BJP 4 Chandrapur Rural
Official page of Bharatiya Janata Party – Chandrapur Rural Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.
टाळ, चिपळ्या, मृदुंग, पताका बोलवितो विठू हरी,
विठ्ठल नामात दंग होऊनी वेढा रे वेढा पंढरी
॥राम कृष्ण हरी॥
कारगिल युद्धातील अतुलनीय शौर्याचे प्रतीक, 'परमवीर चक्र' सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि त्यांचे अदम्य साहस प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवत राहील. त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीत मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संभाव्य धोक्याच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, एनडीआरएफ-एसडीआरएफची सज्जता, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेसह सर्व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधावा.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
आळंदी येथे इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी आळंदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न न करता, ज्या ठिकाणी आहेत तेथून थेट पुण्याकडे मार्गस्थ व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाला वारकऱ्यांची विशेष काळजी घेणे, वाहतूक आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करणे तसेच आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित वारीला सहकार्य करावे.
06/07/2026
राष्ट्रएकात्मतेच्या विचारासाठी आयुष्य समर्पित करणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार आजही देशवासीयांना राष्ट्रसेवेची प्रेरणा देतात. 🙏
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी #भारतीय_जनसंघ
05/07/2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात राज्याने समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्या घटनात्मक दायित्वाची पूर्तता केली नाही, तर डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही; त्यांच्या संविधानिक दृष्टिकोनाची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांचा निनाद, विठ्ठल नामाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास...
हीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख..
जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत!
ज्ञान, भक्ती आणि श्रद्धेचा संदेश देत विठुरायाच्या भेटीकडे निघालेला हा पवित्र प्रवास महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवतो.
आषाढी वारीत पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रमाला यंदाही प्रारंभ झाला आहे.
पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्काम स्थळांवर वारकऱ्यांना औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार, पुढील उपचाराची सुविधा दिली जाणार आहे.
१२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक या सेवेत सहभागी झाले असून, ८ आरोग्य जनजागृती रथांद्वारे स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेशही दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम वारकरी परंपरेतील सेवाभाव आणि आरोग्य सेवेचा सुंदर संगम आहे.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Chandrapur
442401,442402,442403,442404