APH TIMES
दुबईत भीषण स्फोट; ड्रोन हल्ल्यामुळे विमानतळ
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीतील दुबई शहरात मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ संशयित इराणी ड्रोन हल्ला झाल्याने काही काळ विमान वाहतूक थांबवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार हा ड्रोन विमानतळाच्या धावपट्टीजवळ कोसळल्याने मोठा स्फोट झाला आणि परिसरात धूर पसरला. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळातील काही भाग रिकामा करण्यात आला आणि सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली.
या घटनेत मोठे नुकसान झाले नसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले असून काही कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. काही ठिकाणी हवाई संरक्षण यंत्रणांनी मिसाइल आणि ड्रोन अडवले, मात्र त्यांचे अवशेष खाली पडल्याने स्फोट आणि आग लागल्याच्या घटना घडल्या.
दरम्यान, दुबई सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून काही तासांनंतर विमानतळावरील कामकाज हळूहळू पुन्हा सुरू करण्यात आले. या घटनेमुळे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई विमानतळावर मोठी धावपळ उडाली.
तज्ज्ञांच्या मते इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा परिणाम आता संपूर्ण मध्य पूर्वेत दिसू लागला आहे. कतार, सौदी अरेबिया, बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचे धोके वाढले आहेत.
या घटनेमुळे गल्फ प्रदेशातील सुरक्षेबाबत चिंता वाढली असून जागतिक हवाई वाहतूक आणि तेल बाजारावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
30/04/2025
🎉 We Did It – 1,000 Subscribers! 🎉
Wishing you a very happy Akshay Tritiya! On this auspicious day we’re incredibly excited to share that APH Times has just hit 1,000 subscribers on YouTube – our very first major milestone! 🙌
From our very first video to now, it's been an amazing journey filled with learning, growth, and incredible support from viewers like you. Every like, comment, share, and subscription has helped us reach this point, and we couldn’t be more grateful.
This milestone is just the beginning, and we’re more motivated than ever to bring you even more informative, inspiring, and meaningful content.
Thank you for being part of our community — here’s to the next 1,000 and beyond! 🚀
tone
19/04/2025
सुप्रीम कोर्ट Vs जगदीप धनखड
सुप्रीम कोर्ट Vs जगदीप धनखड उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड या...
Celebrating 76 Glorious Years of Republic: Honoring India's Diversity, Strength, and Progress. Proudly upholding the values that unite us all! 🇮🇳
21/01/2025
https://youtu.be/S8g3NjGiUkQ
बदलापूर यौन अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी बॉम्बे उच्च न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालानुसार, शिंदेच्या एन्काउंटरसाठी पाच पोलिस अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
24 वर्षीय अक्षय शिंदे, जो बदलापूरमधील एका शाळेत अटेंडंट म्हणून काम करत होता, त्याला ऑगस्ट 2024 मध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या शौचालयात लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 23 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी नवी मुंबईतील तलोजा जेलमधून हलवले जात असताना, पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सुरुवातीला दावा केला होता की, शिंदेने एका पोलिसाच्या पिस्तूलवर ताबा मिळवून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आत्मसुरक्षेसाठी त्यांनी गोळीबार केला. मात्र, ठाणे मॅजिस्ट्रेटने सादर केलेल्या अहवालात वेगळेच वास्तव समोर आले आहे.
अहवालातील मुख्य मुद्दे:
शिंदेच्या मृत्यूच्या वेळी घटनास्थळी ठाणे क्राइम ब्रँचचे वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक नीलेश मोरे, हेड कॉन्स्टेबल अभिजीत मोरे आणि हरीश तावडे यांसह एक पोलिस चालक उपस्थित होते.
अहवालानुसार, पोलिसांना परिस्थिती बळाचा वापर न करता हाताळता आली असती. मात्र, त्यांनी चुकीची कृती केली.
फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार, ज्या पिस्तूलवर शिंदेने ताबा मिळवल्याचा दावा केला होता, त्यावर शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत.
शिंदेच्या पालकांनी न्यायालयात याचिका दाखल करत दावा केला होता की, त्यांच्या मुलाची हत्या ही बनावट एन्काउंटर होती. तपास अहवालाने त्यांचा आरोप बळकट केला आहे.
