Nisargved
02/05/2026
उष्माघाताचे खूप रुग्ण वाढत आहेत.
त्रास काय होऊ शकतो ?
१)नाकातून रक्तस्त्राव,
२)हात, पाय, पोट व डोळ्यांची जळजळ
३)अशक्तपणा,
४)भूक मंदावणे,
५)चक्कर येणे,
६)लघवी पिवळी अथवा लाल रंगाची होणे,
७) उलटी, जुलाब होणे.
उपाय:
१)काय करावे ?
बाहेरून घरात आल्यावर लगेच अतिमात्रेत फ्रीज मधील थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ थांबून मग घोट घोट माठातील वाळा किंवा चंदनयुक्त थंड पाणी प्या. यामुळे शरीरातील पेशींना त्वरित ऊर्जा भेटते. शरीरातील रस धातूचे प्रीणन कर्म उत्तम प्रकारे घडते.
२)काय पिणे टाळावे ?
उन्हाळ्यात ताक पिणे टाळावे. ताक व दही हे स्पर्शाने थंड आहेत परंतु गुणधर्माने उष्ण आहेत. उन्हाळ्यात नियमित ताकाचे व दह्याचे सेवन करणाऱ्यांस पित्ताचा म्हणजेच उष्णतेचा अधिक त्रास वाढताना दिसतो. यातूनच शितपित्तासारखे त्वचा विकार उत्पन्न होतात.
३)काय प्यावे ?
लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस, सोलकढी, खर्जुरादी मंथ(आयुर्वेदिक औषध घरी बनवता येते), वाळा सरबत(धूतपापेश्वर फार्माचे -शीतसुधा), चंदन सरबत इ.प्रकारचे सहज घरी बनवता येतील असे सरबत या काळात प्रकृतीप्रमाणे प्यायला हरकत नाही.
अधिक माहितीकरता: 8767566627
डॉ.स्वप्नील प्र. घाटगे!
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
Bavdhan, Pune 21.
Naupada, Thane (प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी).
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
व्याधी - Sciatica.
सदर रुग्ण मागील २ महिन्यांपासून Sciatica pain ने त्रस्त होता. कोथरूड येथील डॉ. दीपक पाटील सरांनी विश्वासाने या रुग्णास आयुर्वेदिक उपचार घेण्यास निसर्गवेदला पाठवले. त्यांचे चालणे असह्य होते. डाव्या पायाला तीव्र वेदना, जडपणा व मुंग्या होत्या. केवळ ७ दिवसांच्या निसर्गवेद -Pain Heal Therapy ने ९०% आराम मिळाला असून रुग्ण आता पूर्णतः बरा झाला आहे.
आता Pain Kill नव्हे तर Heal करू..!
निसर्गवेद -Pain Heal Therapy.
Bavdhan, Pune.
Naupada, Thane.
SGM Hospital, Shirwal.
☎️ 8767566627
02/11/2024
रानभाजी| कुरडू
फायदे |
मागील आठवड्यात आई वडील गावावरून आले. येताना आईने कुरडूची भाजी माळरानातून आणली. कुरडू या रानभाजीचे आहारीय महत्व तसे फार चांगले आहे. लहान असताना अनेकदा खाल्ली आहे असं आई सांगते. परंतु अलीकडच्या काही वर्षात खाण्याचा योग आला नाही. तो दिवाळी सणानिमित्त योग जुळून आला. चवीला अत्यंत रुचकर असणाऱ्या कुरडू विषयी माहिती वाचूया.
