SPEC N SHADES
डोळ्याच्या आरोग्यासाठी हे करू नका
1. रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.
2. डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये.
3. संगणकावर सलग काम करु नये. मधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी.
4. वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.
5. प्रवासामध्ये वाचू नये. अपुऱ्या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.
6. अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
7. पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.
For more details visit us at
SPEC N SHADES (OPTICAL & SUNGLASSES)
LOOK SMART N SEE SHARP
SHOP NO 1, SMARAN APARTMENT,
NEAR ASHA PLYWOOD,
1988, E WARD,
RAJARAMPURI, 8TH LANE,
KOLHAPUR – 416008.
PHONE – 0231 – 2538722,
MOB – 9422568722, 9421082122.
MON TO SAT – 10.30 TO 14.00 & 17.30 TO 21.00.
आपल्या सुंदर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी :-
1) अधिक प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
2) डोळ्यामध्ये शक्य होईल तेव्हा आय क्रीम घातले पाहिजे.
3) सकाळी किंवा सायंकाळी हिरव्या गवतावर विनापादत्राणे फेरफटका मारला पाहिजे.
4) दिवसभर मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर काम केल्यानंतर डोळ्यांवर बराच ताण पडतो. त्यामुळेच सलग १ तास काम केल्यानंतर काही वेळ डोळ्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे.
5) टीव्ही, संगणक, लॅपटॉप यांचा अतिवापर टाळावा. तसेच रात्रीच्या अंधारात बऱ्याचदा मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा डोळ्यांवर विपरित परिणाम होतो.
6) संगणक किंवा लॅपटॉपची स्क्रिन आपल्या डोळ्यांवर ताण येणार नाही अशाप्रकारे योग्यरित्या सेट करणे. तसेच स्क्रिन मोठी आणि स्वच्छ असावी म्हणजे डोळ्यावरील ताण कमी होऊ शकतो.
7) उन्हाळ्यात डोळ्यांना उष्णतेने अधिक त्रास होतो. डोळे येणे, डोळ्यांची जळजळ होणे अशा गोष्टी होत असतात. अशावेळी वेळीच डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.
8) अस्वच्छ हाताने डोळ्यांना हात लावू नये किंवा डोळे चोळू नयेत. त्याने डोळ्यांना संसर्ग होऊन डोळ्याचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो.
9) डोळ्यांचा मेकअप काढा - झोपण्याआधी डोळ्यांना केलेला मेकअप काढा. रात्री झोपताना डोळ्यांना मेकअप ठेवणे धोक्याचे असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते. मेकमुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते. डोळ्याचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी बऱ्याचदा सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. त्यामुळेच काही वेळा डोळ्यांना इजा पोहचण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे डोळ्यासाठी सौंदर्य प्रसाधनाचा वापर करताना डोळ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
10) डोळ्यांची काळजी घेताना पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. डोळ्यासाठी कमीत कमी सात तासांची झोप आवश्यक आहे. तसेच रात्री जास्त वेळ जागरण करू नये.
11) वर्षातून एकदा नेत्रतज्ज्ञांकडून डोळे तपासून घ्यावेत. तसेच डोळ्याबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
12) पाण्याने धुवा डोळे - पाण्यामुळे बरेच फायदे होतात. तुम्ही जर अधिक बाहेर फिरत असाल तर वेळो-वेळी पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल. यामुळे डोळ्यांचे डिहायड्रेशन होणार नाही. तसेच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. सारखे डोळे धुण्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते.
13) ब्रेक घ्या - तुम्ही डोळ्यांवर ताण पडणारे काम करत असल्यास थोडासा ब्रेक घ्या. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि आरोग्य उत्तम राहिल.
14) नियमित डोळ्यांची तपासणी करा - तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जरी होत नसला तरी वर्षातुन एकदा डोळ्याची तपासणी करुन घ्या. या तपसणीमुळे तुमच्या डोळ्यांची योग्य प्रकारे निगा राखली जाईल आणि काही निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतील.
15) सनग्लास वापरा - बाहेर जाण्याआधी डोळ्यांवर सनग्लास जरूर लावा. याने डोळ्यांवर पडणा-या पराबैंगनी किरणांपासून बचाव होईल. शक्यतो सनग्लास चांगल्या क्वालिटीचे वापरावे.
