Papyrus - The Book Store

Papyrus - The Book Store

Share

29/09/2025

फ्रेन्च मेनिअॅक #नवं_कोरं
- पंकज भोसले

मूळ किंमत : २९५ रु. । सवलतीत : २३५ रु + टपाल खर्च
रोहन प्रकाशन | पुठ्ठा बांधणी - ११८ पाने

स्थळकाळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. नगण्य जीवांच्या जगण्यातून, क्षुल्लक जिकण्यातून, फालतू पराभवांतून समाज नावाची गोणपाटसदृश वस्तू विणली जाते

मुंबई महानगराच्या वेशीवर डोबिवली-बदलापूरसारखी उपनगरं असतात त्यात तितकेच सामान्य लोक राहतात. महानगराला हलवून टाकेल इतकं कर्तृत्व त्यांच्यात नसतं, ते अंतर्बाह्य 'मिडिओकर' असतात. त्यांच्या आयुष्यावर फ्रेंच पॉर्नस्टारपासून जागतिक सिनेमापर्यंत गोष्टी आदळतात. तेव्हा हे लोकही बदलतात. पण सामान्यांचे असामान्य होत नाहीत. एकटेपणा, समाजात राहून समाजापासून तुटल्याची त्यांची अवस्था तशीच राहते.

पंकज भोसलेंनी आपल्या पत्रकारितेत टिपलेल्या व्यक्ती-घटनांवर या कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा शेवटी विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचतात. 'मिडिओकर' असण्याचा त्यांच्या गंतव्यस्थळाशी संबंध आहे. पण वाचकाला त्यांच्याबद्दल राग येत नाही, कणव येत नाही, आपलेपणाही वाटत नाही. ते तिथे आहेत, आणि त्यांची गोष्ट प्रचंड ऐकण्यासारखी आहे, ही भावना दाटून येते. शिवाय आपलं स्थळकाळाचं भान वाढतं.

पुस्तक मागवण्यासाठी इथे कमेंट करू शकता किंवा ९७६९४४९६९४ या क्रमांकावर WhatsApp करू शकता.
- आदूबाळ

19/07/2025

फॅरनहाईट ४५१
रे ब्रॅडबरी | अनुवाद : माया पंडित

वॉल्डन पब्लिकेशन | पृष्ठ संख्या : २०४
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २५५ रु + टपाल खर्च

'फॅरनहाईट ४५१' ही भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भयावह जगाचं भाकीत करणारी विलक्षण कादंबरी आपल्याला अक्षरशः झपाटून टाकते.

या भविष्यकालीन जगात पुस्तकांवर बंदी आलेली आहे आणि ती जाळण्यासाठी फायरफायटर्सचा एक खास टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. पुस्तकं लोकांमध्ये कमालीचा बेबनाव आणि भयंकर दुःखं पेरतात, म्हणून ती बाळगायला नि वाचायला बंदी आहे. गाय मॉन्टॅग या टास्कफोर्समधे काम करतो. त्याच्याही घरात पुस्तकं लपवलेली आहेत का? टास्कफोर्सनं एक यांत्रिक कुत्रा तयार केलाय. त्याच्या तोंडात जालीम विष भरलेली एक सुई बसवलेली आहे. त्याला हेलिकॉप्टरमधून इकडे तिकडे नेलं जातं. जी विद्रोही माणसं समाजाचे आदेश धुडकावून पुस्तकं सांभाळून ठेवतात नि वाचतात त्यांचा शोध घेऊन हा कुत्रा त्यांचा निकाल लावतो.

ही कादंबरी जगाचा वाङ्मयोत्तर भविष्यकाळ आपल्यासमोर साक्षात उभा करते. या कादंबरीच्या प्रकाशनाला आता ५० वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या धक्कादायक नि स्तिमित करणाऱ्या मांडणीमुळे तिची वाचकांवरची मोहिनी अद्यापही कायम आहे.

पुस्तक मिळवण्यासाठी इथे कॉमेंट किंवा 9769449694 या क्रमांकावर WhatsApp करू शकता.

10/07/2025

पंडित जवाहरलाल नेहरू यांची दोन पुस्तकं -
📙
आत्मकथा
अनु. ना. ग. गोरे | पृष्ठ संख्या : ७८१
मूळ किंमत : ६०० रु | सवलतीत : ४८० रु
📙
भारताचा शोध
अनु. साने गुरुजी/ ना. वि. करंदीकर | पृष्ठ संख्या : ८८४
मूळ किंमत : ७५० रु | सवलतीत : ६०० रु
पुस्तक मिळवण्यासाठी इथे कॉमेंट किंवा 9769449694 यावर whatsapp करू शकता.

Want your business to be the top-listed Shop in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


House No. 2, Dutta Colony, Behind Hotel Garam Masala
Kalyan
421301

Opening Hours

Monday 10:30am - 7:30pm
Tuesday 10:30am - 7:30pm
Thursday 10:30am - 7:30pm
Friday 10:30am - 7:30pm
Saturday 10:30am - 7:30pm
Sunday 10:30am - 7:30pm