YC KMC College Library
26/06/2026
यशवंतराव चव्हाण (के एम सी )कॉलेज मध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी प्रा.पी.डी. तोरस्कर,प्रा. एस एम शेख, डॉ. सचिन धुर्वे, ग्रंथपाल प्रा.आर.आर. मांगले, प्रकाश टिपूगडे, परशुराम खांडेकर सुधाकर लाड, शिवाजी दाते इत्यादी उपस्थित होते.
26/02/2026
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि भौगोलिक पर्यावरण कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:
यशवंतराव चव्हाण ( के एम सी) कॉलेज, भूगोल विभाग,
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (सामाजिक बांधिलकी विभाग) व लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशन गर्जन यांचे वतीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि भौगोलिक पर्यावरण या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन दि 26 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून मा. सुहास वायंगणकर , जेष्ठ पर्यावरण तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यावरण दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे असा विचार व्यक्त केला. प्राचार्य डाॅ. बी. एन. उलपे यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण रक्षणाचे महत्व विशद केले. भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जे. एम. शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर व लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई यांनी या कार्यशाळेस सहाय्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ युवराज मोटे यांनी केले तर आभार डॉ. संजय कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. आर आर मांगले, प्रा. पी. डी. तोरसकर, प्रा. एस एम शेख, डाॅ. अरूण पौडमल, प्रा ए. डी. मुडे, डाॅ .प्रशांत नागावकर , डॉ किरण भोसले,
डाॅ बी. एम. पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
2032 A Ward Gangavesh Dhotre Lane
Kolhapur
416012