Shrishakti Tea
17/10/2018
सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही सुरुवात करत आहोत आमच्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ची.
च्या पहिल्या शाखेचा भव्य शुभारंभ आम्ही उद्या करतोय कोथरूड मध्ये.
गुरुवार दिनांक १८ ऑक्टोबर, २०१८ रोजी सकाळी ११ वाजता.
सदरील कार्यक्रमाचे #विशेष_आकर्षण आहेत प्रवीण तरडे ( दिग्दर्शक, अभिनेता / मुळशी पॅटर्न आरारा फेम), रुचिता विजय जाधव – (सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री) आणि गणेश किसनराव लोणारे – ( अभिनेता / स्वराज्य रक्षक संभाजी फेम )
सदरील कार्यक्रमाला #प्रमुख_उपस्थिती लाभणार आहे मुरलीधर मोहोळ ( नगरसेवक / मा. स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा ), किरण दगडे पाटील ( नगरसेवक / अध्यक्ष - बीडीपी पुणे शहर, प्रस्तुतकर्ता मुळशी पॅटर्न) आणि रमेश (बापू) कोंडे ( जिल्हाप्रमुख शिवसेना पुणे ) या मान्यवरांची.
#कार्यक्रमाचे_स्थळ असणार आहे भुसारी कॉलनी, कोथरूड बस डेपो समोर, पौड रोड, पुणे.
तरी आपल्या सर्वाना विनंती आहे की सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
हा आमचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असून भारतीय महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशात हा प्रकल्प एक रोल मॉडेल प्रकल्प म्हणून सिद्ध होणार आहे.
बरेचदा आपण बाहेर चहा किंवा स्नॅक्स घेताना त्याची चव, गुणवत्ता आणि स्वच्छता या बाबतीत साशंक असतो. परंतु हे चव, गुणवत्ता आणि स्वच्छता या बाबतीत अतिशय सजग आहे. त्यामुळे आता बाहेर चहा,कॉफी किंवा स्नॅक्स घेताना भारतच नाही तर संपूर्ण जगामध्ये हे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहे.
Best Quality with 100% Hygiene यासाठी आम्ही कटीबद्ध राहणार आहोत.
ची काही विशेष वैशिष्टे ही खालीलप्रमाणे असणार आहेत.
१. चे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल.
२. महिला सक्षमीकरण व्हावे म्हणुन फक्त महिलांच्याच नावे आउटलेट.
३. कंपनीच्या सर्व संचालक फक्त महिलाच.
४. च्या सामाजिक कार्यासाठी एक मोठे योगदान.
५. चहा बनविण्यासाठी आम्ही वापरतो अमूल दूध आणि ह्युमन टच फ्री पद्धतीने बनविलेली साखर
६. आमचा चहाचा स्वतःचा प्रोसेसिंग प्लांट. आसामच्या चहा बागेतून आम्ही स्वतः खरेदी केलेली आणि आमच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये नैसर्गिकरीत्या ब्लेंड केलेली चहा पावडर हीच च्या प्रत्येक आउटलेट वर वापरली जाणार आहे.
७. #देशाच्या_सैनिकांना_प्रत्येक_आउटलेटवर_मोफत_चहा.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभ - आशीर्वाद याच्या माध्यमातून नक्कीच आम्ही जागतिक स्तरावर एक मोठी झेप घेणार आहोत याची मला खात्री आहे.
तरी कायम आपले कृपा आशीर्वाद हे आमच्यासोबत राहू द्या आणि च्या महिला सक्षमीकरणाच्या या मोहिमेसाठी आम्हाला सहकार्य करा हीच विनंती.
धन्यवाद.
सौ. शारदा विजयकुमार खरात
चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर
MyTeaShop India Limited
३०२, ३ रा मजला, बिझनेस स्क्वेअर, डीएसके रानवारा समोर,
एनडीए – पाषाण रोड, बावधन, पुणे – ४११०२१.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Jalna
431203