मित्रांनो कुरडू ही एक अशी वनस्पती आहे ,जी पाऊस पडल्यावर आपल्याला माळरानावर, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर उगवलेली सहज दिसून येते. साधारणत: ही वनस्पती माठासारखी दिसत असल्यामुळे ओळखणे सहज सोपे जाते. या वनस्पतीला सेलोशिया अर्जेन्शिया (celosia argentea) असे लॅटिन नाव आहे ,तर संस्कृतमध्ये या वनस्पतीला शितीवारअसे म्हटले जाते . ही वनस्पती कुरडू, हरळू, पांढरा कोंबडा, मोर पंख अशा नावाने सुद्धा ओळखली जाते. ही वनस्पती ॲमरॅन्टेसी ( Amaranthaceae) या कुळातील असून रानभाजी म्हणून लोकांची आवडती भाजी आहे. या वनस्पतीची पाने गोलाकार, साधी ,विविध एका आड एक असतात. तर काही वनस्पतींची पाने लांबट व निमुळती आकाराची हिरव्या रंगाची असतात. या वनस्पतीचे खोड पांढरट व तांबूस रंगाचे व फांद्या पन्हाळीदार असतात . तर फुलांचा रंग पांढरा असून वरील भाग गुलाबी रंगाचा असतो. या वनस्पतीला फुले येण्याचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर- नोव्हेंबर असा असतो . या वनस्पतीची फुले पुंजक्याने येत असून टोकाकडे ती शंकूच्या आकाराची होत जातात. या फुलांमध्ये काळ्या रंगाच्या चापट चकचकीत कडक बिया असतात. पावसाळ्यात ही वनस्पती लोकांच्या आहारातील एक आवडती भाजी आहे. आयुर्वेदानुसार ही एक औषधी वनस्पती आहे.
औषधी गुणधर्म :
ही वनस्पती थंड गुणधर्माची असल्यामुळे शरीरातील वाढलेली उष्णता कमी करणारी आहे . कुरडू भाजीमध्ये लोह ,झिंक ,पोटॅशियम इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात असतात . मुतखड्यावर व लघवीच्या विकारावर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे.रक्ती मूळव्याध ,चक्कर येणे , सांधेदुखी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, दातांचे विकार दूर करण्यासाठी तसेच ही भाजी पचायला हलकी व पित्तनाशक आहे. त्वचाविकार व चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. या भाजीमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असून बिया औषधांमध्ये वापरल्या जातात. बियांचा उपयोग अतिसार ,नेत्ररोग ,रक्तदोष ,दृष्टिदोष ,मूत्ररोग यावर केला जातो . कुरडूच्या बियांची पावडर खडीसाखर व दुधासोबत घेतल्यास काम शक्ती वाढण्यास मदत होते. या वनस्पतीच्या बिया मुतखड्यावर खडीसाखरेसोबत घेतात. कफ असल्यास बिया ताकासोबत कुटून घेतल्यास फरक पडतो. पोट साफ होण्यासाठी ही भाजी दिवसातून एकदा अशी चार पाच दिवस खावी. पोट साफ होऊन जाते. ऑक्टोबर महिन्यात शरद ऋतूमुळे खवळलेले पित्त, रक्तात वाढलेली उष्णता या भाजीच्या सेवनाने कमी होऊन रक्तातील दाह हा गुण कमी होतो.
रानभाज्यांची उपलब्धता:
मित्रांनो निसर्ग आपल्याला भरपूर निरोगी, सकस खाद्य पुरवत असतो. आपल्याला फक्त ते जपता आणि वेचता आलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला हजारो रानभाज्या उपलब्ध आहेत ज्या त्या भागातील हवामानानुसार, प्रदेशानुसार व प्रकृतीनुसार उगवलेल्या असतात. आयुर्वेदातील जुने जाणते वैद्य असं म्हणतात की माणसाच्या अखेरच्या मृत्यू क्षणी आधुनिक उपचार लागू होत नसतील तर त्या व्यक्तीचं जन्म ठिकाण विचारावं व त्या शंभर मीटर परिसरातील ज्या औषधी वनस्पती असतील त्या गोळा करून, स्वच्छ धुवून, एकत्र करून वनस्पतींचा रस मृत्यू शय्येवरील रुग्णास पाजवा. अनेक चमत्कार झालेले ऐकीवात आहेत. रानभाज्या, वनऔषधी जपली पाहिजेत.
भाजी बनवण्याची पद्धत :
साहित्य :
दोन-चार जुडया कुरडूची पाने, एक टोमॅटो, दोन कांदे, लसुण , हळद, मीठ, तेल,जिरे ,मोहरी ,हिरवी मिरची.
