Abhay Tendulkar
21/03/2026
*आज (२१ मार्च) 'ईद-उल-फित्र' म्हणजेच रमजान ईद...*
रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे, दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रूपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये १२ महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. ह्याच महिन्यात त्यांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ म्हणून ‘अल्लाह’चे दर्शन झाले.
रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना आहे. भूतकाळातील तक्रारी आणि पापे विसरून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. मुस्लिमांची मुख्य पाच कर्तव्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रमजान महिन्यात दररोज उपवास (रोजा) करणे. या महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयानंतर काहीही खात किंवा पीत नाहीत. सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो. त्यानंतर अन्न-पाण्याचे सेवन केले जाते. तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन वर्ज्य आणि पाप मानले जाते. आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया, छोट्या मुला-मुलींना उपवासापासून सूट आहे. रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. या वेळी मिठाई आणि शीरखुर्मा आवर्जून दिला जातो.
एकमेकांतील बंधुतेची भावना दृढ करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या ‘रमजान ईद’निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
15/03/2026
*आज (१५ मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन...*
ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी, खरेदीवेळी कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख करून घ्यावी, ऑनलाईन खरेदी करताना जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो.
१५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी संसदेत केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षितता, माहिती, निवड आणि प्रतिनिधित्व हे हक्क प्रदान केले. त्यानंतर ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाकडे पाठपुरावा करून मूलभूत गरजा पुरविणे, तक्रार निवारण, ग्राहक शिक्षण आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नये, वस्तू खरेदी करताना बिल घेणे, सोने खरेदीवेळी हॉलमार्ककडे लक्ष देणे, डबाबंद खाद्यपदार्थांची व्यवस्थित पाहणी करणे, वस्तूची एक्सपायरी डेट तपासणे, पेट्रोल पंपावर ‘शून्य’ आकडा पाहून नंतरच पेट्रोल भरणे, ऑनलाईन खरेदी सावधपणे करणे, अशी दक्षता ग्राहकांनी घेणे आवश्यक आहे. हेच सुजाण ग्राहकाचे लक्षण आहे.
#ग्राहकहित #जागतिक_ग्राहक_हक्क_दिन #ग्राहकजागृती
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Plot No 116 Salokhe Nagar Kalamba Road Kolhapur
Kolhapur
416007