Kinkar polytechnic seloo

Kinkar polytechnic seloo

Share

03/31/2026
Photos from Kinkar polytechnic seloo's post 01/28/2026
Photos from Kinkar polytechnic seloo's post 01/20/2026

संतवाणी उपक्रमातून स्वच्छता व समाजजागृतीचा संदेश
स्वच्छता म्हणजेच ईश्वराची सेवा आहे.” — या संत शिरोमणी केजाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून किनकर पॉलिटेक्निक कॉलेज, सेलू यांच्या वतीने दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी समाजसेवेच्या उद्देशाने एक विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री संत शिरोमणी केजाजी महाराज यांच्या परिसरात उत्साहात पार पडला.
या उपक्रमाला डॉ. पी. एम. रेवतकर, प्रा. ए. जी. खराबे, प्रा. पी. व्ही. सोनी, प्रा. अनिल पडघणे व प्रा. सचिन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसर स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संदेश व जनजागृती उपक्रम राबविले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, भक्तिभाव व सेवा वृत्ती दिसून आली. समाजातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक संदेश पोहोचविण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Want your school to be the top-listed School/college in Houston?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Houston, TX