहा):
डोळे मिटून त्या कटू आठवणीचा एक फोटो डोळ्यांसमोर आणा.
मानसिक कल्पनेने कात्री घेऊन त्या फोटोचे तुकडे करा आणि ते वाहत्या पाण्यात वाहून जाताना पहा.
म्हणा— "मी भूतकाळ सोडून दिला आहे. मी स्वतःला पूर्णपणे माफ करत आहे."
मनाचा हा हलकेपणा अनुभवायचा असेल तर कमेंटमध्ये 'RELEASE' नक्की लिहा!
Click here to claim your Sponsored Listing.
Address
Nashik
422 0XX