The First Three Institute for Child Development
Research in the fields of neuroscience and psychology now shows that the first three years of a child’s life are crucial to lifelong outcomes. The quality of a child’s early experiences determines whether a child will reach her full developmental potential. The care, nurturing and learning opportunities a child receives in the first three years of her life decide the quality of her later life, fro
11/03/2024
नावनोंदणी केलीत का?
नवीन शिबीर!
23/02/2024
नवीन शिबीर!
22/12/2023
सूनृता सहस्रबुद्धे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला लवकरच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर ऐकायला मिळणार आहे. Stay tuned for the details!
मध्यंतरी काही कारणासाठी हॉस्पिटलमधे जावं लागलं . डॉक्टरांची वाट बघत रिसेप्शनमधे बसलो होतो . तिथे दोन अडीच वर्षाची मुलगी आई बाबांबरोबर आली होती . बाबाच्या काही टेस्ट्स करायच्या होत्या . तिला आत्तापुरतं नेहा म्हणू .
आई बाबा काउंटरवर काहीतरी चौकशी करायला गेले. मागे वळून नेहाला म्हणले , "२ मिनिटं बस इथे खुर्चीवर." नेहानी थोडावेळ बसल्या बसल्या पाय हलवले. आईनी मागे वळून डोळे मोठे केले. नेहानी इकडे तिकडे बघितलं आणि टुणकन उडी मारून ती एका खांबाकडे पळली . खांबाला हात लावत खांबाभोवती गोल गोल चालायला लागली . आपापलीच अडखळून पडली . उठून पुन्हा खेळ सुरु करणार तेवढ्यात आई आली . ती नेहाला खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन गेली . तिथे थोडी मोकळी जागा होती. नेहानी, आईच्या आजूबाजूलाच, पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पळायला सुरुवात केली . बाबानी मग नेहाला उचलून घेतलं . दोन मिनिटं खुर्चीवर उभं केलं . एक एक आकडा म्हणल्यासारखं खुर्च्यांवर एक एक पाऊल टाकत नेहानी त्याचाही खेळ केला . तिला पुन्हा तिथून उचलण्यात आलं .
आई बाबा एकमेकांशी बोलेपर्यंत नेहानी पुन्हा सगळ्या खुर्च्यांच्या मधून चक्कर मारायची ठरवली. एका बाळाला मांडीवर घेऊन बसलेल्या काकूंनी तिचं लक्ष वेधलं. हात पाय जोरात हलवून बाळानी आनंद व्यक्त केला . नेहा पण जरा थबकली . समोरच्या खुर्चीवर चढून ती बाळाच्या उंचीला आली . बाळाशी काही बोलायच्याआत नेहाला पुन्हा उचलून वेगळीकडे खुर्चीवर बसवण्यात आलं होतं .
तिनी मग रागावून चप्पल जमिनीवर टाकली , मास्क काढून टाकला , रिसेप्शनवरच्या बाईंना टाटा म्हणून बघितलं , शेजारी बसलेल्या काकूंना हळूच मारून बघितलं , आई तूच घे- बाबा तूच घे असा हट्ट करून बघितला.
या सगळ्या वेळात तिला फक्त "शुss क. शांत बस " एवढंच ऐकायला मिळालं . तिनी दरवेळी स्वतःसाठी या जागेतही गंमत शोधायचा प्रयत्न केला . पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाला "हलू नकोस. स्थिर बस " असंच सांगण्यात आलं .
"तुला कंटाळा आलाय ना राजा, जाऊचया हं" असं म्हणण्यानी नेहाला नक्कीच मदत झाली असती. आपण वागण्यातून जे सांगतोय ते समोरच्याला ऐकू आलंय हे समजलं की आपल्याला आपला ताण, दुःख, निराशा manage करणं सोपं जातं.
दुसऱ्या कोणाला त्रास होत नाहीये आणि मूल आपापलं रमतंय असे खेळ खेळू देण्यानीही नेहासारख्या सगळ्या मुलांना खूप मदत होऊ शकते ! दोन वर्षाच्या मुलानी स्थिर बसून राहणं ही अपेक्षा , ते नाही घडलं तर आई बाबांना येणारा ताण, वाटणारी लाज आणि त्यामुळे एकटं पडणारं मूल, हे सगळंच किती टाळता येण्याजोगं आहे असं वाटत राहिलं ..
हॉस्पिटलमधे येण्याचा ताण आई बाबांना असणारच . आई बाबांच्या जगात काहीतरी हललेलं असताना, काहीतरी ताणाचं निर्माण झालेलं असताना खरंतर आईबाबांना आयुष्य पूर्ववत व्हायला हवं होतं . ते स्थैर्य ते मागत होते . मात्र आयुष्याकडे ते स्थैर्य मागायच्या ऐवजी दोन वर्षाच्या खेळकर बाळाकडे ते पत्ता चुकून आले होते !
- सूनृता सहस्रबुद्धे
The First Three Institute for Child Development
Click here to claim your Sponsored Listing.