Killari
29/09/2019
किल्लारी हे गाव 30 सप्टेंबर 1993 च्या प्रलयकारी भुकंपामुळे जगप्रसिध्द झालेले गाव आहे.लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात हे गाव उमरगा ते लातूर या राज्य महामार्गावर वसलेले आहे.लातूरपासुन 45 किमी अंतरावर किल्लारी हे गाव आहे.अजुनही भुकंपाचे नाव काढल्यानंतर कित्येकांची डोळे पाणावतात.या भुकंपामध्ये क्षणात अनेक संसार उध्वस्त झाले होते.त्यात हजारो लोकांनी आपला प्राण गमावला होता. व कित्येक लोक अपंग व अनाथ झाले होते. आज त्या प्रलयकारी भुकंपाला २६ पूर्ण झाले आहेत.३० सप्टेंबर हा दिवस आपण काळा दिवस म्हणून पाळतो.
तरीही किल्लारीतील प्रत्येक व्यक्तींनी स्मृतीस्तंभ जुने गाव किल्लारी येथे सकाळी ठीक ८ वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे,हि नम्र विनंती.
श्री निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्टने भुकंपातील मृत व्यक्तीच्या स्मरणात एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन या मंदीर परीसरात केलेले आहे. प्रत्येकानी कमीत कमी एका वृक्षाचे संगोपन करावे.
killari.in
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the place of worship
Website
Address
Killri
Latur
413516