AutoSoft Computer & Net cafe

AutoSoft Computer & Net cafe

Share

29/06/2015

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 62 जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.


राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा
कोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

संरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

ठाणे जिल्ह्यात वनहक्क कायदा अंमलबजावणी व्यवस्थापक पदासाठी थेट मुलाखत
ठाणे जिल्ह्यात वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी जिल्हा व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक पदासाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने जागा भरावयाच्या आहेत. वनहक्क कायदा अंमलबजावणी व्यवस्थापक (01) आणि तालुका व्यवस्थापकाच्या (02) जागेसाठी थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखतीचा दिनांक 29 जून 2015 हा असून अधिक माहितीसाठी www.thane.gov.in यावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी सोलापूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 55 जागा
जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 55 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.solapur.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.


जिल्हाधिकारी सांगली आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 42 जागा
जिल्हाधिकारी सांगली कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 42 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sangli.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.


जिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा
जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी पुणे आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी पुणे कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (18), तलाठी संवर्गाच्या (73) अशा एकूण 91 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.pune.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

www.maharecruitment.mahaonline.gov.in

Photos 04/04/2015

Online Application for ASSO - CET 2015
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Jalna?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Jalna
431203