This is an official Fan Page for all the people who Love "Shreeram Pathak"
!! श्रीराम पथक !!
गणेशोत्सवाच्या दिवसात आणि विशेष करून पहिल्या व शेवटच्या दिवशी विजेचा वापर करून चित्र विचित्र नाच करण्यापेक्षा,
तालात चांगल्या पद्धतीने वादन करावे, अंगातली उर्मी ढोलाच्या पानावर काढावी व बुद्धी चांगल्या मार्गाने वापरावी
अशा सात्विक विचारला अनुसरून श्रीराम पथक गेली २१ वर्षांपेक्षा अधिक काळ गणेशोत्सव काळात
कार्यरत आहे.
सर्व पुणेकरांना अभिमान वाटावा असा पुण्यातील गणेशोत्सव केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सुपरिचित आहे.
अत्यंत लोकप्रिय आणि समाजभिमुख अशा उत्सवात श्रीराम पथकाचे उत्तम वादन कौशल्य,
शिस्तबद्धता, परस्परातील स्नेह याचा अनुभव पथकातील सर्वाना तसेच पथकाला जवळून बघणाऱ्या सर्वांना आहेच.
श्रीराम पथकातील एकूण वादक संख्या ४५० ते ५०० इतकी असून पथकाने आत्तापर्यंत पुणे शहर तसेच उपनगरातही चांगल्या पद्धतीने वादन करून
आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेत सराव करणाऱ्या श्रीराम पथकाने पुण्यातील मानाच्या
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, केसरी वाडा, जिलब्या मारुती मंडळ, बाबू गेनू मंडळ, भाऊ रंगारी मंडळ आदी. मंडळांबरोबर गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे.
आपल्याला मिळणाऱ्या मानधनापैकी खर्च वजा जाता शिल्लक रक्कम विविध समाज संस्थांना उदा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण रक्तपेढी,
वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, चैतन्य महिला मंडळ, भटके विमुक्त विकास परिषद, अस्तित्व प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांना आर्थिक तसे वस्तू स्वरूपात मदत करण्यातसुद्धा श्रीराम पथकाने पुढाकार घेतला आहे.
सन २००७ मध्ये पार पडलेल्या राज्य स्तरीय झी मराठी ढोल ताशा स्पर्धेमध्ये पथकाला व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्यानंतर मिळालेली संपूर्ण रक्कम पथकाने सकाळ रिलीफ फंडाला मदत म्हणून दिलेली आहे.
श्रीराम पथकात सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, वर्ष सहल इ. उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला सर्वांसाठी आयोजित केली जाते.
श्रीराम पथकातील सर्व वादक तसेच हितचिंतकांच्या आधारेच या सर्व गोष्टी सध्या झाल्या आहेत.