Prose Publications
12/03/2024
ता. क. - डॉ.ऊर्जिता लिखित लघु कादंबरी. लघु-कादंबरीच्या स्वरुपात असणारी ही कथा उलगडत जाते, पत्रांच्या मार्फत. 'ती' पत्रं लिहिते तिच्या मित्राला, फिलोला.
12/02/2023
भयकथा आणि रहस्यकथांचे अभिवाचन!!!
१२ फेब्रुवारी २०२३, रविवार! म्हणजे आजच ...
चुकवू नये असा कार्यक्रम!
फिरोदिया हॉल, भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे
विनामूल्य प्रवेश - प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल...
https://bit.ly/EkGoshtaSangu
21/01/2023
"ऐक ना ,काल काय झालं माहितीये..!?" इथून पुढे जे काही घडतं, ते आपल्या सगळ्यांनाच आवडतं! म्हणजे या संवादात पुढे ज्या -ज्या प्रसंगाचं कथन होतं, खरंतर ती असते एक कथा! हो की नाही!
म्हणजेच आपल्या कोणत्याही भाषेचा आत्मा हे कथन, त्यातून निर्माण होणाऱ्या कथा. त्या सांगायला, ऐकायला आपल्याला आवडतंच की. त्यातही जर त्या लेखक मंडळींनी त्यांच्या कल्पनेच्या जोरावर, प्रतिभेवर त्या फुलवलेल्या असतील, तर फारच कमाल. पूर्वी असे कथा- कथनाचे, कथा-अभिवाचनाचे कितीतरी कार्यक्रम असायचे. निखळ आनंद आणि वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणारे. सध्या मात्र असे कार्यक्रम जवळपास नामशेष होत चाललेत. म्हणूनच प्रोज पब्लिकेशन्स, साहित्यकट्टा अंतर्गत; तुम्हा सर्वांसाठीच एक मस्त प्रकट कार्यक्रम घेऊन येत आहे. अर्थात कथा- अभिवाचनाचा.
कार्यक्रमाचं शीर्षक- एक गोष्ट सांगू!?
या कार्यक्रमात तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या रहस्यकथा, भयकथा ऐकण्याचा थरार अनुभवायला मिळेल.
या कथांचं सादरीकरण सुद्धा तसंच दमदार असेल. वेगवेगळे अभिवाचक त्या सादर करतील, ते ही संगीताच्या साथीने..
येणाऱ्या प्रेक्षक, श्रोतृवर्ग यांना एक उत्तम,सकस मनोरंजनाचा आनंद देण्याचा हा आमचा प्रयत्न.
त्याची ही माहिती-
कार्यक्रम- एक गोष्ट सांगू!?
दिनांक- १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी
वेळ- संध्याकाळी ५.३० ते ८.३०
स्थळ- नवल फिरोदिया सभागृह ,भांडारकर रीसर्च इन्स्टिट्यूट, भांडारकर रोड, पुणे.
शिवाय या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातल्या काही मान्यवरांची उपस्थितीही असणार आहेच.
प्रवेश - विनामूल्य!
मात्र आपली जागा राखीव ठेवण्यासाठी या खालच्या लिंकवर जाऊन तिथे नाव नोंदवा.
जागा मर्यादित असल्याने, हे आवश्यक आहे.
तर मंडळी नक्की या! तुमच्या मित्र-मंडळींना,कुटुंबियांना ही घेऊन या!
नावनोंदणी साठी लिंक -
https://bit.ly/EkGoshtaSangu
*प्रवेश मर्यादित.
*प्रवेशाचे संपूर्ण हक्क प्रोज पब्लिकेशन्स कडे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
*कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही. वयोगट १८ आणि पुढे.
-
प्रोज पब्लिकेशन्स
26/12/2022
नमस्कार मंडळी,
घेऊन येतोय पुढचा साहित्यकट्टा..! नवीन वर्षात नावीन्य लेऊन. डिसेंबर महिन्यातला कट्टा ज्या विषयावर आधारित होता तो म्हणजे, 'ललित साहित्यप्रकार'. याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की तोच विषय याही कट्ट्याच्या वेळेस आपण घेणार आहोत. अर्थातच जी मंडळी मागच्या कट्ट्याच्या वेळेस उपस्थित राहू शकली नव्हती, त्यांच्यासाठी एक उजळणी देखील असेल. आणि या तरल साहित्य प्रकाराचे विविध पैलूही आपण पाहणार आहोत. त्याविषयी गप्पा मारणार आहोत.
तर नक्की या!
दिनांक - २२ जानेवारी २०२३, रविवार
वेळ सायंकाळी - ४ ते ६
ठिकाण - ऑस्टिन 40 कॅफे हाऊस , भांडारकर रोड , पुणे
विषय - वर्तुळ
शब्दमर्यादा - ५००
या विषयावर ५०० शब्दांत आपले ललित लेखन खालील ई-मेल वर पाठवा.
[email protected]
नावनोंदणी करण्यासाठी माफक शुल्क- ५०/- (चहा + वडापाव असेलच)
Gpay नंबर - +91 90964 61133 आदिती
महत्वाचे निकष -
१. नोंदणी अनिवार्य
२. केवळ नोंदणी केलेल्या व्यक्तींचे लेखन विचारात घेतले जाईल
३. नोंदणी शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही, किंवा पुढील कट्ट्यासाठी वापरता येणार नाही.
४. तुमच्या लेखनासोबत तुम्ही 'ललित' या साहित्यप्रकारातील कोणते पुस्तक वाचताय, त्याचे नाव, त्याचबरोबर साहित्यिकांचे नाव ई-मेल मध्ये नमूद करणे अत्यावश्यक.
५. निवडीचे संपूर्ण अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
काहिही शंका असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
६. लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३
चला तर मग, भेटूया साहित्य कट्ट्यावर.
अरेच्चा! एक सांगायचं राहिलंच, आपल्या नवीन कार्यक्रमाविषयी, स्पर्धेविषयी देखील या कट्ट्यावर आपण भरपूर बोलूया.
नक्की या!
-
प्रोज पब्लिकेशन्स