हायकोर्टाचे निरीक्षण:
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने अहवाल पाहून टिप्पणी केली, "तपास अहवाल आणि फॉरेन्सिक निष्कर्षांनुसार, मृतकाच्या पालकांचा आरोप योग्य वाटतो. पाच पोलिस अधिकारी शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत."
राज्य सरकारला आता या अहवालाच्या आधारे एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील तपास सीआयडीद्वारे केला जाणार आहे.
अक्षय शिंदे चा FAKE ENCOUNTER? | APH Times | Crime News बदलापूर यौन अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी बॉ.....
15/01/2025
https://youtu.be/h0lEGVWtb0I?si=DRtZVf03mZTM2fkK
दिनांक 13 जानेवारी2025 रोजी मदनलाल धिंग्रा ग्राउंड निगडी येथे मस्केटीयर्स युवा फाउंडेशन व भारतीय भूतपूर्व सैनिक संघ पुणे यांच्या वतीने ८ जानेवारी ते १३ जानेवारी 2025 दरम्यान भारतीय सेना दिवस साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळांतील विद्यार्थी सहभाग घेतला व विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे आयोजन, ही एक सामाजिक संस्था असून, ती तरुण पिढीला प्रेरित करताना त्यांना भारतीय संरक्षण दलांविषयी जागरूक करण्याचे आणि चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य करते. तसेच विविध खेळांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे नियोजन केले
रायफल शूटिंग स्पर्धा – अचूकता आणि लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य कराटे स्पर्धा – शिस्त आणि स्वसंरक्षणाची कला.
तिरंदाजी स्पर्धा
विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा – विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सन्मानित करण्यावर भर.
अॅथलेटिक्स स्पर्धा, ज्यामध्ये:
शर्यती: १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर.
मैदानी खेळ: भालाफेक, डिस्कस थ्रो, शॉट पुट, आणि लांब उडी.
मुख्य कार्यक्रम: भारतीय सेना दिवस या दिवशी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाची भव्यता
वीर जवानांना आदरांजली:
भारतीय सैन्याच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान करत वीर जवानांना पुष्पचक्र समर्पित करून श्रद्धांजली अर्पण केली शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले MTA संस्थे चे
अध्यक्ष नरेंद्र अहिरे यांनी प्रस्थावना केली
• सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले देशभक्तीपर नृत्य, गीते आणि नाट्यसादरीकरणे यांचे सादरीकरण केले. विविध प्रात्यक्षिकांद्वारे भारतीय सैन्याचे साहस आणि कौशल्य प्रदर्शित केले.
• वीरपत्नी आणि वीरमाता यांना हळदी कुमकूम व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले .
तसेच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी मेजर जनरल नायर साहेब व कारगिल समर सेनानी रामदास मदने यांनी विध्यार्थी उपस्थितांना संरक्षण दलांशी संबंधित जीवनाचे महत्त्व आणि शौर्य याबद्दल प्रेरणा दिली.
#मराठीबातम्याlive
For all the latest news from Maharashtra keep watching APH Times on YouTube:
निगडी येथे भारतीय सेना दिवसाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन | APH Times | Indian Army day | दिनांक 13 जानेवारी2025 रोजी मदनलाल धिंग्रा ग्राउंड निगडी येथे मस्केटीयर्स युवा फाउंडेशन व भारतीय भूतपूर्व सैनिक सं.....
14/01/2025
🌾Happy Makar Sankranti🌾
04/01/2025
https://youtu.be/W0FA3sV_g6Q
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या विधानांवर प्राजक्ता माळी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुरेश धस यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे प्राजक्ता माळी यांनी नाराजी व्यक्त केली. त्या मते, हे विधान महिलांचा अपमान करणारे होते आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली.
प्राजक्ता माळी यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला जे वाटले ते मी बोलले आहे, आणि या मुद्द्यावर मी ठाम आहे." त्यांच्या या विधानाला चाहत्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
महिला आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांना त्वरित चौकशीचे निर्देश दिले. या निर्णयामुळे प्रकरण अधिक गाजले.
वाद वाढत असल्याचे पाहून सुरेश धस यांनी आपले विधान हेतुपुरस्सर नव्हते, असे स्पष्ट करत सार्वजनिक माफी मागितली. त्यांनी म्हटले, "मी कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू ठेवला नव्हता. माझ्या विधानामुळे प्राजक्ता माळी यांना त्रास झाला असल्यास, मी माफी मागतो."
