Marathi Katta
लोकप्रिय मालिका 'मुरांबा' घेणार प्रेक्षकांचा
निरोप?
24/06/2026
गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील दुपारी ३ वाजताच्या सत्रातील सर्वात यशस्वी मालिका म्हणून ओळखली जाणारी ‘मुरांबा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने नुकताच १४०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिवानी मुंढेकर (रमा) हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे. तिने सेटवरचा एक मिरर सेल्फी शेअर करत, "वन लास्ट टाईम... रमा म्हणून शेवटचे काही क्षण..." असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमुळे ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्षय मुकादम आणि रमा यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका आता बंद होणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, येत्या काही महिन्यांत स्टार प्रवाहवर काही नवीन शो सुरू होणार असल्याने वाहिनीवरील काही मालिकांचा प्रवास थांबणार असल्याचे बोलले जात आहे.
सुभेदार कुटुंबात प्रियाचा मोठा तमाशा;मुलाच्या जीवावर नागराजचा ओव्हरस्मार्टपणा, अर्जुनसमोर गुन्ह्याची बेफिकीर कबुली
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Pune