Graffiti expression

Graffiti expression

Share

15/01/2023

आज मकर संक्रांत. आजपासून दिवस मोठा होत जाणार. आपले कतृत्वही असेच उत्तरोत्तर बहरत जावो.
देशभरात आजचा दिवस किती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. विविध प्रांत, तिथल्या वेगवेगळ्या पद्धती, परंपरा. पण, त्यामागे मूळ विचार समान आहे. कृषीप्रधान भारतात वर्षभर मेहनत करून मिळालेल्या पिकाचं कौतुक करण्याचा हा सण. वातावरणातील सुखद बदल अंगिकारत आकाशात उंच झेपावणाऱ्या पतंगांसोबत आनंद साजरा करण्याचा हा सण.
आपणा सर्वांच्या आयुष्यातही असाच अपार आनंद नांदो, याच सदिच्छा!
#मकरंक्रांती

12/01/2023

समस्त महाराष्ट्राची माऊली राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा मिळाली ती जिजाऊसाहेबांमुळेच. स्वराज्य व स्वाभिमानाची प्रेरणाज्वाला चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. माता, पत्नी आणि राज्यकर्त्या या तीनही जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांची स्मृती आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.

#जिजाऊ #जालना

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Jalna?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Jalna
431213

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am