16) माशांचा आहारात सामावेश करा - आठवड्यातून कमीत-कमी 3 वेळेस आहारामध्ये माशांचा सामावेश करा. यामुळे ड्राय-आय सिंड्रोमची समस्या दूर होते. माश्यांमध्ये ओमेगा-3 असल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. तसेच मोतीबिंदू होण्याची भिती कमी होते. ओमेगा 3 मुळे बुद्धी वाढण्यास मदत होते.
17) दाणे खावे - ताण आणि ब-याच वेळ कॉम्पूटरवर काम केल्याने डोळे ड्राय पडण्याची शक्यता असते. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी 4 ते 5 बदाम खावे तसेच 20 ते 30 ग्रॅम दाणे खाल्ल्याने आराम मिळतो.
18) हिरव्या भाज्या - हिरव्या भाज्या ब्रोकली, पालक, साग, मेथी यांचे सेवन आहारात करावे. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. व्हिटॅमिन ए मुळे नाइट ब्लाइंडनेस दूर होण्यास मदत होते.
19) सकाळी उठल्यानंतर स्वछ पाण्याने चुळा भरून डोळे स्वच्छ धुण्याची शिकवण प्रत्येक लहान मुलाला अगदी लहानपणापासून दिली जाते. या उपायाने श्वासाची दुर्गंधी जाऊन डोळे स्वछ होतातच, पण त्याशिवाय तोंडामध्ये पाणी भरून घेऊन, डोळे उघडे ठेऊन त्यांच्यावर पाणी मारल्याने दृष्टीदोष कमी होतो. जर एखाद्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर त्यांनी हा उपाय अवलंबून पाहावा. दृष्टीदोष कमी करण्यासाठी पायांच्या तळव्यांना मोहोरीच्या तेलाने दररोज मालिश करावी. तसेच स्नानापूर्वी पायांच्या अंगठ्यांना मोहोरीचे तेल चोळावे. यामुळे दृष्टीदोष सुधारतो आणि पुन्हा उद्भविण्याची शक्यता कमी होते.
20) डोळ्यांना आवश्यक ते पोषण मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये पालक, पालक, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, आणि गडद रंगाची फळे समाविष्ट करावीत. या फळांमध्ये अ, क आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. याशिवाय पपई, संत्री, लिंबू, गाजरे या पदार्थांचा समावेशही आपल्या आहारामध्ये असावा. दररोज सकाळी उठल्यानंतर ताजे लोणी, अर्धा लहान चमचा बारीक दळलेली खडीसाखर, आणि चार- पाच काळी मिरी असे एकत्र करून खावे. त्यानंतर त्वरित ओल्या नारळाचे दोन लहान तुकडे चावून खावेत, व बडीशेप खावी. त्यानंतर दोन तासांपर्यंत काहीही खाऊ नये. ज्या व्यक्तींना दृष्टीदोष जास्त असेल, त्यांनी या उपायाचा दोन ते तीन महिन्यांपर्यंत अवलंब करावा.
21) गाजराचा रस डोळ्यांसाठी अतिशय गुणकारी आहे. गाजराच्या रसाचे सेवन दुपारच्या जेवणानंतर तासाभराने करावे. जर गाजर खाण्यास आवडत असेल, तर दररोज दोन गाजरे खावीत. दृष्टीदोष सुधारण्यासाठी दहा ग्राम वेलची आणि वीस ग्राम बडीशेप एकत्र करून याची बारीक पूड करावी. दररोज एक लहान चमचा भरून ही पूड दुधाबरोबर घ्यावी. कांदे आणि लसू दोन्ही डोळ्यांच्या आरोग्याकरिता चांगले आहेत. यांचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावा. दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.
For more details visit us at
SPEC N SHADES (OPTICAL & SUNGLASSES)
SHOP NO 1, SMARAN APARTMENT,
NEAR ASHA PLYWOOD,
1988, E WARD,
RAJARAMPURI, 8TH LANE,
KOLHAPUR – 416008.
PHONE – 0231 – 2538722,
MOB – 9422568722, 9421082122.
MON TO SAT – 10.30 TO 14.00 & 17.30 TO 21.00.
डोळे
1. डोळे आहेत म्हणूनच मानवाच्या आयुष्यात प्रकाश आहे, नाही तर त्यांचे जीवन देखील अंधकारमय झाले असते. याच डोळ्यांनी आपण जागे असताना जग बघतो तर निद्रावस्थेत आपण छानसे स्वप्न पाहतो. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. जर नाजूक व रसपूर्ण डोळेच दिले नसते तर मानवाचे जीवन असून नसल्यासारखे झाले असते.