प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या माफीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपली तक्रार मागे घेतली. त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानत सांगितले की, "महिलांच्या सन्मानासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. हा मुद्दा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आहे."
या प्रकरणाने महिलांच्या सन्मानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांविषयी आदरपूर्वक वर्तन ठेवण्याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.
या वादाचा शेवट सन्मानपूर्वक माफीने झाला असला, तरी या घटनेने समाजात महिलांच्या सन्मानाबाबत जागरूकतेची गरज दाखवून दिली आहे.
(पुढील बातमीसाठी पाहत राहा APH Times)
प्राजक्ता माळी विरोधात वादग्रस्त विधान: सुरेश धस यांची माफी | Prajakta Mali | Suresh Dhas मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. ....
19/12/2024
संसदेत गोंधळ: भाजपा खासदार जखमी, काँग्रेसवर आरोप, लोकशाहीवर प्रश्नचिन्ह
संसदेत गोंधळ: भाजपा खासदार जखमी, काँग्रेसवर आरोप, लोकशाहीवर प्रश्नचिन्ह - APH Times नवी दिल्ली: संसदेच्या चालू सत्रात आज एक अप्रिय घटना घडली. वादग्रस्त विषयावर चर्चा सुरू असताना भाजप आणि काँग्रेस ख....
08/12/2024
https://youtu.be/2dhBf_T79-U
CMOMaharashtra Murlidhar Mohol Narendra Modi Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shankar Jagtap
वाकड : ज्या बांगलादेशात पूर्व पाकिस्तानकडून अत्याचार होत होते, तेथील मुस्लिमांची हत्या होत होती आणि महिलांवर अत्याचार होत होते, तेथील महिलांची आब्रू लुटली जात होती, त्या वेळी भारत सरकारने आपली सेना पाठवून पाकिस्तान सेनेला शरण यायला भाग पाडले व तेथील जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले.
नवीन बांगलादेशाची निर्मिती झाली. मात्र आज तेथील धर्मांध मुस्लिमांनी देशाचा ताबा घेऊन तेथील हिंदूंवर अत्याचार सुरू केले आहेत. त्यांची प्रॉपर्टी घेऊन त्यांच्या महिलांवर अत्याचार करत आहेत. जेंव्हा तेथील मुस्लिमांवर होणारे अत्याचार पाहून आपण मदत केली, मग आता तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार उघड्या डोळ्याने कसे पाहू शकतो?
या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी उत्कर्ष चौक, वाकड येथे सकल हिंदू समाज, पिंपरी-चिंचवड शहर यांनी आज, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी मूक मोर्चा आयोजित केला होता. आणि १० डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतभर मोर्चे व निदर्शने करण्याचे नियोजित आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये मूक मोर्चा | APH Times | Bangladesh | ज्या बांगलादेशात पूर्व पाकिस्तानकडून अत्याचार होत होते, तेथील मुस्लिमांची हत्या होत होती आणि महिलांवर अत्याचार...
02/12/2024
https://youtu.be/UM2fTex2zHo?si=9hJfX4fsE_IBGWSDजिचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच जागतिक स्तरावरही आदराने घेतलं जातं – ऐश्वर्या राय बच्चन. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि अभिनयाने भारताचा गौरव करणारी ही व्यक्तीमत्त्व एक आदर्श आहे.
1994 साल. ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकत भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलं. तिचं सौंदर्य, परिष्कृत व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यामुळे ती ग्लोबल आयकॉन बनली. मात्र, या यशाचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला चित्रपटांमध्ये मिळालेल्या संधींमध्ये अपयशाचा सामना तिला करावा लागला. पण तिच्या मेहनतीने ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या सिनेमांनी इतिहास घडवला.
कॅन्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या नियमितपणे उपस्थित असते. तिच्या प्रत्येक लूकवर जागतिक माध्यमांचं लक्ष असतं. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत ती आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते.
तिच्या वैयक्तिक आयुष्याचे काही प्रसंग मात्र वादग्रस्त ठरले. सलमान खानसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेले वाद, तसेच विवेक ओबेरॉयसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत राहिली. 2002 मध्ये सलमानच्या हिंसक वागणुकीवर ऐश्वर्याने खुलेपणाने प्रतिक्रिया दिली होती. मात्र, या कठीण प्रसंगांवर मात करत तिने आपले लक्ष नेहमी आपल्या कामावर केंद्रित ठेवले.
