Real Info World

Real Info World

Share

28/10/2025

हे सात नियम पाळले तर तुम्ही सहज लक्ष वेधून घेऊ शकता.

1. जे गरजेपेक्षा जास्त उपलब्ध असतो, त्याचा लोक लवकर कंटाळा करतात, स्वतःला थोडं दुर्मिळ ठेवा, तेव्हाच लोक तुमचं खरोखर मूल्य ओळखतील.

2. जो ऐकतो, तो अधिक आकर्षक वाटतो. लोक तुमच्या बोलण्यामुळे नाही, तर तुमच्या लक्ष देण्यामुळे प्रभावित होतात.

3. चांगली बॉडी लँग्वेज महागड्या कपड्यांपेक्षा जास्त प्रभावी असते. उभं राहण्याची पद्धत, चालण्यातील आत्मविश्वास - हे सगळं लोकांना भुरळ घालू शकतं.

4. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यक्तीकडे लोक नैसर्गिकपणे आकर्षित होतात. जो स्वतःवर काम करतो, तोच इतरांना प्रेरणा देतो.

5. थोडं रहस्य ठेवा, सगळं काही उघड करू नका. रहस्य निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करतं, ओपन बुक नाही.

6. कमी बोला, पण जेव्हा बोला तेव्हा अचूक आणि योग्य वेळी बोला. शब्दांचं वजन असावं, प्रमाण नाही.

7. आत्मसन्मानाने भरलेला माणूस सगळ्यात आकर्षक असतो. कारण तो स्वतःवर प्रेम करतो आणि कोणाकडूनही मान्यता (validation) मागत नाही.

25/10/2025

कामाची शेवटपर्यंतची एनर्जी कशी टिकवायची?

आरंभशूर माणूस सुरुवातीला विजेच्या वेगाने काम सुरू करतो, पण काही दिवसांनी त्याचं सगळं चार्ज संपतं.

कारण तो 'उत्साहाने" चालतो सिस्टिमने नाही यश मिळवण्यासाठी फक्त काम सुरू करणं पुरेसं नसतं, ते पूर्ण होईपर्यंत एनर्जी टिकवणं हेच खऱ्या खेळाचं रहस्य असतं

1. प्रत्येक कामाला शेवटची तारीख ठेवा. डेडलाईन नसलेलं काम म्हणजे गळ्यात बांधलेला दगड

2. लहान लक्ष्य ठेवा पण रोज पूर्ण करा. १०० दिवसांचा प्लॅन नाही, रोज २ तासांचा डिसिप्लिन पुरतो

3. उत्साह नाही टिकणार सवय टिकते दररोज एकाच वेळेला तेच काम करा, तोपर्यंत जोवर ते आपोआप होत नाही

4. 'फील" नाही आली म्हणून थांबू नका. काम फीलिंगवर नाही, फोकसवर चालतं

5. प्रेरणा हरवली की, आठवा सुरुवातीचं कारण. का सुरू केलं होतं हे दररोज स्वतःला विचारा

6. मोठं काही दिसेपर्यंत कोणालाही सांगू नका. बोलल्याने एनर्जी बाहेर जाते, शांततेत काम झालं की परिणाम आवाज करतो

7. एक काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं सुरू करू नका. एकच गोष्ट पूर्ण केली तर १० गोष्टी आपोआप घडतात

8. थकवा आला की थांबा सोडू नका. थांबणं म्हणजे ब्रेक, हार मानणं म्हणजे शेवट

9. डोपामिन रीसेट ठेवा मोबाईल, सोशल मीडिया यांचा गोंधळ कमी केला की फोकस वाढतो

10. सुरुवात तुमची ओळख नाही, शेवट तुमचं वारसा ठरवतो

सुरुवात सगळे करतात, पण शेवट फक्त काही करतात.

24/10/2025

अपमान नीट समजून घ्या म्हणजे अपमान झालाय असं वाटणारच नाही.

आपल्या जीवनात अपमान होणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. कोणी काही बोललं, हसलं किंवा दुर्लक्ष केलं की आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं.

पण मानसशास्त्र सांगतं की अपमान हा नेहमी दुसऱ्याच्या हेतूतून नसतो, तो आपल्या आकलनातून तयार होतो.

आपण एखाद्या प्रसंगाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं, तर कदाचित अपमान झालाच नाही असं वाटेल.

उदाहरणार्थ, एखाद्याने उग्र भाषेत बोललं, तरी त्याचा उद्देश आपल्याला दुखावणं नसून त्याचा ताण, राग किंवा स्वतःची अस्वस्थता असू शकते.

आपण जर हा दृष्टिकोन स्वीकारला, तर मन हलकं राहतं. अपमानाचं ओझं वाहण्याऐवजी परिस्थिती समजून घेणं हे मानसिक आरोग्यासाठी हितावह ठरतं.

त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या न घेता, तिचं खऱ्या अर्थाने आकलन करा.

मानसशास्त्र तज्ज्ञच्या लेखणीतून...
राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Pune