Deva Zinjad

Deva Zinjad

Share

12/06/2026

दिनांक : ११/०६/२०२६
इतिहास अभ्यासक, प्राचीन मंदिरांचे स्थापत्य विशारद, स्वराज्य आणि स्वराज्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या संपूर्ण मावळ्यांचे निस्सिम भक्त , शस्त्र अभ्यासक, शिवव्याख्याते श्री. शशीनजी कुंभोजकर सरांना , लेखक देवा झिंजाड लिखित " मेंदूची मशागत " पुस्तक भेट .
Rahul Mokashi ह्यांची पुस्तक भेट.

12/06/2026
12/06/2026

४५३ पानं!! सव्वा दोन दिवसांचं वाचन!!
आणि नंतरचे निशब्द २४ तास म्हणजे एक भाकर तीन चुली!! हि देवा झिंजाड यांची कादंबरी.

आजपर्यंत आत्यंतिक झपाटलेपणाने जी काही पुस्तकं वाचली त्यांनी खुप बळ दिलंय मला त्यात या कादंबरीची भर पडली.
संघर्ष, पडझड, आशा, निष्ठा, अपमान, वाताहत हे चक्र अव्याहतपणे पुस्तकभर सुरू राहतं.
वाचून जीव थकतो पण बाईच्या आयुष्यातील हे चक्र थांबायचं नाव घेत नाही. या सगळ्यात एक गोष्ट पारूच्या बरोबरीने मला बांधून ठेवत होती ती, तिची जगण्याबद्दलची जिजीविषा. मला चंद्राच्या सोळा कला आकर्षित करतात पण त्याहीपेक्षा काकणभर सरस ठरल्या पारूच्या जन्मापासून उतारवयापर्यंतच्या सगळ्या कला.
पदोपदी अपमान, अवहेलना, दारिद्र्य वाट्याला आलेली ही स्त्री वाघीण म्हणून भेटत राहिली पुस्तकभर. तरीही वाचतांना कुठल्याही मळभाने घेरलं नाही, उद्याच्या दिवसावर तिचा असलेला विश्वास आज तिला प्रत्येक संकटात; परिस्थितीत हसरं ठेवत होता, हे बळ वाचतांना मलाही मिळालं. सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले तसे पारूच्या आयुष्यातील दुसऱ्या लग्नाचे सुखाचे दिवस पटकन वाचून संपले.
संपली नाही पारूबाईची उमेद. शिक्षण आणि समज यात शिक्षण नसलेली पारूबाईची समज उजवी ठरली. मुलाच्या शिक्षणासाठी बाप्या माणसागत अहोरात्र कष्ट घेणारी माउली बघितली.
बाईचा बाई म्हणून असणारा एक वेगळा संघर्ष, माणूस म्हणून असणारा संघर्ष, जातीपातीच्या भरडीत होणारा संघर्ष, पुरुषप्रधान मानसिकतेतून वाट्याला आलेला आणि जन्माला पुरून उरलेला पारूचा संघर्ष वाचला आणि लक्षात आलं; या संघर्षाच्या अविरत घर्षणातून केवळ पारूबाईसाठी नाही तर, माझ्यासाठीही दृढ मनोबल तयार झालंय.

देवा झिंजाड धन्यवाद.
तुम्ही तुमच्या आईचे आयुष्य मांडले.
शूटिंगच्या निमित्ताने ज्या छोट्या गावात सध्या मला वावरायला मिळतंय तिथेही दिवसरात्र कष्ट करणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याच्या आणि निर्मळ मनाच्या स्त्रिया मला भेटल्या आहेत.
त्यांच्याकडे बघून जगण्याचा हुरूप येतो, पारुबाईंना वाचतांना मला त्या आसपास याच गावात दिसत होत्या. अशा असंख्य असतील, त्या सगळ्यांचा जगण्यावर विश्वास आहे म्हणून आपण आहोत असं मला वाटतं.

दोन वर्षात ३१ आवृत्त्या निघालेलं हे पुस्तक ज्यांनी अजून वाचलं नाही त्यांनी वाचायला हवं.

अपर्णा क्षेमकल्याणी

आवृत्ती ३१ वी 🌱
अभिप्राय क्र. १४५२ 🌱
एकूण अभिप्राय ४९८०| 🌱
पृष्ठसंख्या ४५०

🌿
9890697098
घरपोच पुस्तकासाठी WhatsApp करावे.🌿

#सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #एकभाकरतीनचुली #देवाझिंजाड #अभिप्राय #पुस्तक #रीडर्सकोम्मुनिटी #साहित्यप्रेमी #मराठी #समीक्षण #कादंबरी #पुस्तक #वाचक ,

(Ek bhakar tin chuli, sagale ulthavun takale pahije, Menduchi mashagat, Deva zinjad, Marathi book, novel, kadanbari, poem)

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Pune