APN Solar System

APN Solar System

Share

10/04/2023

*सौरऊर्जा सिस्टिम नेमकी आहे तरी काय?* 🤔

सौर ऊर्जेचा वापर आता विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असून अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये सौर ऊर्जा हा एक अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे. भविष्यकालीन परिस्थितीचा विचार केला तर कोळशाच्या टंचाई सारख्या परिस्थितीमुळे निश्चितच विजेची टंचाई देखील उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे तसेच *वाढत्या लाईटबिलातून मुक्त होण्यासाठी सौरऊर्जा शिवाय पर्याय नाही!*

याच दृष्टिकोनातून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देखील विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. उदाहरणच घ्यायचे झालं तर पंतप्रधान कुसुम योजना ही एक त्यामधील महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपांना चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. दुसरी योजना म्हणजे सोलर रूफटॉफ योजना फक्त घरगुती वापरासाठी असून या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.

परंतु बऱ्याचदा सौरऊर्जेच्या संबंधित असलेल्या बऱ्याच संकल्पना आजमितीस देखील आपल्याला कळत नाही. जसं की सोलर पॅनल व पॅनलची क्षमता म्हणजेच किती किलोवॉटचा आहे तसेच घरासाठी किती किलोवॅटचा सोलर पॅनल उपयुक्त ठरू शकतो, पावसाळ्यात काम करते का? इत्यादी बाबत बरेच प्रश्न आपल्या मनात उठतात. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात या संबंधित महत्वाची माहिती घेऊ.

आता आपण जेव्हा एक किलोवॅट सौर पॅनल असे म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक किलोवॅटचा पॅनल आणि तो इन्स्टॉल करण्यासाठी लागणारी उपकरणे इत्यादींचा समावेश होतो. समजा जर तुम्ही घरी 335 वॅटचे 6 सोलर पॅनल बसवण्याचे ठरवले तर तुमचे संपूर्ण सिस्टम हे 2010 वॅट म्हणजेच 2.01 किलोवॅटची होते.

ऑनग्रीड सिस्टम ही बॅटरी विरहित प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये थेट सूर्यप्रकाशापासून विज तयार केली जाते आणि अतिरिक्त वीज ग्रेडला विकण्याची सोय देखील या माध्यमातून प्रदान केले जाते. ऑनग्रीड सिस्टम ही खूप महत्त्वपूर्ण असून ही सिस्टम घरी बसवल्यानंतर त्यासाठी कोणत्याही प्रकारची देखभाल किंवा रेट्रोफिटिंगची आवश्यकता भासत नाही.

आपल्या घरासाठी,दुकानासाठी, औद्योगिक वापरासाठी किती सौर ऊर्जा सिस्टीम बसवावी लागेल व त्याचा खर्च किती येईल हे पाहण्यासाठी आपल्या लाईट बिल फोटो खालील व्हॉट्स ॲप नंबर वर पाठवू शकता.
*सौरऊर्जा आपल्या साठी, आपल्या देशासाठी, आपल्या पर्यावरण संरक्षणासाठी!*

Want your business to be the top-listed Contractor in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Shop No 43 Sitaram Complex Opp Hotel Shiva
Nashik
422004