Aarohi Events

Aarohi Events

Share

04/10/2025

आरोही प्रस्तुत,
*"दिवाळी पाडवा पहाट"*
*बहुरंगी मैफल !!*
बुधवार, दिवाळी पाडवा, २२ ऑक्टोबर २०२५
यशवंतराव चव्हाण थिएटर,कोथरूड , पुणे
वेळ: पहाटे ६.०० ते ९.००
-------------------------
या वर्षीच्या दिवाळीत पुण्यातील नामवंत संस्था "आरोही" घेऊन येत आहेत एक खास पहाट कार्यक्रम
*"दिवाळी पाडवा पहाट"!!*
गायन, वादन आणि नृत्यकला यांचा सहभाग असलेली ही *बहुरंगी* मैफल म्हणजे पुणेकरांसाठी करमणुकीची दर्जेदार मेजवानी असणार आहे.

या मैफिलीत, सुप्रसिद्ध अभिनेत्री- नृत्यांगना *मृण्मयी देशपांडे* विशेष नृत्याविष्कार सादर करणार आहे.

झी सारेगम फेम लोकप्रिय बासरीवादक *अमर ओक* यांचा सहभाग रसिकांना शब्दांच्या पलीकडली वादन-अनुभूती देणार आहे.

युवा पिढीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका *शरयू दाते* लोकप्रिय मराठी-हिंदी गाणी सादर करणार असून हरहुन्नरी गायक *प्रशांत नासेरी* याचा आगळा वेगळा सहभाग कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे.

खास दिवाळी पाडव्या चे औचित्य साधून *अविनाश कुलकर्णी* यांनी योजलेल्या या *बहुरंगी* मैफिलीत हे सगळे सृजनशील कलाकार कलेचा अनोखा नजराणा घेऊन येत आहेत..!!
निष्णात वाद्यवृंद आणि *केतकी कुलकर्णी* यांचे नेटके निवेदन ही कार्यक्रमाची खासियत आहे..!
दिवाळी मध्ये सलग *१२ व्या वर्षी ‘आरोही’* संस्थेची उत्कृष्ट *नव-निर्मिती* असलेली ही *बहुरंगी* मैफल रसिकांसाठी दिवाळीची अनोखी पर्वणी ठरणार आहे..!!
चुकवू नये अश्या या मैफिलीला आवर्जून या !! 🙏🏻
कार्यक्रमाची तिकीटविक्री
थिएटर वर सुरू!
बुक माय शो आणि फ़ोन बुकिंग पर्याय उपलब्ध !!
अधिक माहितीसाठी संपर्क:
*अविनाश कुलकर्णी*
*98230 24434*

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Pune