Rohan Gaikwad
वाहतूक कोंडीमुक्त एनआयबीएम ( NIBM - Salunke Vihar Road ) आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी!
एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार रोड, वानवडी आणि परिसरातील नागरिकांसमोर आज सर्वात गंभीर व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वाढती वाहतूक कोंडी.
दैनंदिन प्रवासात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत आणि या विषयावर ठामपणे आवाज उठवत आहोत.
एनआयबीएम रोड, संविधान चौक, एबीसी फार्म चौक, क्रिस्पन करी चौक, कोटक महिंद्रा बँक चौक, साळुंके विहार चौक तसेच संपूर्ण NIBM , वानवडी-साळुंखे विहार परिसरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या लढ्यात नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. वाहतूक नियमांचे पालन, शिस्तबद्ध वाहनचालकता आणि प्रशासनाला सहकार्य यामुळेच आपण हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकतो.
चला, एकत्र येऊया आणि सुरक्षित, सुकर व वाहतूक कोंडीमुक्त परिसर घडवूया.
रोहन विलास गायकवाड
080877 09147 .
06/06/2026
आज आपल्या कोंढवा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. संतोष खेतमाळस साहेब, वानवडी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. पंडित रेजितवाड साहेब तसेच काळेपडळ पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा. सौ. गिरीशा निंबाळकर मॅडम यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन तसेच जनसामान्यांशी अधिक प्रभावी समन्वय राखण्यासंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत, त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना अधिक तत्पर, पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीस सेवा मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
💐 मा. संतोष खेतमाळस साहेब, मा. पंडित रेजितवाड साहेब आणि मा. गिरीशा निंबाळकर मॅडम यांना भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
" वानवडी गॅस शवदाहीनी "
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पाठपुराव्यामुळे काम पूर्ण !!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Pune
411048