2. सुंदर डोळे हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतात. जगातील सर्वात सुंदर असण्याचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या रॉयने ही तिच्या सुंदर डोळ्यांनी जगाला भुरळ घातली आहे. डोळ्यांमध्ये अशी देखील चमक असते की, कोणी त्यात पाहिले तर तो त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जातो. केवळ स्त्रियांचे डोळे सुंदर असतात असे नाही तर पुरुषांचे ही डोळे सुंदर असतात ते देखील त्यांच्या डोळ्यावर चारचौघात इतरांचा आकर्षण बिंदू होतात.
3. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीला त्याच्या स्वास्थ्याकडे पाहायला वेळ नाही मात्र, त्याच्या जीवनात रस भरणाऱ्या सुंदर डोळ्यांकडे तरी त्याने दुर्लक्ष करून चालणार नाही. कमी वयात चश्मा लागणे, डोळ्यांच्या खाली काळे वलय तयार होणे, पापण्यांवर सूज येणे, डोळ्याची जळ जळ होणे, डोकेदुखी या सारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले असल्याचे जाणवते. वेळेत त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर त्या अधिक धोकेदायक ठरू शकतात.
4. या ' स्क्रीन ' युगामध्ये आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतातच. टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन, मोबाईल फोनचा स्क्रीन अश्या अनेक स्क्रीन्सवर दिवसभर आपले डोळे लागून राहिलेले असतात. काही वेळा दिवसभराच्या कामानंतर डोळे पार थकून जातात, त्यानंतर डोळे दुखणे, लाल होणे, डोळ्यांची आग होणे, त्यांतून सतत पाणी येणे अश्या तक्रारी सातत्याने सुरु होतात. कधी कधी कमी दिसू लागल्याची भावना देखील होते. अश्या वेळी काही घरगुती उपायांनी आपल्या डोळ्यांची निगा राखता येऊ शकते.
5. घड्याळाच्या काट्यासोबत धावणाऱ्या या टेक्नोसॅव्ही जगात मोबाईल, संगणक आणि लॅपटॉपवर खूप वेळ काम करावं लागतं. मात्र काम करताना डोळे थकून जातात तर काही वेळाने कोरडे पडतात. कामाच्या या गडबडीत, धावपळीत डोळ्याची योग्यप्रकारे काळजी घेणं बऱ्याचदा आपण विसरतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही सोप्या पद्धती जाणून घेऊया.
6. सुंदर जग पाहण्याची किमया आपण फक्त डोळ्यांनीच करू शकतो. म्हणूनच डोळ्यांचे आपल्या जीवनामधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. मात्र असे असतानाही आपण डोळ्यांची काळजी घेण्याबाबत तितकेसे सिरिअस नसतो. डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखलं तर आपलंच भविष्य सुखकारक होईल म्हणून डोळ्यांची आत्तापासूनच काळजी घ्या… ती कशी यावर नजर टाकुयात…
7. जेव्हा आपण कॉम्प्युटर व टी. व्ही समोर बसतो तेव्हा डोळ्यांवर जास्त ताण पडतो. त्यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात बाहेर पडणारे विद्युत तरंग नाजूक डोळ्यांना हानी पोहचवतात. त्याने आपल्या मेंदूतही तणाव निर्माण होतो. याव्यतिरिक्त प्रदूषण, धूळ, माती आदीपासून ही आपल्या डोळ्यांना मोठी हानी पोहचते.
For more details visit us at
SPEC N SHADES (OPTICAL & SUNGLASSES)
(LOOK SMART N SEE SHARP)
SHOP NO 1, SMARAN APARTMENT,
NEAR ASHA PLYWOOD,
1988, E WARD,
RAJARAMPURI, 8TH LANE,
KOLHAPUR – 416008.
PHONE – 0231 – 2538722,
MOB – 9422568722, 9421082122.
MON TO SAT – 10.30 TO 14.00 & 17.30 TO 21.00.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
1988, E Ward, Smaran Apartment, Near Asha Plywood, 8th Lane, Rajarampuri
Kolhapur
416008
Opening Hours
| Monday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm | |
| Tuesday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm | |
| Wednesday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm | |
| Thursday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm | |
| Friday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm | |
| Saturday | 10:30am - 2pm |
| 5:30pm - 9pm |