Garudeshwar

Garudeshwar

Share

Garudeshwar is a small sleepy village on the banks of river Narmada, located around 85 kms from Baroda (Vadodara). There are two main temples here viz the Dattatrya temple & other temple that is the samadhi of Vasudevand Saraswati Maharaj ( Tembe swami). Lodging facilities can be availed by contacting the Datta Sansthan and boarding facilities can be availed at the Bhatji's home. Everyday, Mahaprasad is served at noon to everyone who is present.

19/11/2021

*आजच्या दिवशी प.पू श्री नानांना प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज ह्यांचा अनुग्रह झाला होता.*

तपोबलाने आर्तभक्तीमुळे प. पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज ब्रह्मावर्ताहून चार्तुमासात व्यग्र असतानाही वायुवेगाने येऊन बाळ मार्तंडला अनुग्रह दिला. ‘तू दत्ताचे लाडके लेकरू, समाधीत न रमता, दत्तभक्तांना सुलभ सोपा मार्ग दाखवून जनजागृतीचे मोठे काम तुला करावयाचे आहे, असे सांगून अंतर्धान पावले. त्यापूर्वी आपली छाटी पांघरून व चैतन्यमयी मंत्राक्षरे नानांच्या कानात सांगितली. तो गुरुमंत्राचा दिवस होता मंगळवार त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु. पौर्णिमा), दि. २२-११-१९०४.
🙏🌷जय गुरु नाना 🌷🙏

15/09/2021

IIश्री गुरु:शरणम II

सत्पुरुषांचे संकल्प..... दृढ निश्चयाने सिद्धी होतेच.

पूजनीय श्रीमहाराज रोज संध्या झाल्यानंतर नियमित गुरुचरित्राचे वाचन करीत. या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये त्यांनी आपल्या गुरुंचे म्हणजे प.प.श्री.दीक्षितस्वामीमहाराज यांचे एक पत्र ठेवले होते. याही पत्राचे ते रोज वाचन करीत. त्यास वंदन करून पुन्हा पोथी मध्ये पत्र ठेवीत.

सदर पत्र प.प.श्री. दीक्षित स्वामीमहाराजांनी श्रीमहाराजांना पाठवले होते. त्याचा आशय असा होता, *"शास्त्राभ्यास झाल्यानंतर आपण पुन्हा अमरापुरला येऊन आम्हाला गीता व उपनिषदे ऐकवावित. दरवर्षी एखादा भागवत सप्ताह करावा"*. पुढे सन १९२७ मध्ये अश्विन वद्य सप्तमीला, प. प. श्री दीक्षित स्वामी महाराज, ब्रह्मीभूत झाले. त्यामुळे अमरापुरला येऊन पूजनीय स्वामी महाराजांचे समोर गीता व उपनिषदे यांचे पाठ राहून गेले.

श्रीगुरुआज्ञेनुसार पूजनीय श्रीमहाराज सलग साधारणपणे १९६४ सालापर्यंत अमरापुर येथे भागवत सप्ताह करीत होते. त्यानंतर १९६५ मध्ये श्रीमहाराजांचे दुसरे गुरु पूजनीय श्री गुळवणी महाराज यांनी श्रीवासुदेव निवास या पवित्र वास्तूची उभारणी केल्यानंतर,पूजनीय श्रीमहाराजांना सांगितले, *आम्हाला गीता व उपनिषदे ऐकवावित".* पू. श्रीगुरुमहाराजांच्या आज्ञेने श्री महाराजांनी रोज सोवळ्यामध्ये श्री गुरुमहाराजांना गीता व उपनिषदे यांचा पाठ ऐकवला. *याचप्रमाणे त्या वर्षीपासून पू. श्रीगुरूमहाराजांनी पूजनीय श्रीमहाराजांचा भागवत सप्ताह श्रीवासुदेव निवास येथे सुरू केला.* श्रीमहाराजांनी प्रकृती साथ देईपर्यंत चालू ठेवला. त्यामुळेच श्रीवासुदेव निवास येथे दरवर्षी आजतागायत भागवत सप्ताह होत आहे. पूजनीय श्रीस्वामीमहाराजांनी लिहिलेल्या पत्राप्रमाणेच पूजनीय श्रीगुरुमहाराजांनी सर्व कार्य करून घेतले.

*सत्पुरुषांच्या संकल्पाप्रमाणे सर्व कार्य परमात्मा कसा करीत असतो हे यानिमित्ताने सर्वांना पाहता आले. प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराजांचा पत्रातील संकल्प पूजनीय श्री गुळवणी महाराज यांनी करून घेतला. यामुळे प.प.श्री दीक्षितस्वामी महाराज व पूजनीय श्री गुळवणी महाराज हे वेगळे नसून एकच आहेत याचीही प्रचिती मिळाली व गुरू-शिष्याचे नाते, शिष्याची गुरु आज्ञा पाळण्याची तळमळ कशी होती हेही दिसून आले.*

श्री गुरुदेव दत्त🙏

Want your business to be the top-listed Travel Agency in Baroda?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Near Rajpipala
Baroda
ZIP