कृती :
कुरडूची भाजी स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये थोडीशी उकडून घ्यावी. थंड झाल्यावर हाताने पिळून घ्यावी. भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, लसुण जिरे,मोहरी, हिरवी मिरची , चिरलेला टोमॅटो यांची फोडणी देऊन तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात पिळून ठेवलेली भाजी टाका. ती चांगली परतून घ्या. दहा ते पंधरा मिनिटांनी भाजी तयार होते .
धन्यवाद!🙏🏻
डॉ.स्वप्नील घाटगे!
(निसर्गवेद -Pain Heal Ayurveda)
बावधन, पुणे
ऐरोली, नवी मुंबई
नौपाडा, ठाणे.
☎️ 8879815946 / 8767566627
26/09/2024
Post Chikungunya मध्ये
थकवा, तीव्र सांधेदुखी व सुज ही लक्षणे प्रामुख्याने त्रास देतात.
अशा वेळी घरी काय काळजी घ्यावी ?
हलका आहार-
•मुग डाळ+तुप भात,
•ज्वारीच्या पिठाचे आंबील,
•पाव च.सुंठ+२ च.सातू+१ च.खडीसाखर+चिमूटभर सैंधव+१ ग्लास पाणी गॅसवर आठवून अर्ध उरल्यावर भुकेनुसार दिवसातून दोनदा प्यावे.
•कोमट अथवा उकळून गार केलेले पाणी.
अधिक त्रास असल्यास जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत. ७ दिवसात आराम मिळतो.
डॉ.स्वप्नील घाटगे.
(B.A.M.S. I64460 A1)
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
303, Fortune Plaza, NDA-Pashan road,
Bavdhan, Pune 21.
☎️ 8767566627.
06/04/2024
उन्हाळ्यातील आजार!
मित्रांनो उन्हाळा कडक सुरु झाला आहे. वातावरणात व शरीरात तापमान अतिशय झपाट्याने वाढत चाललं आहे. यामुळे भुवळ येणे, चक्कर येणे, डोकं दुखणे, अशक्तपणा व अस्वस्थता जाणवणं, जुलाब व उलटी होणे, ताप येणे, सतत तहान लागणे या व अशा तक्रारी आपल्याला या काळात त्रस्त करत असतात.
अशावेळी शरीराची काळजी काय घ्यावी ? नेमकं काय घ्यावं ? काय प्यावं ? हे प्रश्न तुमच्या मनामध्ये घर करत असतील.
यावर उपाय म्हणजे
१)घरातून बाहेर पडताना छत्री, टोपी, पाण्याची बॉटल, गॉगल यांचा वापर करावा.
२)थंड पेयांमध्ये थंब्सअप, कोका कोला, मिरिंडा यासारख्या द्रव्यांचा वापर टाळावा.
३)फेर्मेंटेड फूड(बेकरीचे पदार्थ, इडली, डोसा इ) खाऊ नये.
४)मांसाहार, मद्यपान, धूम्रपान यांचे सेवन करू नये.
५)हलका व कमी प्रमाणात आहार घ्यावा.
६)लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, गुलकंद सरबत, वाळा सरबत, डाळिंब ज्यूस, मनुक्यांचा व खजुरीचा कोळ यापैकी एक नियमित प्यावा.
७)ग्रीष्म ऋतूत शक्य असल्यास दुपारची अर्धा तास विश्रांती घेऊ शकता. यामुळे थकवा कमी होऊन ताकद येण्यास मदत होईल.
लक्षाणे अधिक असल्यास जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याने त्रास कमी होऊन जीवनशैली सुधारण्यास नक्की फायदा होईल.
धन्यवाद!
डॉ.स्वप्निल घाटगे!
निसर्गवेद - Pain Heal Ayurveda!
303, Fortune Plaza
NDA- Pashan road,
Bavdhan, Pune 411021.
Time 10am-1pm, 4pm-8pm.
ऐरोली, नवी मुंबई(दर महिन्याचा पहिला रविवार).
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Pune
411021