DR. Prabhakar R. Londhe

DR. Prabhakar R. Londhe

Share

16/03/2026

(सुभेदार मल्हारराव होळकर जयंती विशेष)
विनम्र अभिवादन!
अवश्य वाचा.....

सुभेदार मल्हारराव कळेल काय???

डॉ प्रभाकर लोंढे

पेशवाईचा आधारस्तंभ, माळव्याचा सुभेदार, दुश्मनांचा कर्दनकाळ, पराक्रमाचा महामेरु, रणांगणावरील तोफगोळा, अस्सल ध्येयवेडा, ज्यांचं नाव घेताच दुश्मन म्हणती पळा.. पळा. असे ते महान सुभेदार मल्हारराव खंडोजी होळकर यांची आज जयंती.. .... जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन व वाचकांना खूप खूप शुभेच्छा....
पेशवाईची स्थापना करणारा बाळाजी विश्वनाथ पेशवा ज्याने पेशवाईची घडी या महाराष्ट्रात निर्माण केली, त्याच्या कळस बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा, राघोबा पेशवा, चिमाजीआप्पा, सदाशिवराव पेशवा यांनी रचला. तो कळस ज्यांच्या ज्यांच्या जीवावर रचला गेला, ज्यांच्या भरोशावर पेशवाई मजबूत झाली, त्या सर्वांचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच सुभेदार मल्हारराव होळकर ....‌. ज्यांनी अखंड महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये पेशवाईच्या नावाचा कसला? होळकरशाहीच्या नीती व कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केला, युद्धनीती व तलवारीच्या पात्याला गरजेनुरुप धार देत दुश्मनावर विजय मिळवला. स्वत:ची दहशत निर्माण केली व कायम ठेवली.. तो नीती संपन्न, कृती संपन्न सुभेदार आम्हाला कळेल काय?
पेशव्यांच्या अंतर्गत वादात निर्णायक भूमिका घेऊन अतिहुशार समजल्या जाणाऱ्या पेशव्यांना प्रसंगी समजच नाही तर गरजेनुसार ज्यांनी दम सुद्धा दिला, नीतिभ्रष्ट पेशव्यांना गरजे नुसार नीतीचे धडे दिले, तरी सुद्धा पेशव्यांना जीवनभर मालक म्हणून स्वामीभक्ती केली. इमाने इतबारे चाकरी करताना स्वतःचा स्वाभिमान यत्किंचितही ढळू न देणारे, स्वामीभक्ती जपतांना स्वकियांचा तो सूभेदार आम्हाला कळेल काय?
प्रतिगामी समाजव्यवस्थेमध्ये अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांना विरोध करून सत्याची कास व राज्याचा सर्वांगीण विकास यासाठी पुरोगामी धोरण स्विकारणारा, राज्य विकासामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांच्या क्षमता, कर्तुत्व यावर विश्वास ठेवून त्यांना तशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणारा, सुनेच्या हातात राज्याची चाबीच नाही तर विकासाची जबाबदारी देणारा, वेळ प्रसंगी स्त्रियांचा "अब्रुरक्षक" म्हणून सर्वत्र नावलौकिक प्राप्त झालेला सुभेदार मल्हारराव होळकर आम्हाला कळेल काय?
ज्यांनी आपल्या कार्यकाळात अनेकांना मदत केली. अनेकांची गेलेली राज्य परत मिळवून दिली. राजपूताण्या सारख्या भागातील राजकीय हालचालीवर ज्यांच्या वचक राहिला, ज्यांच्या विचार, कृती व निर्देशांचा दबदबा निर्माण झाला व सातत्याने टिकून राहीला, म्हणूनच राजस्थानच्या इतिहासात त्यांना "राज्य संस्थापक मल्हारराव होळकर" असे म्हटले जाते, असा तो राज्य संस्थापक सुभेदार मल्हारराव आम्हाला कळेल काय?
भारतातील सर्वात समृद्ध संस्थानाचा संस्थापक, ज्या संस्थानांमध्ये कायदा हा प्रमाण होता, जनभावनेचा आदर व लोक कल्याणाचा ध्यास हाच ज्यांच्या राज्याचा श्वास होता. अशाप्रकारे जे आपल्या राज्याची घडी बसून राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव दक्ष असलेल्या संस्थानाची वैचारिक घडी बसविणारा थोर सुभेदार मल्हारराव होळकर मोठ्या अंतकरणाने राष्ट्रीय भावनेने, असीम पराक्रमाच्या प्रेरणा घेण्याच्या दृष्टीने आम्हाला कळेल काय?

सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या पराक्रम व स्मृतींना विनम्र अभिवादन!!!

डॉ. प्रभाकर लोंढे
नागपुर
१६ मार्च २०२६

Want your public figure to be the top-listed Public Figure in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Karegaon National Highway 7
Yavatmal
445308