2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ऐश्वर्या राय एक आई, पत्नी आणि अभिनेत्री म्हणून आदर्शवत जीवन जगत आहे. आराध्यासाठी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत ती नेहमीच प्रेरणादायक ठरली आहे.
चित्रपटसृष्टीतही तिला अनेकदा वादांचा सामना करावा लागला. ‘चोखेर बाली’ आणि ‘प्रोवोक्ड’ यांसारख्या बोल्ड भूमिकांवर टीका झाली. पण ऐश्वर्या नेहमीच आपल्या निवडींचा ठामपणे बचाव करत राहिली.
वाद असो वा यश, ऐश्वर्या रायने नेहमीच आपला आत्मविश्वास आणि चिकाटी जपली आहे. आज ती केवळ भारतीय सिनेमाची राजदूत नाही, तर जागतिक पातळीवरील आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. तिचा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.
ऐश्वर्या रायचा संघर्ष, यशाचा प्रवास आणि वादग्रस्त प्रसंग. ऐश्वर्या राय: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यवती आणि तिच्या जीवनातील प्रवास.
24/11/2024
https://youtu.be/tjG0IkGvP1o?si=jsZIH6ENCfjn6Bna
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय ऐतिहासिक ठरला असून, या निवडणुकीत महायुतीने केवळ प्रचारच केला नाही तर त्यासाठी काटेकोर नियोजन आणि कार्यशैली याचा देखील आदर्श घालून दिला. या यशामध्ये विरोधकांच्या निर्णयांचे आणि चुकांचे मोठे योगदान राहिले. पाहूया, निवडणुकीचा हा थरार आणि महायुतीने कसा साधला विजयाचा शिखर.
महायुतीने या निवडणुकीत मायक्रो लेव्हलवर काम केले. प्रचार यंत्रणेची पद्धतशीर आखणी करून जबाबदाऱ्या वाटून दिल्या. आरएसएसही या प्रचार मोहिमेत सहभागी झाली, ज्यामुळे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली ‘लाडकी बहिण योजना’ही यशस्वी ठरली. सरकारने योजना प्रत्यक्षात राबवून बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले आणि याचा थेट परिणाम महायुतीला मतदारांचा ओढा वाढण्यात झाला.
विरोधी पक्षांनी मात्र या निवडणुकीत प्रभावी रणनीती उभारण्यात अपयश अनुभवले. उभाठा गटाने प्रचारात ‘गद्दार’, ‘चोर’, ‘खोके’ यासारख्या आरोपांवर भर दिला, ज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील सहानुभूतीचा फटका उलट त्यांच्या गटालाच बसला.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्वाचा विसर पडल्याचे अनेक कट्टर समर्थकांना जाणवले. सुषमा अंधारे यांना स्टार प्रचारक म्हणून निवडण्याचा निर्णयही समर्थकांना खटकला. याशिवाय, विरोधी पक्षातील नेत्यांमधील बेजबाबदार वक्तव्ये, विशेषतः संजय राऊत यांचे भाषण केवळ पत्रकारांसाठी खाद्य पुरविण्यासारखे ठरले; प्रत्यक्षात जनतेवर परिणाम करण्यास अपयशी ठरले.
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अदानी-विरोधावर एकाच मुद्द्यावर भर दिला, तर महाराष्ट्राच्या विकासाबाबत ठोस चर्चा झाली नाही. नाना पटोलेंनी मुस्लीम समाजाच्या १७ मागण्या मान्य करण्याचे जाहीर केले, ज्यामुळे हिंदू समाज एकवटला. शरद पवार यांचा या मागण्यांना दिलेला पाठींबाही महायुतीच्या पथ्यावर पडला.
याच दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजही पहिल्यांदाच महायुतीच्या बाजूला दिसला. या सर्व घटनांमुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग विरोधकांनीच सुलभ केला.
या निवडणुकीत महायुतीने निवडणूक प्रचाराचे धडे दिले तर विरोधकांनी केलेल्या चुकांचा मोठा फायदा घेतला. त्यामुळे हा विजय केवळ एक निवडणुकीचा विजय नसून, विरोधकांच्या कमकुवत धोरणांचा पराभव आहे. महायुतीची कामगिरी येत्या काळात कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीची विजयगाथा: विरोधकांच्या चुकांमुळे विजयाचा मार्ग सुलभ
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411017